maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा आणि आयआयटी बॉम्‍बेने डिजिटल हेल्‍थ, एआय व इतर उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमधील संशोधनाला चालना देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

भIरत – नोव्‍हेंबर २२, २०२४: सॅमसंग आरअॅंडडी इन्स्टिट्यूट, नोएडा (एसआरआय-नोएडा)ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी बॉम्‍बे (आयआयटी बॉम्‍बे) सोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी करत उद्योग-शैक्षणिक संस्‍था सहयोगाप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे.

या सामंजस्‍य करारांतर्गत, एसआरआय-नोएडा आणि आयआयटी बॉम्‍बे आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय), डिजिटल हेल्‍थ आणि इतर महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील ब्रेकथ्रूंचा शोध घेतील. हा पंचवार्षिक सहयोग संयुक्‍त संशोधन प्रकल्‍पांची सुविधा देईल, आयआयटी बॉम्‍बेचे विद्यार्थी व प्राध्‍यापकवर्गाला सॅमसंग इंजीनिअर्ससोबत सहयोग करण्‍याची संधी देईल.

या दृष्टिकोनामुळे विद्यार्थ्‍यांसाठी नवीन मार्ग खुले होतील, तसेच उद्योगासाठी त्‍यांच्‍या सुसज्‍जतेमध्‍ये वाढ होईल. याव्‍यतिरिक्‍त, हा सहयोग सॅमसंग इंजीनिअर्सना आयआयटी बॉम्‍बेमधील डिजिटल हेल्‍थ व एआय सारख्‍या उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमधील विशेषीकृत प्रशिक्षण आणि सर्टिफिकेशन प्रोग्राम्‍ससह सक्षम करेल.

एसआरआय-नोएडाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू आणि आयआयटी बॉम्‍बे येथील संशोधन व विकासाचे सहाय्यक डिन प्रो. उपेंद्र व्‍ही. भंडारकर यांनी औपचारिकरित्‍या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या केल्‍या. आयआयटी बॉम्‍बे येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या इव्‍हेण्‍टमध्‍ये कोटिया सेंटर फॉर डिजिटल हेल्‍थ (केसीडीएच) मधील फॅकल्‍टी सदस्‍यांसह केसीडीएचचे प्रमुख प्रो. रणजित पदिन्‍हातीरी, प्रो. निर्मल पंजाबी आणि डॉ. राघवेंद्रन लक्ष्‍मीनारायणन उपस्थित होते.

“हा सहयोग उद्योग कौशल्‍य व शैक्षणिक उत्‍कृष्‍टतेच्‍या प्रबळ एकत्रिकरणाला सादर करतो, तसेच अग्रणी संशोधन, नाविन्‍यता आणि टॅलेंट विकासासाठी संधी देतो. आम्‍ही अर्थपूर्ण प्रगतीला चालना देण्‍यासाठी आणि डिजिटल हेल्‍थ, एआय व इतर उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांच्‍या क्षेत्रामधील वास्‍तविक विश्‍वातील आव्‍हानांचे निराकरण करणारे सोल्‍यूशन्‍स विकसित करण्‍यासाठी आयआयटी-बीचे अपवादात्‍मक फॅकल्‍टी व विद्यार्थ्‍यांसोबत सहयोगाने काम करण्‍यास उत्‍सुक आहोत. सहयोगाने, आमचा ज्ञानाची देवाणघेवाण करणारी व इनोव्‍हेशनची इकोसिस्‍टम डिझाइन करण्‍याचा मनसुबा आहे, जिचा आमची कंपनी आणि समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल,’’ असे एसआयआर-नोएडाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक क्‍यूनग्‍यून रू म्‍हणाले.

“आजचा क्षण उत्‍साहवर्धक टप्‍पा आहे, जेथे आम्‍ही एसआरआय-नोएडासोबत औपचारिकरित्‍या आमच्‍या सहयोगाची घोषणा केली आहे. या सामंजस्‍य करारामधून नाविन्‍यता, ज्ञानाची देवाणघेवाण आणि सर्वोत्तमतेसाठी प्रयत्‍नाप्रती आमची समान कटिबद्धता दिसून येते. सहयोगाने काम करत आम्‍ही विद्यार्थी व फॅकल्‍टीसाठी नवीन पाथवेज तयार करत आहोत, ज्‍यामुळे त्‍यांना उद्योग, प्रगत संशोधन संधींशी संलग्‍न होण्‍यास आणि समुदायांच्या विकासाप्रती योगदान देण्‍यास मदत होईल,’’ असे आयआयटी बॉम्‍बे येथील सहाय्यक डिन (आरअँडडी) प्रो. उपेंद्र व्‍ही. भंडारकर म्‍हणाले.

हा सामंजस्‍य करार संयुक्‍त संशोधन पेपर्सच्‍या प्रकाशनाला प्रेरित करतो, ज्ञानाची देवाणघेवाण करण्‍याला चालना देतो, ज्‍यामुळे तंत्रज्ञान प्रगती आणि उद्योग-संबंधित नाविन्‍यतेला गती मिळेल. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सॅमसग आणि आयआयटी बॉम्‍बे कौशल्‍याच्‍या शाश्‍वत देवाणघेवाणीसाठी पाया स्‍थापित करत आहे, ज्‍यामुळे नेक्‍स्‍ट-जनरेशन तंत्रज्ञानांमधील मर्यादा दूर होतील आणि भावी ब्रेकथ्रूंसाठी प्रेरणा मिळेल.

Related posts

या स्वातंत्र्य दिनी भारताला तंबाकूच्या अवैध व्यापारापासून मुक्त करण्याची शपथ घेऊया

Shivani Shetty

जीई ऐरोस्‍पेसकडून जीई ऐरोस्‍पेस फाऊंडेशन लाँच नेक्‍स्‍ट इंजीनिअर्सचा विस्‍तार करण्‍यासाठी २० दशलक्ष डॉलर्स, कर्मचारीवर्ग विकासासाठी २ दशलक्ष डॉलर्स आणि आपत्‍कालीन मदतकार्यासाठी २ दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करत कंपनीचे तत्त्व ‘टू लिफ्ट पीपल अप’ला अधिक दृढ केले

Shivani Shetty

मॅगी नवीन ‘मॅगी ओट्स नूडल्‍स विथ मिलेट मॅजिक’सह मिलेट्सच्‍या क्षमता दर्शवत आहे

Shivani Shetty

Leave a Comment