maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नवे सर्वेक्षण व “चक्कर को चेक कर” मोहिमेच्या साथीने अबॉट देत आहे व्हर्टिगो आजार समजून घेण्यास चालना

मुंबई,   जुलै २०२४जागतिक आरोग्यक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अबॉटने भारतातील सुमारे कोटी लोकांना प्रभावित करणारा मात्र बहुतेकदा दुर्लक्षित राहून जाणारा संतुलनाशी संबंधित आजार व्हर्टिगोला ठळकपणे प्रकाशझोतात आणण्यासाठी चक्कर को चेक कर नावाची मोहीम सुरू केली आहे. व्हर्टिगो म्हणजे एक अशी स्थिती, ज्यात लोकांना आपल्या अवतीभोवतीचे जग गरगरत असल्यासारखे वाटते. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना आपल्या आरोग्याचे नियंत्रण आपल्या हातात घेता यावे आणि या स्थितीचे अधिक चांगले व्यवस्थापन करता यावे यासाठी त्यांची मदत करण्याचे अबॉटचे लक्ष्य आहे.

जगाला व्हर्टिगोच्या दिशाभूल करणाऱ्या वास्तवाकडे पाहण्याचा एक झरोका उघडून देण्यासाठी अबॉटने डिजिल फिल्मच्या माध्यमातून या मोहिमेची शानदार सुरुवात केली. या फिल्ममध्ये बॉलीवूड अभिनेता आणि युनिसेफचा भारतातील राजदूत आयुष्मा खुरानाचा समावेश आहे. व्हर्टिगोमुळे अचानक चक्कर येण्याच्या प्रकारांमुळे जगण्याचा तोल कसा बिघडून जाऊ शकतो याचे प्रत्ययकारी चित्रण या फिल्ममध्ये करण्यात आले आहे आणि या अनुभवातून गेलेल्या व्यक्तींना कृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हर्टिगोचा वैयक्तिक अनुभव सांगताना आयुष्मान खुराना यांनी सांगितले, व्हर्टिगोचा सामना करणे हे ए आव्हान होते, पण त्या अनुभवाने मला चिकाटीमधील शक्ती कळून आली. २०१६ मध्ये मला व्हर्टिगो असल्याचे निदान झाले. तेव्हा झटक्यात केलेल्या कोणत्याही हालचालीमुळे माझ्या ओवतीभोवतीचे जग गरगरायचे. सतत सुरू असलेल्या धावपळीच्या फिल्म चित्रिकरणादरम्यान अचानक कधीही चक्कर येण्याची सततची भीती मनावर दडपण आणायची. मात्र योग्य औषधोपचार शोधल्याने आणि ध्यानधारणेची सवय लावून घेतल्याने मला ही स्थिती पूर्णपणे हाताळण्यास मदत झाली. ही स्थिती हाताळायला कठीण आहे असे आपल्याला वाटू शकते पण ही एक अशी लढाई आहे, जी तुम्ही निश्चित जिंकू शकता हे इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. माझी ही वाटचाल इतरांना हवी असलेली मदत शोधण्याची आणि नव्या आत्मविश्वासाने आपल्या जगण्यातून मार्ग शोधण्याची प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे.

त्यांचा अनुभव असाधारण नाही. लक्षावधी लोक मूकपणे या स्थितीचा सामना करत आहेत आणि त्याला नेहमीची साधी क्कर समजत आहेत. योग्य वेळी योग्य निदान योग्य उपचार मिळणे आणि जीवनशैलीमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे हे या स्थितीच्या व्यवस्थापनासाठी आणि आपल्या आरोग्यावर नियंत्रण राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

अधिक माहिती

अबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. जेजो करणकुमार पुढे म्हणाले, सुमारे कोटी भारतीयांना व्हर्टिगोचा अनुभव येतो. संतुलनाशी संबंधित हा आजार लोकांच्या जीवनमानाच्या दर्जावर परिणाम करू शकतो हे खरे असले तरी त्याचे व्यवस्थापन शक्य आहे. व्हर्टिगोसोबत जगणाऱ्या व्यक्तींना वेळच्यावेळी वैद्यकीय सल्ला मिळावा आणि त्यांना एक परिपूर्ण आयुष्य जगता यावे यासाठी त्यांना या आजाराची लक्षणे ओळखण्यास मदत करणाऱ्या माहिती व साधनांनी सुसज्ज बनवून त्यांची या आजारासोबतची वाटचाल सोपी करणे हे अबॉटचे लक्ष्य आहे.

