डेटा खासगीत्व सप्ताह (डेटा प्रायव्हसी वीक) हा आपल्या व्यक्तिगत व आर्थिक माहितीच्या संरक्षणासाठी सक्रिय उपाय करण्याची आठवण करून देण्याचे काम करतो. आपली जीवनपद्धती अधिकाधिक डिजिटल होत असल्याने ऑनलाइन धोकेही त्याच वेगाने दिसून येत आहेत. डेटा गळती तसेच नियमभंगांची प्रकरणे वाढत असताना आपले खासगीत्व कशा पद्धतीने जपावे हे माहीत करून घेणे आजवर कधीही नव्हते एवढे महत्त्वाचे झाले आहे. आपली आर्थिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी काही सुलभ, अंमलात आणण्यास सोप्या टिप्स देऊन व्हिसा आपल्याला मदत करत आहे.
१. संरक्षित ऑनलाइन पेमेंट्ससाठी टोकनायझेशनचा अवलंब करा: ऑनलाइन पेमेंट्स करण्यासाठी टोकनाइझ्ड कार्डांचा वापर केल्यास आपल्या व्यवहारांची व क्रेडेन्शिअल्सची सुरक्षितता वाढते. टोकनायझेशनमध्ये कार्डाच्या खऱ्या माहितीची जागा एक अनन्यसाधारण टोकन घेते, त्यामुळे डेटा चोरीचा धोका नाहीसा होतो. विनासायास ऑनलाइन खरेदीसाठी आपले कार्ड विश्वासार्ह वेबसाइट्सवरून टोकनाइझ करून घेण्याची सवय लावून घ्या.
२. आर्थिक व्यवहार करण्यासाठी सार्वजनिक वाय-फायचा वापर करणे टाळा: सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क्सचे हॅकिंग होण्याची शक्यता अधिक असते. हे नेटवर्क्स वापरून संवेदनशील व्यक्तिगत अकाउंट्स उघडणे किंवा आर्थिक व्यवहार करणे टाळा. सार्वजनिक वाय-फायचा वापर करणे अपरिहार्य असेल, तर संरक्षित, एनक्रिप्टेड कनेक्शनसाठी व्हीपीएनमार्फतच (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) कनेक्ट करा.
३. टू-फॅक्टर ऑथेण्टिकेशन सक्षम करा: यामुळे संरक्षणाचा एक अतिरिक्त स्तर मिळतो. हे केवळ तुमच्या पासवर्डसाठी आवश्यक आहे असे नव्हे तर ही एक दुय्यम पडताळणी पायरी आहे, उदाहरणार्थ, टेक्स्ट मेसेज कोड किंवा बायोमेट्रिक स्कॅन. आपल्या खात्याचे संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी ही सुविधा शक्य असेल तेथे सक्रिय करा.
४. भक्कम, अनन्यसाधारण पासवर्डचा वापर करा: अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी आवश्यक संरक्षणाचा पहिला स्तर म्हणजे अभेद्य पासवर्ड. प्रत्येक पासवर्ड जटील असेल आणि प्रत्येक खात्यासाठी वेगळा पासवर्ड असेल याची काळजी घ्या.
५. संरक्षित, विश्वासार्ह वेबसाइट्स व अॅप्स वापरा: पेमेंटसंदर्भात कोणतीही माहिती भरण्यापूर्वी वेबसाइट किंवा अॅप संरक्षित असल्याची खात्री करा. यूआरएलमध्ये “https://” पॅडलॉक प्रतिकासह असल्याचे बघून घ्या. वाईट हेतूने आर्थिक तपशीलांशी छेडछाड करणारे सॉफ्टवेअर्स टाळण्यासाठी अॅप स्टोअर किंवा गुगल प्ले यांसारख्या प्रतिष्ठित स्रोतांमधून अॅप्स डाउनलोड करा.
सजग आणि दक्ष राहून आपण सगळे एकत्रितपणे अधिक सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करू शकतो. आपली आर्थिक माहिती सुरक्षित राखण्यासाठी आजपासूनच या सूचना अंमलात आणणे सुरू करा आणि विनासायास सुरक्षित ऑनलाइन व्यवहारांचा आनंद लुटा