maharashtraprimenews
ठळक बातम्या
अंबरनाथआंतरराष्ट्रीयआरोग्य वार्ताउल्हासनगरकर्जतकलाकल्याणकोकणकोल्हापूरक्रीडागुजरातगुन्हेचित्रपटजळगावठळक बातम्याठाणेडोंबिवलीदिल्लीनवी दिल्लीनवी मुंबईनागपूरनाटकनांदेडनालासोपारानाशिकनेरळपंढरपूरपनवेलपालघरपिंपरी/चिंचवडपुणेबदलापूरबॉलीवूडबोरगांव/माणगांवमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रमुंबईमुरुड/जंजिरारत्नागिरीरायगडराष्ट्रीयलेखवसईविदर्भविरारशहापूरसंपादकीयसांगलीसातारासाहित्यसोलापूरहॉलिवूड

अजित पवारांची फडणवीसांसोबत चर्चा; तर निरोपासाठी आलेल्या नार्वेकरांना शरद पवारांनी गाडीत बसवलं!

मुंबई : क्रिकेटपेक्षा राजकीय घडामोडींनीच सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) निवडणूक आज पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पवार-शेलार पॅनलकडून स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती. राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तसंच या कार्यक्रमानंतर घडलेल्या दोन घडामोडींचीही सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

राज्यात २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय केमिस्ट्रीबाबत नेहमीच चर्चा होते. काल झालेल्या कार्यक्रमावेळीही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची गरवारे क्लब येथे भेट झाली. देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीबाबत अजित पवार यांनी नंतर माध्यमांनाही माहिती दिली. ‘मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो नव्हतो. दिवाळीला मी जाणार होतो, त्यांनी मला सह्याद्री अतिथिगृहावर भेटायची वेळ दिली होती. मात्र नंतर ते म्हणाले की, एमसीएच्या कार्यक्रमाला मी आहे तर तुम्ही इथेच या,’ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी पण शेवटी शरद पवारांनी कॅच पकडलाच…!

दुसरीकडे, कार्यक्रम संपल्यानंतर निरोप देण्यासाठी गाडीपर्यंत आलेले शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गाडीत बसण्यास सांगितलं. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी पवार यांनी एमसीए निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कशी रणनीती असावी, याबाबत मिलिंद नार्वेकर यांना कानमंत्र दिल्याचं बोललं जात आहे.

पवार-शेलार गटाने ताकद लावली पणाला शरद पवार-आशिष शेलार गटाने निवडणुकीसाठी आपली ताकद पणास लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांच्या अंतराने दोनदा मतदारांशी संपर्क साधला आहे. शरद पवारही हेच करीत आहेत. हे लक्षात घेता पवार-शेलार गटास निवडणूक सोपी नसेल, याची जाणीव झाली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत निर्णायक ठरलेला महाडदळकर गटातील अनेक माजी पदाधिकारी मुंबई क्रिकेट गटात आहेत. त्यांचा अनेक क्लबशी नियमित संपर्क आहे. क्लबच्या तसेच खेळाडूंच्या दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी ते उपलब्ध असतात. ही बाबही निवडणुकीचा निर्णय करू शकेल.

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, शिवसेना जिल्हाप्रमुखाचे झेडपी सदस्यत्व रद्दराजकीय नेते आणि एमसीए निवडणूकशिवसेना नेते मनोहर जोशी यांनी १९९२च्या निवडणुकीत माधव मंत्री यांचा पराभव केला. त्यानंतर अजित वाडेकर (वि. शरद पवार) आणि दिलीप वेंगसरकर (वि. विलासराव देशमुख) हे माजी कसोटीपटू निवडणुकीत पराभूत झाले होते. आता भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील अध्य़क्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पवार-शेलार गटाच्या अमोल काळे यांना आव्हान देत आहेत. काळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असून त्यांच्यासाठी जवळपास सर्वच पक्ष एकत्र आले आहेत.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?- आज दुपारी ३ ते ६ मतदान

– मतदानासाठी कडेकोट बंदोबस्त, मतदारांना मोबाइलही मतदानाच्या ठिकाणी नेण्यास मनाई

– मतमोजणीच्यावेळी उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींनाही मोबाइलसाठी मनाई

– मतमोजणी नऊ टेबलवर होण्याची शक्यता. या प्रत्येक टेबलसाठी प्रतिनिधी नेमण्याची उमेदवारांना मुभा

– रात्री १० पर्यंत निकाल अपेक्षित

Related posts

मिलिंद सोमणनच्या लाइफलोंग ग्रीन राइड ३.० ला सुरुवात; निरोगी आणि हरित भारतासाठी मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरु !

Shivani Shetty

ऊषाची रिलायन्स डिजिटलसोबत भागीदारी, प्रीमिअम किचन अप्लायन्सेसची नवी आयशेफ रेंज सादर

Shivani Shetty

मुंबईत १७ नोव्हेंबरपासून ‘एशिया कोट इंक’ प्रदर्शनी

Shivani Shetty

Leave a Comment