मुंबई : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी जीवनाची अखेर केली. राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी घेत पोरवाल यांनी आयुष्य संपवलं.दक्षिण मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बिल्डर म्हणून पारस पोरवाल यांची ओळख होती. मात्र त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोरवाल यांच्याजवळ कुठलीही सुसाईड नोटही सापडलेली नाही.
भायखळा येथील राहत्या इमारतीच्या २३ व्या मजल्यावरील घरातून सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास पोरवाल यांनी उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येने पोरवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसंच बिल्डर वर्तुळातही या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पारस पोरवाल यांनी दक्षिण मुंबईत अनेक इमारती बांधल्या आहेत.
दरम्यान, पोरवाल यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, व्यावसायिक भागीदार यांच्याकडे चौकशी केली जात आहे. ते कुठल्या तणावात होते का, त्यांना कुठल्या गोष्टीची चिंता सतावत होती का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा : राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता; ‘या’ दिवसांत रुग्णवाढीचा अंदाज