maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

व्हॉट्सअॅपने राष्ट्रीय सुरक्षितता मोहिम सुरू केली

भारत । जुलै, २०२४: व्‍हॉट्सअॅपने आज सुरक्षित संवादाच्‍या महत्त्वावर केंद्रित गोपनीयता मोहिम लाँच केली, ज्‍यामधून व्‍हॉट्सअॅपचे बहुस्‍तरीय संरक्षण व्‍यक्‍तींना मित्र, कुटुंब व व्‍यवसायासोबत संलग्‍न होताना त्‍यांच्‍या संवादांवर अधिक नियंत्रण आणि गोपनीयता देत असल्‍याचे दिसून येते. ही राष्‍ट्रीय मोहिम महाराष्‍ट्रात आणि ७ इतर राज्‍यांमध्‍ये ओओएच, प्रिंट, डिजिटल व सिनेमाच्‍या माध्‍यमातून राबवण्‍यात येईल.
ही मोहिम निदर्शनास आणते की व्‍हॉट्सअॅप घरापासून दूर राहणाऱ्या व्‍यक्‍तींसाठी प्रियजनांसोबत सर्वात खाजगी संवाद करताना सुरक्षितता निर्माण करते, तसेच नवीन समुदाय निर्माण करते आणि नवीन जीवनशैलीशी समायोजित होते. यामधून वर्षानुवर्षे भर करण्‍यात आलेल्‍या गोपनीयता व सुरक्षितता वैशिष्‍ट्यांच्‍या बिल्‍ट-इन स्‍तरांच्‍या माध्‍यमातून युजर-प्रायव्‍हसीप्रती व्‍हॉट्सअॅपची कटिबद्धता दिसून येते.
बीबीडीओ इंडियाची संकल्‍पना आणि प्रख्‍यात भारतीय चित्रपट दिग्‍दर्शक शिमित आमिन यांचे दिग्‍दर्शन असलेली जाहिरात तरूण माणसाच्‍या प्रवासाला सादर करते, जो व्‍यावसायिक शेफ बनण्‍याचे स्वप्‍न साकारण्‍यासाठी नवीन शहरामध्‍ये जातो. नवीन संस्‍कृतीशी जुळून जाण्‍याच्‍या, नवीन भाषा शिकण्‍याच्‍या आणि नवीन कामकाज वातावरणामध्‍ये यश संपादित करण्‍याच्‍या त्‍याच्‍या काही हृदयस्‍पर्शी आणि आव्‍हानात्‍मक क्षणांना सादर करत जाहिरातीमध्‍ये पाहायला मिळते की व्‍हॉट्सअॅप त्‍याला सर्वात असुरक्षित क्षणांमध्‍ये देखील प्रामाणिकपणा व आत्‍मविश्‍वास कायम राखण्‍यास सुरक्षितता देते. तुम्‍ही जाहिरातीचा संपूर्ण व्हिडिओ येथे पाहू शकता: https://youtu.be/GNxr-veAgGI?si=YNQfa4Lu1n4mIKqT
एण्‍ड-टू-एण्‍ड एन्क्रिप्‍शन व्‍हॉट्सअॅपवर कॉल्‍स व मेसेजेस् सुरक्षित ठेवण्‍यासह ही जाहिरात वापरकर्त्‍यांना ब्‍लॉक अँड रिपोर्ट, टू-स्‍टेप व्‍हेरिफिकेशन आणि मेटा व्‍हेरिफाईड यासारख्‍या गोपनीयता वैशिष्‍ट्यांची माहिती देते, जे संवादांची सुरक्षितता प्रबळ करण्‍यास मदत करतात. व्‍यवसाय प्रोफाइलवरील सत्‍यापित बॅज ग्राहकांना व्‍हॉट्सअॅपवर विश्‍वसनीय व्‍यवसाय ओळखण्‍यास मदत करतो, तसेच तो योग्‍य व्‍यवसायासोबत चॅटिंग करत असल्‍याची खात्री देतो.
मेटा येथील कंझ्युमर मार्केटिंगचे संचालक व्‍योम प्रशांत म्‍हणाले, “गेल्‍या काही वर्षांमध्‍ये आम्‍ही नाविन्‍यपूर्ण वैशिष्‍ट्यांसह सुरक्षितता व संरक्षणाचा स्‍तर वाढवला आहे, जेथे ही वैशिष्‍ट्ये वापरकर्त्‍यांना गोपनीयपणे व्‍हॉट्सअॅपवर संवाद साधण्‍यास, तसेच त्‍यांनी निवडलेल्‍या व्‍यवसायांसोबत चर्चा करण्‍यास सक्षम करतात. आम्‍हाला ही मोहिम लाँच करण्‍याचा अभिमान वाटतो, जी निदर्शनास आणते की खाजगी व सुरक्षित मेसेजिंग व्‍यक्‍तींच्‍या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि व्‍हॉट्सअॅप विशेषत: घरापासून व प्रियजनांपासून दूर राहणाऱ्या व्‍यक्‍तींकरिता कनेक्‍टेड राहण्‍यासाठी सुरक्षित असू शकते.”
प्रख्‍यात भारतीय चित्रपट दिग्‍दर्शक शिमित आमिन म्‍हणाले, “व्‍हॉट्सअॅप देणाऱ्या गोपनीयतेचा खरा अर्थ लावणे व सादर करणे आव्‍हानात्‍मक असण्‍यासोबत उत्तम संधी देखील आहे. या मोहिमेसाठी, व्‍हॉट्सअॅपला घरापासून व प्रियजनांपासून दूर असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या खाजगी संवादांसंदर्भात सुरक्षित व सक्षम भावनेचे महत्त्व अधोरेखित करायचे होते. आमच्‍या जाहिरातीमधील प्रमुख पात्र इकबीरची कथा अशी आहे की उत्तम संधींच्‍या शोधात ते त्‍यांचे घर व कुटुंबियांपासून दूर जातात, त्‍यांची जीवनात अधिक प्रगती करण्‍याची महत्त्वाकांक्षा असण्‍यासह सुरक्षिततेसाठी गोपनीयतेची गरज आहे आणि घरापासून कितीही दूर असले तरी प्रियजनांसोबत कनेक्‍ट राहण्‍याची इच्‍छा असते. तर ही जाहिरात अशा लाखो भारतीयांशी संलग्‍न होईल.”
या मोहिमेचा भाग म्‍हणून व्‍हॉट्सअॅप वापरकर्त्‍यांमध्‍ये सुरक्षितता साधने व वैशिष्‍ट्यांबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी समर्पित उत्‍पादन जाहिरातींची सिरीज देखील रीलीज करत आहे. ही सुरक्षितता साधने व वैशिष्‍ट्ये व्‍यक्‍तींना ऑनलाइन घोटाळे व फसवणूकांपासून सुरक्षित राहण्‍यास मदत करण्‍यासाठी आवश्‍यक सुरक्षितता देतात. वापरकर्त्‍यांना घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्‍यास मदत करू शकणारी प्रमुख सुरक्षितता वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:
1. तुमचे अकाऊंट अधिक सुरक्षित करण्‍यासाठी टू-स्‍टेप व्‍हेरिफिकेशन: व्‍हॉट्सअॅप टू-स्‍टेप व्‍हेरिफिकेशन वैशिष्‍ट्य (Two-Step Verification feature) देत वापरकर्त्‍यांना त्‍यांचे अकाऊंट अधिक सुरक्षित करण्‍याची सेवा देते. यामध्‍ये व्‍हॉट्सअॅप अकाऊंट रिसेट व सत्‍यापित करताना सहा-अंकी पिनची गरज असते. हे वैशिष्‍ट्य सिम कार्ड चोरीला गेल्‍यास किंवा फोनमध्‍ये छेडछाड होण्‍याच्‍या बाबतीत उपयुक्‍त आहे.

