maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

इब्‍लू फिओ ई-स्‍कूटरच्‍या विक्रीला जबरदस्त प्रतिसाद

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३: गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहनांच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतभरात धनत्रयोदशीच्‍या शुभप्रसंगी त्‍यांची फ्लॅगशिप ई-स्‍कूटर इब्‍लू फिओच्‍या १०० युनिट्सची डिलिव्‍हरी यशस्‍वीरित्‍या केल्‍याची घोषणा केली आहे.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. हैदर खान म्‍हणाले, “धनत्रयोदशी भारतातील लोकांसाठी समृद्धतेचा काळ आहे आणि या शुभप्रसंगी १०० युनिट्सच्‍या डिलिव्‍हरीचा टप्‍पा संपादित केलेल्‍या गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्ससाठी अभिमानास्‍पद क्षण आहे. हा ग्राहकांना अत्‍याधुनिक इलेक्ट्रिक वेईकल्‍स प्रदान करण्‍याच्‍या आमच्‍या प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे, ज्‍यामुळे ईव्‍हींच्‍या अवलंबतेला चालना मिळेल आणि सहयोगाने शाश्‍वत भविष्‍याच्‍या दिशेने वाटचाल करता येईल.”

५ तास २५ मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होणारी २.५२ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी, प्रभावी ११० किमी रेंज आणि ६० किमी/तास अव्‍वल गती अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेल्‍या क्रांतिकारी ऑफरिंग इब्‍लू फिओचे देशभरातील ग्राहकांनी भरभरून कौतुक केले आहे. ९९,९९९ रूपये किमतीसह सिंगल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये उपलब्‍ध इब्‍लू फिओ सियान ब्‍ल्‍यू, वाइन रेड, जेट ब्‍लॅक, टेलि ग्रे आणि ट्रॅफिक व्‍हाइट या पाच आकर्षक रंगांमध्‍ये येते. नाविन्‍यतेला सादर करणाऱ्या या ई-स्‍कूटरमध्‍ये सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी एर्गोनॉमिक डिझाइन, सुलभ नेव्हिगेशनसाठी ब्‍लूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आहे, तसेच इतर अनेक लक्षवेधक वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्‍प्‍ले, जे राइडर्सना इनकमिंग मेसेसेज, कॉल्‍स, बॅटरी एसओसी बाबत सूचित करते आणि विविध फंक्‍शन्‍ससाठी सेन्‍सर्स देखील आहेत.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने भारतभरात ५० डिलरशिप्‍स स्‍थापित केले आहेत आणि इब्‍लू फिओवर विशेष ३ वर्षांची वॉरंटी देते. खरेदी अनुभव अधिक सोईस्‍कर करण्‍यासाठी गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने आयडीबीआय बँक, बजाज फिनसर्व्‍ह, कोटक महिंद्रा बँक, छत्तीसगड ग्रामीण बँक अशा आघाडीच्‍या संस्‍थांसोबत सहयोग केला आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना आकर्षक आर्थिक पर्याय उपलब्‍ध होतील.

Related posts

महिला किसान दिवस साजरा करत कोका-कोलाची महिला शेतकऱ्यांना कलात्‍मक मानवंदना

Shivani Shetty

रिषभ पंतच्‍या गाथेने सुरक्षित भविष्‍यासाठी एचडीएफसी लाइफची नवीन मोहिम लाँच

Shivani Shetty

प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलत

Shivani Shetty

Leave a Comment