maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

हिरो मोटोकॉर्पने ‘ग्रॅण्‍ड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्‍ट’च्‍या दुसऱ्या पर्वासह सणासुदीच्‍या काळात केली अधिक उत्‍साहाची भर

नवी दिल्‍ली, ऑक्‍टोबर, २०२३: सणासुदीच्‍या काळात अधिक उत्‍साहाची भर करत हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने आज हिरो जीआयएफटी – ग्रॅण्‍ड इंडियन फेस्टिवल ऑफ ट्रस्‍टच्‍या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली.

जीआयएफटी उपक्रमामध्‍ये नवीन मॉडेल सुधारणा, लक्षवेधक कलर स्किम्‍स, आकर्षक फायदे, आर्थिक योजना आणि इतर अनेक बाबींचा समावेश आहे.

वर्ष २०२२ मध्‍ये पहिल्‍यांदाच लाँच करण्‍यात आलेल्‍या हिरो जीआयएफटी उपक्रमामध्‍ये अद्वितीय साजरीकरणांसह सुधारित आधुनिक परंपरांचा समावेश आहे. यंदा या भव्‍य मोहिमेसाठी थीम आहे ‘इस त्‍योहार, नयी रफ्तार’, ज्‍यामधून उत्‍साहात व आशेसह सण साजरा करण्‍यासाठी सज्‍ज असलेल्‍या भारतीय कुटुंबांची सकारात्‍मक भावना दिसून येते.

याप्रसंगी आपले मत व्‍यक्‍त करत हिरो मोटोकॉर्पच्‍या इंडिया बिझनेस युनिटचे मुख्‍य व्‍यवसाय अधिकारी श्री. रणजीवजीत सिंग म्‍हणाले, ”हिरो जीआयएफटी उपक्रम ग्राहकांनी आमच्‍यावर दाखवलेल्‍या अतूट विश्‍वासासाठी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करणारे गेस्‍चर आहे. देशातील घराघरांमध्‍ये लोकप्रिय असलेला ब्रॅण्‍ड हिरो मोटोकॉर्पला ग्राहकांना सर्वोत्तम ऑफरिंग प्रदान करण्‍याचा अभिमान वाटतो. जीआयएफटी उपक्रमाच्‍या माध्‍यमातून आमचा मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या आकर्षक श्रेणीसह आकर्षक आर्थिक योजना व कमी व्‍याजदर देण्‍याचा मनसुबा आहे, जे ग्राहकांना त्‍यांच्‍या घरी आयकॉनिक हिरो उत्‍पादने आणण्‍यास सक्षम करतील.”

या उपक्रमामध्‍ये हिरो मोटोकॉर्पच्‍या पोर्टफोलिओमधील अनेक आकर्षक कलर स्किम्‍सचा समावेश असेल, जसे पर्ल व्‍हाइट सिल्‍व्‍हरमध्‍ये हिरो झूम एलएक्‍स, मॅट वर्नियर ग्रेमध्‍ये प्‍लेझर एलएक्‍स आणि टी ब्‍ल्‍यू व मॅट ब्‍लॅक ट्रिम्‍समध्‍ये प्‍लेझर सीएक्‍स. प्‍लेझर व्‍हीएक्‍स नवीन मॅट ब्‍लॅक व पर्ल सिल्‍व्‍हर व्‍हाइट ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल, तसेच ग्राहक डेस्टिनी प्राइमचे नेक्‍सस ब्‍ल्‍यू, पर्ल सिल्‍व्‍हर व्‍हाइट व नोबल रेड एडिशन्‍स आणि पर्ल सिल्‍व्‍हर व्‍हाइट कलर ट्रिममध्‍ये डेस्टिनी एक्‍सटेक खरेदी करू शकतील.

सणासुदीच्‍या काळामध्‍ये एचएफ डिलक्‍ससाठी नवीन कॅन्‍व्‍हास स्‍ट्राइप ट्रिम्‍स, सुपर स्‍प्‍लेण्‍डर एक्‍सटेकसाठी नवीन मॅट नेक्‍सस ब्‍ल्‍यू ट्रिमचे आणि स्‍प्‍लेण्‍डर+ व स्‍प्‍लेण्‍डर+ एक्‍सटेकसाठी नवीन ट्रिम्‍सचे सादरीकरण पाहायला मिळेल. पॅशन+ व पॅशन एक्‍सटेक अनुक्रमे ब्‍लॅक ग्रे व मॅट अॅक्सिस ग्रे ट्रिम्‍समध्‍ये उपलब्‍ध असतील.

हिरो मोटोकॉर्प अनेक नवीन फायदे देखील देईल, जसे जवळपास ५५०० रूपयांपर्यंत* कॅश बोनस व जवळपास ३००० रूपयांपर्यंत*एक्‍स्‍चेंज बोनस आणि उत्‍साहवर्धक आर्थिक योजना बाय नाऊ, पे इन २०२४. ग्राहकांना ६.९९ टक्‍के इतक्‍या कमी व्‍याजदरामध्‍ये कर्ज घेण्‍याची संधी देखील असेल, ज्‍यामध्‍ये हायपोथेकेशन शुल्‍काचा समावेश नाही, तसेच आधार-आधारित कर्ज व सोईस्‍कर कॅश ईएमआयमधून देखील फायदा मिळू शकतो.

हिरो मोटोकॉर्पने जीआयएफटी २०२३ उपक्रमाचा प्रचार करण्‍यासाठी टीव्‍ही, प्रिंट, डिजिटल व ओओएचवर भारतभरात ३६०-डिग्री कॅम्‍पेनचे नियोजन देखील केले आहे. क्रिकेट हंगामामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करत कॅम्‍पेन सुरू असलेल्‍या आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कप २०२३च्‍या टेलिव्हिजन प्रसारणावर देखील दाखवली जाईल. 

 

Related posts

यामाहा ने युवा ग्राहकों के लिए लॉन्च किया ‘द कॉल ऑफ द ब्लू’ वर्जन 4.0 ब्रांड

Shivani Shetty

एरिओवेदासह लाइफसेलचा स्किनकेअर क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

टाटा मोटर्स साजरा करत आहे आयएलएमसीव्‍ही श्रेणीमधील १५ लाख ट्रक्‍सच्‍या ऐतिहासिक विक्रीचा टप्‍पा

Shivani Shetty

Leave a Comment