maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

*टाटा मोटर्सकडून गुवाहाटीमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन*

गुवाहाटी, फेब्रुवारी २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज गुवाहाटीमध्‍ये त्‍यांच्‍या रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्‍हीएसएफ)चे उद्धाटन केले. ‘Re.Wi.Re – रिसायकल विथ रिस्‍पेक्‍ट’ नाव असलेल्‍या या केंद्राची दरवर्षाला १५,००० एण्‍ड-ऑफ-लाइफ वेईकल्‍स सुरक्षितपणे विघटन करण्‍याची क्षमता आहे, ज्‍यामध्‍ये शाश्‍वत व पर्यावरणपूरक प्रक्रियांचा वापर केला जातो. टाटा मोटर्सची सहयोगी अॅक्‍सॉम प्‍लॅटिनम स्‍कॅपर्सकडून या आरव्‍हीएसएफचे कार्यसंचालन पाहिले जाते आणि सर्व ब्रँड्सच्‍या पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍स स्‍क्रॅप करण्‍यासाठी सुसज्‍ज आहे. हे देशातील टाटा मोटर्सचे सातवे केंद्र आहे, जेथे जयपूर, भुवनेश्‍वर, सुरत, छत्तीसगड, दिल्‍ली एनसीआर प्रांत आणि पुणे येथे स्‍क्रॅपिंग केंद्रे आहेत.

 

पर्वतीय क्षेत्र विकास, वाहतूक, सहकार, स्‍वदेशी आणि आदिवासी निष्‍ठा व सांस्‍कृतिक मंत्री श्री. जोगेन मोहन, आरोग्य, कुटुंब कल्याण व सिंचन मंत्री श्री. अशोक सिंघाल, टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ आणि अॅक्सॉम ऑटोमोबाईल्सचे संचालक डॉ. संजीव नारायण यांच्या उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच आसाम सरकार, टाटा मोटर्स आणि अॅक्सॉम ऑटोमोबाईल्सचे इतर वरिष्‍ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

 

उद्घाटन समारोहाप्रसंगी मत व्‍यक्‍त करत पर्वतीय क्षेत्र विकास, वाहतूक, सहकार, स्‍वदेशी आणि आदिवासी निष्‍ठा व सांस्‍कृतिक मंत्री श्री. जोगेन मोहन म्‍हणले, “लाँच करण्‍यात आलेले हे प्रगत वेईकल रिसायकलिंग केंद्र बहुमूल्‍य रोजगार संधी निर्माण करेल आणि आमचे राज्‍य व समुदायांच्‍या आर्थिक विकासाला साह्य करेल. तसेच, हे केंद्र एण्‍ड-ऑफ-लाइन वेईकल्‍सच्‍या सुरक्षित विघटनाची देखील खात्री घेईल, कार्बन उत्‍सर्जन कमी करेल आणि शुद्ध पर्यावरणाप्रती योगदान देईल. मी आसाममध्ये स्‍मार्ट सुविधांचा शुभारंभ करण्‍यासाठी टाटा मोटर्सचे आभार व्‍यक्‍त करतो.”

 

उद्घाटन समारोहाप्रसंगी आरोग्य, कुटुंब कल्याण व सिंचन मंत्री श्री. अशोक सिंघाल म्‍हणाले, “गुवाहाटीमध्‍ये टाटा मोटर्सच्‍या Re.Wi.Re केंद्राचे उद्घाटन शुद्ध, हरित आसामच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे आधुनिक केंद्र शाश्‍वत वेईकल विघटन इकोसिस्‍टमला चालना देईल, तसेच याचा पर्यावरण आणि आसाममधील लोकांना फायदा होईल.”

 

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, “आज, गुवाहाटीमध्‍ये ईशान्येमधील पहिल्‍या Re.Wi.Re केंद्राच्‍या लाँचसह टाटा मोटर्सने प्रांतामध्‍ये जबाबदार वेईकल स्‍क्रॅपिंगला प्रगत करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. चक्रीय अर्थव्‍यवस्‍थेच्‍या तत्त्वांशी कटिबद्ध राहत आम्‍ही शाश्‍वततेला पाठिंबा देणाऱ्या पद्धतींना चालना देत आहोत. सात राज्‍यांमध्‍ये आरव्‍हीएसएफच्‍या आमच्‍या नेटवर्कसह आम्‍ही आता दरवर्षाला १००,००० हून अधिक एण्‍ड-ऑफ-लाइन वेईकल्‍सचे विघटन करू शकतो. आम्‍हाला या केंद्रासाठी अॅक्‍सॉम प्‍लॅटिनम स्‍क्रॅपर्ससोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो. आम्‍ही राज्‍य सरकार आणि स्‍थानिक प्राधिकरणांचे या उपक्रमाला सत्‍यात आणण्‍यासाठी त्‍यांच्‍या अविरत पाठिंब्‍याकरिता आभार मानतो.”

 

प्रत्‍येक Re.Wi.Re केंद्र पूर्णत: डिजिटलाइज आहे आणि सर्व कार्यसंचालने विनासायास व पेपरलेस आहेत. हे केंद्र कमर्शियल व पॅसेंजर वेईकल्‍ससाठी अनुक्रमे सेल-टाइप व लाइन-टाइप डिस्‍मॅन्टलिंगसह (विघटन) सुसज्‍ज आहे. तसेच टायर्स, बॅटऱ्या, इंधन, ऑईल्‍स, लिक्विड्स व गॅसेस् अशा विविध घटकांच्‍या सुरक्षित विघटनासाठी समर्पित स्‍टेशन्‍स आहेत. प्रत्‍येक वेईकल विशेषत: पॅसेंजर व कमर्शियल वेईकल्‍सच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन केलेल्‍या प्रखर डॉक्‍यूमेन्‍टेशन व विघटन प्रक्रियेमधून जाते. यामधून देशातील वेईकल स्‍क्रॅपेज धोरणानुसार सर्व घटकांचे सुरक्षित विघटन होण्‍याची खात्री मिळते. Re.Wi.Re. संकल्‍पना आणि केंद्र ऑटोमोटिव्ह उद्योगातील शाश्‍वत पद्धतींना चालना देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण झेप आहे.

Related posts

अपोलो नवी मुंबईने सुरु केले संडे क्लिनिक

Shivani Shetty

कोटकने मेट्रो ३ अॅक्‍वा लाइनच्‍या बीकेसी स्‍टेशनला कोटक बांद्रा-कुर्ला कॉम्‍प्‍लेक्‍स मेट्रो स्‍टेशन असे ब्रँड नाव दिले

Shivani Shetty

फँटाने केली चविष्ट उपभोगाची नवीन व्याख्या; कार्तिक आर्यनसह सुरू केले नवीन ‘फ्नॅकिंग’ अभियान

Shivani Shetty

Leave a Comment