maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ऑडी इंडियाकडून २०२३ मध्‍ये ८९ टक्‍के वाढीची नोंद


मुंबई, ५ जानेवारी २०२४: ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज जानेवारी ते डिसेंबर २०२३ कालावधीत ७,९३१ युनिट्सची विक्री करत ८९ टक्‍क्‍यांच्‍या प्रबळ वाढीची घोषणा केली. या सकारात्‍मक वाढीचे श्रेय लाँच करण्‍यात आलेली तीन नवीन उत्‍पादने: ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक, ऑडी क्‍यू८ ई-ट्रॉन व ऑडी क्‍यू८ स्‍पोर्टबॅक ई-ट्रॉन, तसेच सर्वाधिक विक्री होणाऱ्या ऑडी ए४, ऑडी ए६ आणि ऑडी क्‍यू५ यांच्‍यासाठी सातत्‍यपूर्ण मागणीला जाते. टॉप-ऑफ-द-लाइन कार्स जसे ऑडी क्‍यू७, ऑडी क्‍यू८, ऑडी ए८ एल, ऑडी एस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस५ स्‍पोर्टबॅक, ऑडी आरएस क्‍यू८, ऑडी ई-ट्रॉन जीटी आणि ऑडी आरएस ई-ट्रॉन जीटी यांच्‍यासाठी प्रबळ मागणी कायम राहिली.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ”२०२३ आमच्‍यासाठी आणखी एक यशस्‍वी वर्ष ठरले आणि आमच्‍या वैविध्‍यपूर्ण व इच्छित उत्‍पादन पोर्टफोलिओला प्रबळ मागणी मिळत आहे. आम्‍ही इंडस्‍ट्री-फर्स्‍ट उपक्रम राबवत आणि अद्वितीय लक्‍झरी अनुभव देत प्रगतीच्‍या दिेशेने स्थिर गतीने वाटचाल करत आहोत. आमची रिटेल उपस्थिती वाढत आहे, जेथे देशभरात एकूण ६४ टचपॉइण्‍ट्स (शोरूम्‍स व वर्कशॉप्‍ससह) आणि २५ ऑडी अप्रूव्‍ह्ड: प्‍लस शोरूम्‍ससह वर्षाचा शेवट झाला. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ही गती २०२४ देखील कायम राहिल.”

ऑडी इंडियाने नवीन उत्‍पादन लाँचेस, १७ कार्सचा प्रबळ उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि उद्योगातील सर्वोत्तम ग्राहक ऑफरिंग्‍जच्‍या आधारावर प्रबळ कामगिरी कायम ठेवली.

२०२३ च्‍या चौथ्‍या तिमाहीत ९४ टक्‍के वाढीसह २,४०१ रिटेल युनिट्सची विक्री झाली. एसयूव्‍ही श्रेणीने १७४ टक्‍के वाढीची नोंद केली तर परफॉर्मन्‍स व लाइफस्‍टाइल कार्ससह ई-ट्रॉन श्रेणीमध्‍ये ४० टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली. तसेच प्रत्‍येक चारपैकी एक ग्राहक रिपीट ऑडी ग्राहक आहे.

ऑडी अप्रूव्‍ह्ड:प्‍लस या पूर्व-मालकीच्‍या कार व्‍यवसायाने २०२३ मध्‍ये ६२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद केली. सध्‍या देशातील सर्व प्रमुख हब्‍समध्‍ये २५ ऑडी अप्रूव्‍ह्ड-प्‍लससह कार्यरत असलेला ब्रॅण्‍ड या वर्षात विस्‍तार करेल आणि अधिकाधिक पूर्व-मालकीच्‍या कार सुविधांना सादर करेल.

२०२३ मध्‍ये ऑडी इंडियाने अनेक ग्राहक-केंद्रित उपक्रम व ऑफरिंग्‍ज सादर केल्‍या, जसे मायऑडी कनेक्‍ट अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’ सादर केले. हे वन-स्‍टॉप सोल्‍यूशन ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना एकाच अॅपमध्‍ये अनेक इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग सहयोगींची माहिती उपलब्‍ध करून देते. ‘चार्ज माय ऑडी’ हा इंडस्‍ट्री-फर्स्‍ट उपक्रम आहे, जो ग्राहकांसाठी सोयीसुविधेमध्‍ये वाढ करतो. न्‍यूमोसिटी टेक्‍नॉलॉजीज ईएमएसपी रोमिंग प्‍लॅटफॉर्मद्वारे समर्थित अॅप्‍लीकेशनमध्‍ये सध्‍या पाच चार्जिंग सहयोगींचा समावेश आहे – आर्गो ईव्‍ही स्‍मार्ट, चार्ज झोन, रिलक्‍स इलेक्ट्रिक, लायनचार्ज आणि झिऑन चार्जिंग. ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांना मार्च २०२४ पर्यंत नेटवर्कमधील (झिओन चार्जिंग वगळून) कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी चार्जिंगचा फायदा मिळेल. सध्‍या, ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी १,००० हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्‍ध आहेत आणि पुढील काही महिन्‍यांमध्‍ये अधिक चार्ज पॉइण्‍ट्सची भर करण्‍यात येईल.

ऑडीच्‍या शाश्‍वततेवरील फोकसशी बांधील राहत ऑडी इंडियाने नुकतेच बांद्रा कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स (बीकेसी), मुंबई येथे भारतातील पहिल्‍या अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन केले. चार्जझोनसोबत सहयोगाने संकल्‍पना मांडण्‍यासह विकसित करण्‍यात आलेल्‍या या अल्ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनची इलेक्ट्रिक वेईकलाला ३६० केडब्‍ल्‍यू शक्‍ती वितरित करण्‍यासाठी एकूण ४५० केडब्‍ल्‍यूची प्रभावी क्षमता आहे आणि उच्‍च परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेच्‍या खात्रीसाठी ५०० एएमपीएस लिक्विड-कूल्‍ड गनसह सक्षम आहे. तसेच ग्रीन एनर्जीची शक्‍ती असलेल्‍या या अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनमध्‍ये सोलार रूफ आहे, जे स्‍टेशनला प्रकाशमय करण्‍यासारख्‍या पेरिफेरल इलेक्ट्रिकल आवश्‍यकतांच्‍या कार्यसंचालनांना साह्य करते. ११४ केडब्‍ल्‍यू बॅटरी (भारतातील पॅसेंजर वेईकलमध्‍ये सर्वात मोठी बॅटरी) असलेल्‍या ऑडी क्‍यू८ ५५ ई-ट्रॉनला फक्‍त २६ मिनिटांमध्‍ये २० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करता येऊ शकते.

Related posts

ऑडी इंडियाने ‘ऑडी क्‍यू७ बोल्‍ड एडिशन’ लाँच केले

Shivani Shetty

डिजिकोअरची अँकर गुंतवणूकदारांकडून निधी उभारणी

Shivani Shetty

राज्यातील तरुणांच्या रोजगारक्षमतेची व्याप्ती वाढवण्यावर भर: चंद्रकांतदादा पाटील

Shivani Shetty

Leave a Comment