2. संशयास्‍पद असलेल्‍या अकाऊंट्सना ब्‍लॉक करा आणि त्‍याबाबत तक्रार करा: व्‍हॉट्सअॅप व्‍यक्‍तींसाठी त्‍यांच्‍या प्रियजनांसोबत आणि फोन क्रमांक असलेल्‍या इतर लोकांसोबत संवाद साधण्‍याकरिता खाजगी व सुरक्षित स्‍पेस आहे. पण, वापरकर्त्‍यांना अज्ञात फोन क्रमांकांकडून समस्‍या निर्माण करणारे संदेश मिळतात, जसे संशयास्‍पद लिंक्‍स, वैयक्तिक माहिती सांगण्‍याची विनंती अशा समस्‍यांमध्‍ये व्‍हॉट्सअॅप वापरकर्त्‍यांना व्‍हॉट्सअॅपवर ‘ब्‍लॉक अँड रिपोर्ट’ द अकाऊंट (‘block and report’ the account )ची सेवा देते. तुम्‍हाला अज्ञात प्रेषकाकडून संदेश आल्‍यास व्‍हॉट्सअॅप त्‍यांना ब्‍लॉक करण्‍याचा पर्याय देते, तसेच सामान्‍य ग्रुप, कार्यवाही करायची असल्‍यास सेफ्टी टूल्‍स अशी अतिरिक्‍त माहिती देते.

3. सायलेन्‍स अननोन कॉलर्स (Silence unknown callers: ): इन्‍कमिंग कॉल्‍सवर अधिक गोपनीयता व नियंत्रण देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले हे वैशिष्‍ट्य अधिक सुरक्षिततेसाठी स्‍पॅम, घोटाळे आणि अज्ञात व्‍यक्‍तींकडून आलेले कॉल्‍स आपोआपपणे ओळखण्‍यामध्‍ये मदत करते. तुमच्‍या फोनमध्‍ये या कॉल्‍सची रिंग वाजणार नाही, पण महत्त्वाचे असल्‍यास तुमच्‍या कॉल लिस्‍टमध्‍ये दिसतील.

Related posts

सणासुदीच्या मोसमात बीएफएसआयमधील रोजगार संधींमध्ये लक्षणीय वाढ

Shivani Shetty

नाबार्ड समर्थित महालक्ष्मी सरस 2023-24 मेळ्यास उत्साहातप्रारंभ ग्रामीण कारागिरांना बँकेकडून पाठबळ, एमएमआरडीएमैदानावर 7 जानेवारीपर्यंत आयोजन

Shivani Shetty

मुंबईमध्ये दिसली ओडिशाच्या औद्योगिक विकासाच्या व्हिजनची झलक

Shivani Shetty

Leave a Comment