मुंबई, २८ फेब्रुवारी २०२३: करेरा या प्रतिष्ठित इटालियन लाइफस्टाइल व स्पोर्ट्स आयवेअर ब्रॅण्डने ‘करेरा एक्स प्रोल’ आयवेअर कलेक्शन लॉन्च करण्यासाठी बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफचा प्रसिद्ध सक्रिय लाइफस्टाइल ब्रॅण्ड प्रोलसोबत सहयोगाची घोषणा केली आहे. या सहयोगाच्या माध्यमातून करेरा चा स्वत:च्या मर्जीप्रमाणे जीवन जगणाऱ्या आणि इतरांपेक्षा जीवनाप्रती वेगळा दृष्टीकोन असलेल्या महत्त्वाकांक्षी तरूण ग्राहक व मिलेनियल्स ग्रुपचे लक्ष वेधून घेण्याचा मनसुबा आहे. करेरा प्रोलचा चेहरा म्हणून टायगर श्रॉफ असण्यासह नवीन कलेक्शनमध्ये वेअर्सच्या स्टाइलची आकर्षक व अद्वितीय भावना समाविष्ट आहे आणि भारतभरात ब्रॅण्ड उपस्थिती प्रबळ करण्यासाठी सर्व माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येईल.
या सहयोगाच्या घोषणेबाबत सफीलो इंडिया प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष वैद्य म्हणाले, ‘‘भारतातील सर्वात आश्वासक जीवनशैली ब्रॅण्ड – टायगर श्रॉफच्या प्रोलसह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे, ज्याने अल्पावधीतच तरुणांमध्ये अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली आहे, जो समर्पणाचा प्रतीक आणि तरुणांसाठी योग्य जीवनशैली म्हणून उभा आहे. अनेकांना मार्गावर चालण्यासाठी सतत प्रेरणा देत आहे. प्रोल शक्ती, आत्मविश्वास आणि सातत्य या भावनांशी संलग्न आहे, ज्यामध्ये करेरा ची ब्रॅण्ड मूल्ये परिपूर्णपणे समाविष्ट आहेत. मला विश्वास आहे की, करेरा प्रोल कलेक्शन क्रीडा व जीवनशैली प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरेल आणि विशेषत: मिलेनियल्सकडून स्वीकारले जाईल. विशेषत: यामागे असलेल्या टायगर सारख्या व्यक्तीसोबत, जो लहान मुले, तरुण आणि जनसामान्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे आहे, हा उत्साहवर्धक सहयोग असणार आहे.’’
टायगर श्रॉफ म्हणाला, ‘‘करेरा हे प्रोलचे परिपूर्ण मूर्त रूप आहे, जेथे ते त्यांच्या आकर्षक, उत्साही व नीडर दृष्टीकोनाशी संलग्न आहे. मला अग्रणी डिझाइनशी समानुपाती असण्यासोबत उत्तम वारसा असलेल्या आणि करेरा प्रोल कलेक्शन आत्मसात करण्यास अत्यंत उत्सुक असलेल्या करेरासोबत सहयोग करण्याबद्दल सन्माननीय वाटते. मला नेहमीच बाहेर फेरफटका मारायला आवडतो आणि आयवेअर हे खास आकर्षण आहे. करेरा प्रोल हे माझे वैयक्तिक रूप आहे आणि नेहमी व्यस्त असलेल्या तरूणांसाठी परिपूर्ण लाइफस्टाइल अॅक्सेसरी आहे.’’
करेरा एक्स प्रोल कलेक्शन:
करेरा प्रोलमधील सी लोगो ईजी सिरीज अधिक समकालीन पद्धतीने प्रतिष्ठित डिझाइन्सना मूर्त रूप देण्यासाठी नवीन सादर करण्यात आलेल्या सक्रिय संकल्पनेच्या सर्वात ओळखण्याजोग्या आकारांचे प्रतिनिधीत्व करते. तरूण व अधिक स्पोर्टिव्ह लक्ष्याप्रती समर्पित हे मॉडेल्स विरोधाभासी रंग आणि वजनाने हलके साहित्य असलेल्या स्पोर्ट्सवेअर उद्योगापासून प्रेरणा घेतात, ज्यामुळे ते अद्वितीय आहेत, ज्याचे श्रेय टेम्पल्सवरील प्रतिष्ठित सी लोगोला जाते.
करेरा एक्स प्रोलमधील बाय-इंजेक्टेड स्टाइल्समध्ये टेक्निकल वैशिष्ट्ये आहेत, जी एकत्रितपणे वेअररला आरामदायीपणा व टिकाऊपणासह परिपूर्ण फिटिंगची खात्री देततात. वरील बाजूस स्थिर हिंजेस् कोणत्याही आऊटडोअर स्पोर्ट्स अॅक्टिव्हीटीसाठी अतिरिक्त ग्रिपची खात्री देतात.