नवी दिल्ली, फेब्रुवारी २०२५: कोका-कोलाचा आयकॉनिक बिलियन-डॉलर स्वदेशी ब्रॅण्ड थम्स-अपने ‘दम है तो दिखा’ ही आपली नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि कमाल करून दाखविण्यासाठी धडपडणाऱ्या व आव्हानांसमोर पाय रोवून उभे राहणाऱ्या तरुणांना एक ताकदीची साद घातली आहे. या अफाट मोहिमेसाठी ब्रॅण्डने सिनेमाच्या जगातील दोन लिजंड्स – शाहरुख खान आणि अल्लु अर्जुन यांना एकत्र आणले आहे. हे दोन्ही आयकॉन्स म्हणजे ‘दम है तो दिखा’ या आव्हानाचे प्रतीक आहेत व थम्स अपचे खास वैशिष्ट्य असलेल्या तीव्र भावनांना प्रतिबिंबित करणाऱ्या अदम्य उर्मीचे मूर्तीमंत उदाहरण आहेत.
आपली ठाशीव चव आणि हमखास जाणवणारे थंडर यांच्या साथीने थम्स अप गेली अनेक दशके पोलादी ताकदीचे आणि चिकाटीचे प्रतीक मानले जात आहे व सर्व काही पणाला लावण्याचे धाडस असलेल्यांची पहिली पसंत बनले आहे. थम्स अप हे फक्त एक पेय नाही तर कधीही माघार न घेणाऱ्यांच्या जीवाभावाचा साथीदार आहे. ‘दम है तो दिखा’च्या साथीने ब्रॅण्ड थम्स अपच्या याच वारशाला अधिक ठळकपणे पुढे आणत आहे आणि आजच्या पिढीला निर्धाराने पाऊल उचलण्यासाठी व प्रत्येक क्षणावर राज्य करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
कोका कोला इंडिया आणि दक्षिणपूर्व आशियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्स विभागाच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, “थम्स अपने ऐन प्रसंगी हिंमतीने उभे राहणाऱ्यांचे, आपल्या कृतीतून आपली ताकद दाखवून देणाऱ्यांचे कौतुक केले आहे. ‘’दम है तो दिखा”मध्ये आम्ही हाच विश्वास आणखी पुढे घेऊन जात आहोत व लोकांना पुढाकार घेण्यासाठी आणि आपली खरी ताकद दाखवून देण्यासाठी प्रेरित करत आहोत. शाहरुख खान आणि अल्लु अर्जुन एकत्र आल्याने ही जाहिरात मोहीम अधिकच खास बनली आहे. दोन्ही आयकॉन्स दृढनिश्चय आणि ताकदीचे मूर्तीमंत उदाहरण आहेत, याच गुणांचे प्रतिनिधीत्व थम्स अप करते आणि म्हणूनच हा सहयोग म्हणजे अगदी अचूक संयोग ठरला आहे.”
अल्लू अर्जुन म्हणाला, “थम्स अपबरोबरचा सहयोग हा एक असाधारण अनुभव राहिला आहे. ही जाहिरात आपल्या मार्गावर धाडसाने पुढे जाण्याच्या व आपले मोल सिद्ध करण्याच्या माझ्या तत्वांशी गहिरा मेळ साधणारी आहे. या पिढीला आव्हानांना बेधडकपणे भिडण्याची प्रेरणा देण्यासाठी शाहरुख खानची सोबत करणे ही माझ्यासाठी एक अत्यंत खास बाब आहे.”
शाहरुख खान म्हणाला, “विपरित परिस्थितीमध्ये ताठ कण्याने उभे राहणे म्हणजे खरी ताकद आहे, असे मला नेहमीच वाटते. अनेक वर्षांपासून थम्स अप याच गोष्टीचे प्रतीक आहे आणि ‘दम है तो दिखा’मध्ये हाच विश्वास अत्यंत ताकदीने साकारला गेला आहे. अल्लु अर्जुनच्या साथीने या थंडरसारख्या प्रवासाचा भाग बनण्यास मी उत्सुक आहे.”
सर्वांगीणरित्या दिल्या जाणाऱ्या एकात्मिक अनुभवाच्या साथीने मोहीम जोमाने पुढे जात आहे व तिचा पुढचा भाग म्हणून अधिक साहसी पॅक्स आणि लक्षवेधी डिजिटल मंचही लोकांसमोर येण्यास सज्ज आहेत. धाडसी जाहिरातींचा आपला वारसा जपणारे थम्स अप यापुढेही कथाकथनाची नवी व्याख्या रचत राहणार आहे व या ब्रॅण्डला मनोवेधक व प्रेरणादायी सांस्कृतिक संकल्पनेचे रूप देणार आहे.