maharashtraprimenews
ठळक बातम्या
AutomobileBreaking newsgeneralPublic Interest

टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारताच्या पश्चिम भागात आपल्या ‘ग्रेट 4X4 एक्सपीडीशन ’च्या दुसऱ्या झोनल ड्राइव्हला फ्लॅग ऑफ केले

मुंबई/पुणे, 9 सप्टेंबर 2023: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज लोणावळ्याच्या निसर्गरम्य हिल स्टेशनपासून भारताच्या पश्चिम भागात आपल्या दुसऱ्या ग्रेट 4X4 एक्सपीडीशनला हिरवा झेंडी दाखवली. सकलेशपूर (कर्नाटक राज्य) येथे मे 2023 मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या उद्घाटन “ग्रेट 4X4 एक्सपीडीशन ” च्या जबरदस्त यशानंतर 4X4  एसयूव्ही एक्सपेरिअन्शिअल ड्राइव्हचा हा दुसरा टप्पा आहे.

यापूर्वी मे 2023 मध्ये, टीकेएम ने देशभरातील मोटरिंग उत्साही लोकांसाठी 4×4 एक्सपेरिअन्शिअल ड्राइव्हचा पहिला-वहिला उपक्रम घोषित केला होता, जो चार झोनमध्ये (प्रादेशिक स्तर – उत्तर, दक्षिण,पूर्व आणि पश्चिम) आयोजित केला जाईल. या ड्राइव्हस् देशव्यापी 4x4 एसयूव्ही समुदायाशी संलग्न राहण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, ज्या ऑफ-रोडिंग अनुभवांचा रोमांच देतात. या उपक्रमाद्वारे,टीकेएम  सहभागींना त्यांच्या साहसी भावनेशी जोडण्याची आणि त्यांना नवीन सीमा पार करण्यासाठी, नवीन क्षितिजे शोधण्यासाठी आणि त्याद्वारे मास हॅपीनेसअनुभवण्यासाठी  आणि मोबिलिटी फॉर ऑलप्रदान करण्याची महत्वाकांक्षा ठेवते.

या एक्सपीडीशन मध्ये दिग्गज हिलक्स, फॉर्च्युनर 4×4, एलसी 300आणि हायराइडर एडब्ल्यूडी (ऑल व्हील ड्राइव्ह) च्या अभिमानी मालकांसह एसयूव्ही चा काफिला असेल. शिवाय, या एक्सपेरिअन्शिअल ड्राईव्हच्या वेगळेपणामध्ये इतर एसयूव्ही ब्रँड मालकांचा सहभाग आहे जे टोयोटा द्वारे भारतात आयोजित केलेल्या सर्वात पहिल्या ग्रेट 4x4 एक्सपीडीशनचा भाग असतील. लोणावळ्यातील रॅडिसन रिसॉर्ट आणि स्पा पासून सुरू होणारे,क्सपेरिअन्शिअल ड्राईव्ह मार्ग 4X4 चाहत्यांना 4X4 एसयूव्हीच्या प्रभावी लाइन-अपसह मोहक राजमाची धबधब्याकडे नेतील. या महान एक्सपीडीशनचा एक अविभाज्य घटक म्हणून, टीकेएम ने 4WDट्रॅकची रचना अतिशय काळजीपूर्वक केली आहे ज्यामध्ये नैसर्गिक अडथळे आहेत जसे की आर्टिक्युलेशन, साइड इनलाइन्स, रॅम्बलर,खोल खड्डे, स्लश आणि खडकाळ बेड. हे क्युरेट केलेले ट्रॅक अतुलनीय ऑफ-रोडिंग अनुभवाची हमी देतात जे 4X4 वाहनांच्या उल्लेखनीय क्षमतांचे प्रदर्शन करतात. टोयोटामध्ये ग्राहकांची सुरक्षा आणि सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याने, आवश्यक सुरक्षा उपाय जागोजागी योजले गेले आहेत आणि या व्यतिरिक्त, संपूर्ण अनुभवात्मक एक्सपीडीशन दरम्यान सहभागींना 4X4 तज्ञांकडून चांगले मार्गदर्शन केले जाईल, हे नमूद करण्याची गरज नाही.

रोमांचक ड्राइव्ह दरम्यान, सहभागी स्थानिक शालेय मुलांसोबत अर्थपूर्ण सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतील, समाजासाठी सकारात्मक योगदान देतील. अधिक सस्टेनेबल भविष्यासाठी टोयोटाच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, कंपनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करत आहे. अशा कार्बन न्यूट्रल उद्दिष्टांच्या अनुषंगाने, या कार्यक्रमात संकल्पतरू या प्रतिष्ठित पर्यावरण संवर्धन उपक्रमाच्या सहकार्याने व्हर्च्युअल वृक्षारोपण देखील समाविष्ट असेल. हा सहयोगी प्रयत्न पृथ्वी आणि तिच्या  संरक्षणाप्रती जबाबदारीची भावना वाढवण्यासाठी टीकेएमची दृढ कृती प्रतिबिंबित करतो.

