चेन्नई, 11 मार्च 2025* : इंडिया यामाहा मोटर (आयवायएम)ने आज त्यांची पहिली हायब्रिड मोटरसायकल २०२५ ‘FZ-S Fi Hybrid’च्या लाँचची घोषणा केली. या मोटरसायकलची किंमत 1,44,800 रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
२०२५ ‘FZ-S Fi Hybrid’मध्ये संतुलित व अत्याधुनिक डिझाइन आहे, तसेच टँक कव्हरवर आकर्षक कडांसह सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्या मोटरसायकलला स्लीक व आकर्षक लुक देतात, तसेच मोटरसायकलची सिग्नेचर उपस्थिती कायम ठेवण्यात आली आहे. प्रमुख डिझाइन अपडेटमध्ये एकीकृत फ्रण्ट टर्न सिग्नल्सचा समावेश आहे, जे आता एअर इनटेक क्षेत्रामध्ये स्थित करण्यात आले आहेत, ज्यामुळे मोटरसायकलची आक्रमकता व ऐरोडायनॅमिक अपीलमध्ये अधिक भर होते.
मोटरसायकलमध्ये १४९ सीसी ब्ल्यू कोअर इंजिनची शक्ती आहे, जे आता ओबीडी-२बी प्रमाणित आहे. तसेच मोटरसायकलमध्ये यामाहाचे स्मार्ट मोटर जनरेटर (एसएमजी) आणि स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम (एसएसएस) आहे. हे तंत्रज्ञान शांतमय स्टार्ट, बॅटरी-असिस्टेड अॅक्सेलरेशन आणि सुधारित इंधन कार्यक्षमता देते, जेथे इडलमध्ये इंजिन आपोआप बंद होते आणि जलद क्लच अॅक्शनसह पुन्हा सुरू होते.
राइडरच्या सोयीसुविधेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी नवीन ‘FZ-S Fi Hybrid’मध्ये ४.२-इंच फुल-कलर टीएफटी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आहे, जे वाय-कनेक्ट अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन्सशी विनासायासपणे एकीकृत होते. यामध्ये गुगल मॅप्सशी लिंक असलेले टर्न-बाय-टर्न (टीबीटी) नेव्हिगेशन आहे, जे रिअल-टाइम दिशा, नेव्हिगेशन इंडेक्स, इंटरसेक्शन तपशील व रस्त्यांची नावे दाखवते, ज्यामधून विनासायास राइडिंगचा अनुभव मिळतो.
लांबच्या प्रवासादरम्यान अधिक आरामदायीपणासाठी हँडलबार पोझीशन ऑप्टिमाइज करण्यात आली आहे. हँडलबारवरील स्विचेस् ग्लोव्ह्ज परिधान केल्यानंतर देखील उत्तम उपलब्धतेसाठी समायोजित करण्यात आले आहेत. तसेच, आरामदायीपणा व सुलभ वापरासाठी हॉर्न स्विचची जागा बदलण्यात आली आहे. फ्यूएल टँकमध्ये आता एअरप्लेन-स्टाइल फ्यूएल कॅप आहे, जी इंधन भरताना देखील जोडलेली राहते, ज्यामुळे व्यावहारिकतेमध्ये अधिक वाढ होते. नवीन २०२५ ‘FZ-S Fi Hybrid’ रेसिंग ब्ल्यू आणि सियान मेटलिक ग्रे या दोन आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे.
श्रेणीमधील पहिल्या हायब्रिड मोटरसायकलच्या लाँचप्रसंगी मत व्यक्त करत यामाहा मोटर इंडियाचे अध्यक्ष श्री. इतारू ओतानी म्हणाले, “एफझेड ब्रँडने भारतातील यामाहाच्या प्रवासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, तसेच ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा व व्यावहारिक आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक जनरेशनसह विकसित झाली आहे. या श्रेणीमध्ये हायब्रिड तंत्रज्ञान सादर करत आम्ही कार्यक्षमतेमध्ये वाढ करत आहोत, तसेच प्रगत, राइडर-केंद्रित नाविन्यता सादर करण्याप्रती आमची कटिबद्धता देखील दृढ करत आहोत. एफझेड सिरीजमधील प्रत्येक अपडेट ग्राहक अभिप्रायांनुसार करण्यात आले आहेत, ज्यामधून अधिक सुधारित, गतीशील व सर्वसमावेशक राइडिंग अनुभवाची खात्री मिळते. या लाँचमधील नाविन्यतेप्रती यामाहाची कटिबद्धता दिसून येते, जेथे प्रगत तंत्रज्ञानव राइडर-केंद्रित डिझाइन एकत्र येत गतीशीलतेच्या भविष्याला आकार देतात.”
२०२५ ‘FZ-S Fi Hybrid’च्या लाँचसह यामाहाने मोटरसायकलिंगच्या भविष्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे, जेथे कार्यक्षमता, परफॉर्मन्स व स्मार्ट कनेक्टीव्हिटी राइडिंग अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जातात.

previous post
next post