या मोहिमेचा एक अविभाज्य भाग म्हणजे अबॉटने IQVIAच्या सहयोगाने हाती घेतलेला एक सर्व्हे. या सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षांमुळे भारतात व्हर्टिगोसोबत जगणाऱ्या व्यक्तींचे वास्तव समजून घेण्यास मदत होते. हे सर्वेक्षण मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे करण्यात आले, ज्यात १२५० व्यक्तींकडून माहिती मिळविण्यात आली. यात व्हर्टिगोचे रुग्ण आणि अशा व्यक्तींची काळजी घेणाऱ्या व्यक्ती तसेच कुटुंबामध्ये गरगरण्याचा अनुभव येत असलेल्या आणि अद्यापही या स्थितीचे निदान करून न घेतलेल्या सदस्यांचा समावेश होता.

व्हर्टिगो: एक लक्षणीय संघर्ष

कल्पना करा, आपल्याभोवतीचे जग अनियंत्रितपणे गरगरत आहे, त्यामुळे डोकेदुखी होत आहे, दुहेरी प्रतिमा दिसत आहेत आणि नजरेसमोर अंधारी आल्यासारखे वाटत आहे. व्हर्टिगोसोबत जगणाऱ्यांसाठी अशी स्थिती वास्तवात असते. या स्थितीचा लोकांच्या आयुष्यावर वैयक्तिकरित्या काय परिणाम होतो, तसेच त्यांच्या अवतीभोवती असलेल्या माणसांचे जगही त्यामुळे कसे प्रभावित होते यावर अबॉट आणि IQVIA च्या सर्वेक्षणातून प्रकाशझोत टाकला गेला आहे.

वैयक्तिक आयुष्य: व्हर्टिगोमुळे फक्त गरगरत नाही तर त्याचा माणसांच्या वैयक्तिक आयुष्यावरही लक्षणीय परिणाम होतो, ज्यातील ३४ टक्‍केलोकांना आयुष्यातील प्रमुख कामे रद्द करावी लागतात, ३३ टक्‍केलोकांना वारंवार राग येतो किंवा चिडचिडेपणा जाणवतो आणि २६ टक्‍केलोकांना आपल्या कुटुंबीयांबरोबरच्या नात्याचे नुकसान होईल, अशी भीती वाटते.
निमित्ते : व्हर्टिगोला निमित्त ठरणाऱ्या प्रमुख कारणांमध्ये चिंता किंवा ताणतणाव (३९ टक्‍के), प्रवास (३४ टक्‍के), आणि हवामानातील बदल (३० टक्‍के) यांचा समावेश होतो.
लक्षणे: व्हर्टिगोच्या प्रत्येक झटक्यामध्ये अनेक लक्षणे समोर येऊ शकतात, ज्यात डोकेदुखी (५२ टक्‍के), दुहेरी प्रतिमा दिसणे (४३ टक्‍के), अंधारी आल्यासारखे वाटणे (४० टक्‍के), डोके जड होणे (३७ टक्‍के), आणि मान दुखणे (२८ टक्‍के) यांचा समावेश असतो.
कौटुंबिक आयुष्य आणि प्रवास : व्हर्टिगोमुळे रुग्णाच्या आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो (२३ टक्‍के) आणि कुटुंबाबरोबर घालवायचा वेळ कमी होऊ शकतो (२३ टक्‍के). तसेच यामुळे सार्वजनिक वाहनांतून प्रवास किंवा विमानप्रवास करताना अस्वस्थ वाटू शकते. (१९ टक्‍के)

हे सर्व परिणाम होत असूनही गरगरल्यासारखे जाणवत असलेल्या लोकांपैकी केवळ ४८ टक्‍के लोकांच्याच लक्षणांची तपासणी होते. सरासरी ३८व्या वर्षी व्हर्टिगोचे निदान होते, ज्यातील एक चतुर्थांश रुग्णांमहिन्यातून एकदा याचा झटका येतो. व्हर्टिगोविषयी अनेक भ्रामक समजूती लोकांच्या मनात आहेत. २१ टक्‍के रुग्णांच्या मते हा आजार फक्त वयोवृद्ध व्यक्तींनाच होतो तसेच या आजार बरा होऊ शकत नाही व तो संसर्गजन्य आहे अशी समजूत १५ टक्‍के लोकांमध्ये आढळते. व्हर्टिगोच्या झटक्यांची शक्यता कमीतकमी असावी यासाठी वाहनातून प्रवास टाळावा लागणे (३४टक्‍के) स्क्रीन टाइम कमी करणे (३० टक्‍के) इत्यादी दूरगामी परिणाम रुग्णांच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ शकतात, तरीही त्यांच्यापैकी केवळ निम्मे लोकच औषधे घेतात. ही आकडेवारी व्हर्टिगोसोबत जगणाऱ्यांना सामोऱ्या येणाऱ्या छुप्या संघर्षांचे चित्र ठळकपणे रेखाटते.  

