maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

व्हिसाद्वारे डिजिटल पेमेंट्सबाबतच्या गैरसमजांचे निराकरण

डिजिटल पेमेंट्समध्‍ये वाढ होण्‍यासह डिजिटल पेमेंट्सच्‍या सुरक्षिततेबाबत अनेक मिथकांमध्‍ये देखील वाढ झाली आहे. व्हिसा विनासायास व सुरक्षित डिजिटल पेमेंट अनुभवांचा आनंद घेता येण्‍यासाठी सामान्य गैरसमजांबाबत स्‍पष्‍टीकरण देत आहे.

 

1. मिथक: पेमेंट अॅप्‍स फोनमध्‍ये संवेनदशील माहिती स्‍टोअर करतात!

तथ्‍य: व्हिसा सारख्‍या आधुनिक डिजिटल पेमेंट सिस्‍टम्‍स युजरच्‍या डेटा संरक्षणासाठी आणि फोन डिवाईसेसच्‍या अनधिकृत वापराला प्रतिबंध करण्‍यासाठी टोकनायझेशन आणि एण्‍ड-टू-एण्‍ड एन्क्रिप्‍शन अशा उपायांचा वापर करतात.

 

2. मिथक: व्‍यवहार सुरक्षित करण्‍यासाठी प्रबळ पासवर्डस् पुरेसे आहेत!

तथ्‍य: प्रबळ पासवर्डस् हे उत्तम पहिले पाऊल आहे, पण ओटीपी सारख्‍या इतर व्‍हेरिफिकेशन पद्धतींसह पासवर्डसना एकत्रित करणारे मल्‍टी-फॅक्‍टर ऑथेन्टिकेशन अतिरिक्‍त सुरक्षितता देते.

 

3. मिथक: कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंटमुळे फसवणूक होण्‍याची शक्‍यता असते!

तथ्‍य: कॉन्‍टॅक्‍टलेस पेमेंट्समध्‍ये एन्क्रिप्‍टेड इलेक्‍ट्रॉनिक प्रक्रियेचा समावेश असतो, जी अत्‍यंत विश्‍वसनीय आहे. कॉन्‍टॅक्‍टलेस पद्धती व्‍यवहार सुरक्षित करणाऱ्या नीअर फिल्‍ड कम्‍युनिकेशन (एनएफसी) सारख्‍या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात, ज्‍यामधून डेटा अत्‍यंत कमी अंतरापर्यंत प्रसारित होण्‍याची खात्री मिळते, ज्‍यामुळे व्‍यत्‍यय येण्‍याची जोखीम दूर होते.

 

4. मिथक: क्‍यूआर कोड्स सहजपणे हॅक होतात!

तथ्‍य: फक्‍त विश्‍वसनीय क्‍यूआर कोड्स स्‍कॅन करा आणि सुरक्षित क्‍यूआर व्‍यवहारांसाठी पासवर्डस् शेअर करणे टाळा. क्‍यूआर कोड्स फक्‍त लिंकचा प्रकार आहेत. म्‍हणून सावधगिरी बाळगा आणि क्‍यूआर कोडमुळे फसवणूक करणारी वेबसाइट येत असेल किंवा वैयक्तिक माहितीची विनंती केली जात असेल तर माहिती शेअर करू नका.

5. मिथक: बँक व्‍यवहारांच्‍या तुलनेत डिजिटल वॉलेट्स कमी सुरक्षित आहेत!

तथ्‍य: डिजिटल वॉलेट्समध्‍ये अनेकदा अतिरिक्‍त सुरक्षितता वैशिष्‍ट्यांचा समावेश असतो, जसे टोकनायझेशन, बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन आणि डिवाईस-लेव्‍हल एन्क्रिप्‍शन. विशेषत: टोकनायझेशन संवेदनशील कार्ड माहितीच्‍या ऐवजी टोकन्‍स देते, ज्‍यामधून अतिरिक्‍त सुरक्षिततेची खात्री मिळते.

 

डिजिटल पेमेंट्स दैनंदिन जीवनाचा भाग बनले असल्‍याने मिथकांसंदर्भातील या तथ्‍यांकडे लक्ष द्या. आत्‍मविश्‍वासाने डिजिटल व्‍यवहार करण्‍यासाठी पेमेंट प्रदात्‍यांनी अंमलबजावणी केलेल्‍या प्रबळ सुरक्षितता उपायांबाबत अपडेटेड राहा आणि माहिती मिळवा.

Related posts

एसएलसीएमने शेतकरी आणि महिला कर्जदारांना सक्षम बनवले

Shivani Shetty

इब्‍लू फिओ ई-स्‍कूटरच्‍या विक्रीला जबरदस्त प्रतिसाद

Shivani Shetty

सॅमसंगकडून पहिला एंटरप्राइज एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍मार्टफोन ‘गॅलॅक्‍सी एक्‍सकव्‍हर७’ (Galaxy Xcover7) लाँच, ज्‍यामध्‍ये आहे मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा, सतत काम करत राहण्‍याची क्षमता आणि सर्वोत्तम उत्‍पादकता

Shivani Shetty

Leave a Comment