श्री अतुल सूद – वाइस प्रेसिडेंट सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग,टोयोटा किर्लोस्कर मोटर, भारताच्या पश्चिम भागात ग्रेट 4X4 एक्सपीडीशन चे फ्लॅग ऑफ चिन्हांकित करताना म्हणाले,टोयोटाची ग्रेट 4X4 एक्सपीडीशनहा एक अनुभव आहे ज्यामध्ये सौहार्द, साहस आणि निसर्गाशी घट्ट नाते अंतर्भूत आहे. हा उपक्रम,4X4 वाहनांबद्दलच्या त्यांच्या उत्कटतेने एकत्रित, विविध पार्श्वभूमीतील सहभागींना एकत्र आणतो. आम्ही सर्व सहभागींचे मनापासून आभार मानतो आणि कायमस्वरूपी आठवणींनी भरलेल्या अप्रतिम ड्राइव्हसाठी आणि साहसाच्या उत्साही भावनेसाठी आमच्या शुभेच्छा. तसेच, या प्रकल्पात भागीदारी आणि समर्थनासाठी आम्ही आमचे अधिकृत इंजिन ऑइल आणि टायर भागीदार म्हणून अनुक्रमे इडेमित्सू आणि योकोहामा यांचे आभार मानू इच्छितो.

श्री विक्रम गुलाटीकंट्री हेड अँड एक्सिक्युटीव्ह वाइस प्रेसिडेंट,टोयोटा किर्लोस्कर मोटर, टोयोटाच्या ग्रेट 4×4 एक्सपीडीशनच्यादुसऱ्या आवृत्तीत भाग घेत म्हणाले, आम्ही सहभागींना खरोखरच एक अविस्मरणीय प्रवास प्रदान करण्यास रोमांचित आहोत जो त्यांना केवळ त्यांच्या 4X4 च्या उत्साहानेच नव्हे, तर अर्थपूर्ण सामाजिक हस्तक्षेपांमध्ये गुंतवून पर्यावरण आणि समुदायाशी देखील जोडतो. 4x4 सहभागींसोबत, टोयोटा स्थानिक शाळकरी मुलांसाठी (वाघोशी,सुधागड-रायगड जिल्हा येथील माध्यमिक विद्यालय सरकारी शाळा) त्यांना वाहतूक नियम, जबाबदार आणि सुरक्षित पादचारी वर्तन इत्यादींबद्दल जागरूक करण्यासाठी रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित करेल ज्यामुळे रस्ता सुरक्षेची संस्कृती वाढेल.

पुढे ते म्हणाले, ‘ याशिवाय, टोयोटाच्या सततच्या इको-प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कंपनी संकल्पतरू या स्वयंसेवी संस्थेशी करार करून वृक्षारोपण मोहीम हाती घेईल जी मोहिमेतील सहभागी सदस्यांच्या वतीने प्रत्येकी 1 झाड लावेल आणि लागवड केलेल्या अशा झाडांचे संगोपन सुनिश्चित करेल. अशा प्रकारे, नैसर्गिक जैवविविधतेच्या संवर्धनास हातभार लागेल.’

टोयोटाच्या मोटरस्पोर्ट प्रतिबद्धतेचा एक भाग असल्याने, ही अनोखी एक्सपीडीशन अधिकाधिक लोकांना मोटारस्पोर्ट्सची प्रशंसा करण्यासाठी आणि 4×4 ड्रायव्हिंगचा आनंद अनुभवण्यासाठी प्रेरित करत आहे. सप्टेंबर 2023 मध्ये भारताच्या उत्तर भागात नियोजित असलेल्या टोयोटाच्या पुढील ग्रेट 4X4 एक्सपीडीशन साठी संपर्कात रहा.

संवादाच्या दिशेने, ड्राईव्ह/लोगोचे नाव आहे ‘Great 4X4 Expedition by Toyota‘*, खालीलप्रमाणे:

* नोट: कृपया वरील ‘Great 4X4 Expedition by Toyota’ ड्राइव्हचे नाव/लोगो वापरा

 

Overview of TKM

Equity participation Toyota Motor Corporation (Japan) : 89%, Kirloskar Systems Limited (India) : 11%
Number of employees Approx. 6,000
Land area Approx. 432 acres (approx.1,700,000 m2)
Building area 74,000 m2
Total Installed Production capacity Up to 3,10,000 units

Overview of TKM 1st Plant:

Established October 1997 (start of production: December 1999)
Location Bidadi
Products Innova HyCross, Innova Crysta , Fortuner, Legender manufactured in India.
Installed Production capacity Up to 1,00,000 units

 

Overview of TKM 2nd Plant:

Start of Production December 2010
Location On the site of Toyota Kirloskar Motor Private Limited, Bidadi
Products Camry Hybrid, Urban Cruiser Hyryder, Hilux
Installed Production capacity Up to 2,10,000 units

*Other Toyota Models: Glanza, Rumion

**Imported as CBU: Vellfire, LC 300

Related posts

सणासुदीच्या काळात भारतातच पर्यटनाचा आनंद घेण्‍याची भारतीयांची इच्‍छा: कायक

Shivani Shetty

५ कारणे किया सोनेट एचटीके+ यादीत अव्वल आहे

Shivani Shetty

राज्यपालांच्या हस्ते पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा ‘महाराष्ट्र जन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित

Shivani Shetty

Leave a Comment