मुंबई, ४ जुलै २०२४: भारतातील आघाडीची ऑनलाइन हेल्थकेअर शिक्षण व वैद्यकीय अपस्किलिंग कंपनी ओसी अॅकॅडमी आणि आघाडीची इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रेनिंग प्रोव्हायडर स्टडीमेडिक यांनी रॉयल कॉलेज मेम्बरशीप्स अँड फेलोशीप्स एक्झामिनेशन ट्रेनिंगसह एकीकृत परिवर्तनात्मक क्लिनिकल फेलोशीप प्रोग्राम्स लाँच केले आहेत. या प्रोग्रामचा वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या करिअर्सना नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव, कौशल्ये व जागतिक मान्यतेसह सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
हा द्विवार्षिक प्रोग्राम भारतभरातील अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये सर्वसमावेशक पायाभूत ऑनलाइन शिक्षण, प्रत्यक्ष वैद्यकीय प्रशिक्षणाचे अद्वितीय संयोजन देतो, ज्यामुळे उमेदवार रॉयल कॉलेज मेम्बरशीप्स अँड फेलोशीप्स एक्झामिनेशनसह एकीकृत प्रतिष्ठित रॉयल कॉलेज मेम्बरशीप्स अँड फेलोशीप्स क्लिनिकल फेलोशीप प्रोग्राम्ससाठी सुसज्ज होतात. या परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यास प्रतिष्ठित रॉयल कॉलेज मेम्बरशीप्स व फेलोशीप्स मिळतील. यामुळे एमबीबीएस पदवीधरांना स्पेशालिस्ट करिअरसाठी पर्यायी मार्ग मिळतो. यूके (युनायटेड किंग्डम) संस्थांद्वारे प्रशासित या पात्रता जागतिक स्तरावर (भारत, मिडल ईस्ट कंट्रीजसह) मान्यताप्राप्त आहेत, ज्यामुळे भारतीय डॉक्टरांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय शिक्षणाच्या संधी खुल्या होत आहेत.
हा प्रोग्राम स्पेशालिटी कोर्सेसची वैविध्यपूर्ण श्रेणी देतो, ज्यामध्ये ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी, एमर्जन्सी मेडिसीन, पेडिएट्रिक्स, सर्जरी, ऑर्थोपेडिक्स, रेडिओलॉजी, पीएलएबी यांचा समावेश आहे. प्रत्येक कोर्स उमेदवारांना एमआरसीओजी, एमआरसीईएम, एमआरसीपीसीएच, एमआरसीएस, एफआरसीआर व पीएलएबी अशा संबंधित रॉयल कॉलेज परीक्षांसाठी सुसज्ज करण्याकरिता बारकाईने डिझाइन करण्यात आले आहेत.
ओसी अॅकॅडमीचे संस्थापक व सीईओ बाळू रामचंद्रन म्हणाले, ”आमचा प्रोग्राम प्रख्यात प्राध्यापकवर्गाकडून शिकवले जाणारे सर्वसमावेशक व संरचित अभ्यासक्रम देतो, ज्यामध्ये वैद्यकीय प्रशिक्षण, लाइव्ह इंटरअॅक्टिव्ह सेशन्स आणि सर्वसमावेशक स्टडी मटेरिअल्सचा समावेश आहे, जे प्रतिष्ठित व जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त रॉयल कॉलेज मेम्बरशीप्ससह निवडलेल्या स्पेशालिटीमधील व्यावहारिक कौशल्ये देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.”
स्टडीमेडिकच्या सह-संस्थापक व सीओओ डॉ. सौम्या एनएस म्हणाल्या, ”आमच्या कोर्सेसनी जगभरातील वैद्यकीय पदवीधरांना सातत्याने अपवादात्मक मूल्य, दर्जा व यश दिले आहे. अपवादात्मक ट्रॅक रेकॉर्डसह आम्हाला आता ओसी अॅकॅडमीसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. सहयोगाने, आम्ही वैद्यकीय विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या कौशल्य वाढीच्या माध्यमातून यूके मेम्बरशीप व फेलोशीप प्रोग्राम्सने संपादित करण्यास व मार्गदर्शन करण्याप्रती कटिबद्ध आहोत. हे आमचे वचन आहे.”