maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍सच्या बुकिंगला सुरूवात

मुंबई, २८ जानेवारी २०२५:* ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍ससाठी बुकिंगला सुरूवात केली. ही एसयूव्‍ही ऑडी इंडिया वेबसाइट किंवा ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅप्‍लीकेशनच्‍या माध्‍यमातून ५,००,००० रूपयांच्‍या प्रारंभिक बुकिंग रकमेसह बुक करता येऊ शकते.

 

६४० एचपी शक्‍ती आणि ८५० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे शक्तिशाली ४.० लीटर व्‍ही८ टीएफएसआय इंजिन असलेली नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स फक्‍त ३.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करू शकते आणि ऑप्‍शनल पॅकेजसह अव्‍वल गती ३०५ किमी/तास आहे.

 

*ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों* म्‍हणाले, “नवीन ऑडी आरएस क्‍यू८ सर्वोत्तम परफॉर्मन्‍सची एसयूव्‍ही रचना आहे, जिच्‍यामध्‍ये अविश्‍वसनीय शक्‍ती आणि दैनंदिन उपयुक्‍ततेचे एकत्रिकरण आहे. या एसयूव्‍हीचा विशिष्‍ट लुक आणि सर्वोत्तम ड्रायव्हिंग विशिष्‍टता लक्‍झरी व उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभवाचा शोध घेणारा परफॉर्मन्‍स चाहत्‍यांच्‍या नवीन पिढीचे लक्ष वेधून घेतात. सुधारित वैशिष्‍ट्ये आणि सर्वात शक्तिशाली इंजिनसह नवीन ऑडी आरएस क्‍यू८ परफॉर्मन्‍स अद्वितीय ड्रायव्हिंग अनुभव देते, जे सूक्ष्‍मदर्शी ग्राहक ऑडी आरएस श्रेणी उत्‍पादनाकडून मागणी करत आहेत. आम्‍हाला सांगताना आनंद होत आहे की, बुकिंग्‍जना आता सुरूवात झाली आहे, ज्‍यामुळे स्‍पोर्ट्स कारप्रेमींनी लवकरात लवकर कार बुक करा, कारण ही कार मर्यादित प्रमाणात उपलब्‍ध आहे.”

 

ग्राहक ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्‍ट’ अॅपद्वारे ऑनलाइन बुकिंग्‍जच्‍या माध्‍यमातून ऑडी आरएस क्‍यू८ बुक करू शकतात.

Related posts

कोस्‍टा कॉफीचे भारतीय बॅरिस्‍टा ऑलिम्पिक गेम्‍स पॅरिस २०२४ मध्‍ये ऑफिशियल कॉफी पार्टनर म्‍हणून चमकणार

Shivani Shetty

मिआने मुंबईत सुरु केले फ्लॅगशिप स्टोर

Shivani Shetty

टाटा न्यू ऐप पर जीवन बीमा उत्पाद किए लॉन्च

Shivani Shetty

Leave a Comment