अधिक माहिती

या सर्वेक्षणामुळे मुंबईतून काही रोचक तथ्ये हाती आली. विशेषत:उदाहरणार्थ, व्हर्टिगोचा या प्रांतात राहणाऱ्या रुग्णांच्या व्यावसायिक आयुष्यावर मोठा परिणाम झालेला दिसला, ज्यात कामात लक्ष न लागल्याने कामगिरी खालावणे (२० टक्‍के), तसेच करिअर पुढे जाण्यामध्ये अडथळा निर्माण होणे (१६ टक्‍के) या गोष्टींचा समावेश होतो. इतकेच नव्हे तर या शहरामध्ये व्हर्टिगोग्रस्त व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होताना दिसला: ३६ टक्‍के लोकांना महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करावे लागल्याचे दिसले तर २८ टक्‍के व्यक्तींना वारंवार राग येत असल्याचे किंवा चिडचिड होत असल्याचे दिसून आले.

या जागरुकता उपक्रमाचा एक भाग म्हणून, अबॉटने एक ऑनलाइन मूल्यमापनाचे साधनही उपलब्ध करून दिले आहे. लोकांना व्हर्टिगोची लक्षणे ओळखण्यास मदत करणारा आणि आजाराच्या लवकरात लवकर निदानाला मदत करणारा हा एक चॅटबॉट आधारित सर्व्हे आहे. या सर्व्हे भाषांमध्ये उपलब्ध आहे. (इंग्रजी, हिंदी, मल्याळम, कन्नड, तेलुगू , तामीळ आणि बेंगाली) व तो तुम्हाला इथे मिळू शकेल : LINK.

मोहिमेसाठी बनविण्यात आलेली फिल्म तुम्ही इथे पाहू शकता: LINK

अबॉट विषयी:

अबॉट ही एक जागतिक आरोग्यसेवाक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे, जी लोकांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक भरभरून जगण्यास मदत करते. लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणाऱ्या आमच्या तंत्रज्ञानांच्या संच आरोग्यसेवाक्षेत्राच्या सर्व स्तरांना सामावून घेणारा आहे, ज्यात निदान, वैद्यकीय उपकरणे, पोषण आणि ब्रॅण्डेड जेनेरिक औषधांच्या क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग आणि उत्पादनांचा समावेश आहे. आमचे ११४,०००सहकारी १६० हून अधिक देशांतील लोकांना सेवा पुरवितात. १९१० साली भारतामध्ये अबॉटची स्थापना झाली आणि ही कंपनी देशाच्या काही सर्वात जुन्या सर्वाधिक कौतुक मिळविणाऱ्या हेल्थकेअर कंपन्यांपैकी एक आहे. देशातील १२००० कर्मचाऱ्यांच्या साधीने अबॉट संपूर्ण शहरी आणि ग्रामीण भारतातील ग्राहक, रुग्ण आणि डॉक्टरांच्या आरोग्यविषयक गरजांच्या पूर्ततेमध्ये मदत करत आहे.

आपण आमच्याशी www.abbott.com आणि www.abbott.in, आणिFacebook आणि India Facebook, LinkedIn, Instagram, X आणिYouTube येथे जोडले जाऊ शकता.

या मजकूरामध्ये उल्लेखलेली माहिती केवळ सूचक/रुग्णांच्या शिक्षणासाठी आहे आणि तिच्याकडे डॉक्टरांचा सल्ला किंवा अबॉटच्या शिफारशींप्रमाणे पाहू नये. अधिक माहितीसाठी कृपया आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Related posts

नेक्‍स्‍टवेव्‍हच्‍या संस्‍थापकांचा प्रतिष्ठित फोर्ब्‍स इंडिया ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मान

Shivani Shetty

ऑडी इंडियाकडून २०२३ मध्‍ये ८९ टक्‍के वाढीची नोंद

Shivani Shetty

गिरनार एलिव्हेट समिट २०२४चे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment