maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

“बेटी पढाओ”च्या प्रसाराबद्दल देवेंद्र फडणवीस यांचा गौरव

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “बेटी बचाओ बेटी पढाओ”चा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या विषयावर “लाडली बेटीयाँ” या हिंदी चॅरिटी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरुन इरॉस इंटरनॅशनल मिडीया लि. व नेदरलँड येथील आरएफआय स्टुडिओ व नेपाळ फिल्म असोसिएशनसोबत उत्तराखंड सरकारच्या संयुक्त सहयोगातून “लाडली बेटीयाँ”ची निर्मिती करण्यात आली असून 15 ऑगस्ट 2025 रोजी तो प्रदर्शित होतोय.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरिनम येथे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी यांच्या हस्ते आयएनएससीआर २०२५ हा विशेष गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. आमदार सुरेश धस यांनी नवकिरण संस्था बीड जिल्हा पोलिस फाऊंडेशन व सुरिनम प्रशासनाचे अभिनंदन केले.

लवकरच आमदार श्री. सुरेश धस व नवकिरण संस्था पोलिस फाऊंडेशन च्या सर्व मान्यवर सदस्यांसोबत श्री. राकेश गायकवाड यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्या संबंधी आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नवकिरण संस्था (फिल्म्स्) पोलिस फाऊंडेशन च्या वतीने देण्यात आली आहे.

Related posts

क्‍लीअरट्रिपकडून द बिग बिलियन डेज २०२४ सह ट्रॅव्‍हल सेलची घोषणा

Shivani Shetty

सायबर फसवणुकींचे नवे डावपेच: सर्वसामान्यांवर वाढता धोका*

Shivani Shetty

माझ्या वडिलांनी ड्रीम गर्ल 2 बघितला असता’ : आयुष्मान खुराना

Shivani Shetty

Leave a Comment