maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

एचडीएफसी लाइफचा मेट्रोपोलिस आणि कॉलहेल्थसह त्रिपक्षीय सहयोग

मुंबई, सप्टेंबर २३, २०२४: भारतातील आघाडीच्या आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एचडीएफसी लाइफने भारतातील आघाडीची डायग्नोस्टिक कंपनी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड व एकात्मिक आरोग्यसेवा प्लॅटफॉर्म कॉलहेल्थ यांच्यासोबत वैशिष्ट्यपूर्ण करार केला आहे. या सहयोगामुळे एचडीएफसी लाइफ (HDFC Life) पॉलिसींसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांना देशभरातील मेट्रोपोलिस लॅब्जमधून वैद्यकीय चाचण्या करवून घेणे शक्य होईल आणि त्यायोगे एक अखंडित व सोयीस्कर अनुभव प्राप्त होईल.

या करारानुसार, व्यक्ती त्यांच्या घराजवळील मेट्रोपोलिस लॅबला भेट देण्याचा किंवा त्यांचा प्रतिनिधी घरी बोलावण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे सर्वच ग्राहकांना लवचिक व सुलभ सेवा मिळू शकेल. या प्रक्रियेसाठी वेळ आरक्षित करणे (अपॉइण्टमेंट बूकिंग) व सर्व्हिसिंगचे काम कॉलहेल्थच्या यूजर-फ्रेण्डली डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केले जाईल. त्यामुळे पॉलिसीसाठी अर्ज करणाऱ्यांना विनासायास प्रक्रिया पूर्ण करता येईल.

या सहयोगामुळे एचडीएफसी लाइफची व्याप्ती लक्षणीयरित्या वाढणार आहे. विशेषत: श्रेणी २ व श्रेणी ३ शहरांमध्ये व्याप्ती वाढल्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना कोणत्याही गैरसोयीशिवाय आवश्यक ती पूर्वपॉलिसी वैद्यकीय तपासणी करून घेणे शक्य होईल.

एचडीएफसी लाइफचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर समीर योगीश्वर म्हणाले, “पॉलिसीपूर्वी विनासायास तपासण्यांची सुविधा देऊ करण्यासाठी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड व कॉलहेल्थ यांच्याशी सहयोग करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पॉलिसी खरेदी, ऑन-बोर्डिंग व सर्व्हिसिंग प्रक्रिया आमच्या पॉलिसीधारकांसाठी सुलभ करण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. ही खास करून घेतलेली व्यवस्था घरी येऊन नमुने घेणे तसेच लॅब्जची सुलभ उपलब्धता यांच्या माध्यमातून ग्राहकांचा ऑनबोर्डिंग अनुभव तर अधिक चांगला करतेच, शिवाय फसवणुकीची जोखीमही कमी करते आणि एका सुरक्षित व विश्वासार्ह प्रक्रियेची निश्चिती करते.”

मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे चीफ एग्झिक्युटिव ऑफिसर सुरेंद्रन चेम्मेनकोटील या सहयोगाबद्दल म्हणाले, “एचडीएफसी लाइफचा निदानात्मक (डायग्नोस्टिक) सहयोगी म्हणून करार करताना तसेच विम्यासाठी तपासणीची प्रक्रिया सुलभ करताना कॉलहेल्थसोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. मेट्रोपोलिसने गेल्या अनेक वर्षांपासून अनेक कॉर्पोरेट ग्राहकांच्या विश्वासाचा वेलनेस सहयोगी म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे. आमची पॅथोलॉजिस्ट, तंत्रज्ञ आणि कुशल व्यावसायिकांची संपूर्ण पुरवठा साखळीतील समर्पित टीम सर्वोच्च दर्जाच्या सेवा देण्यासाठी बांधील आहे. याद्वारे विमा अर्ज प्रक्रियेतील सोयीस्करतेची व्याख्या नव्याने केली जाणार आहे.”

कॉलहेल्थचे चीफ एग्झिक्युटिव ऑफिसर हरी थलापल्ली म्हणाले, “डिजिटल आरोग्य तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर राहण्यासाठी कॉलहेल्थ सातत्याने प्रयत्नशील असतो. एचडीएफसी लाइफशी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडसह झालेला हा विशेष करार आम्हाला सीमा व शक्यता ओलांडण्याच्या नवीन संधी देईल. या ‘विन-विन-विन’ करारामुळे क्लिनिकल निष्पत्तीचा अधिक उच्च दर्जा साध्य होईल आणि कॉलहेल्थ डॉक्टर्सद्वारे अधिक सुरक्षित व तथ्यांवर आधारित तपासणी होऊ शकेल. त्यामुळे एचडीएफसी लाइफसाठी जोखीम कमी होईल व ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला होईल.”

ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्याप्रती आणि एक सुरळीत, विनासायास अनुभव देण्याप्रती एचडीएफसी लाइफची बांधलकी या सहयोग करारातून दिसून येते. मेट्रोपोलिसच्या विश्वासार्ह निदानात्मक कौशल्याच्या व कॉलहेल्थच्या अत्याधुनिक डिजिटल सोल्यूशन्सच्या माध्यमातून श्रेष्ठ दर्जाच्या व खात्रीशीर आरोग्य तपासण्या उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट एचडीएफसी लाइफपुढे आहे. त्यामुळे पॉलिसीधारकांचे एकंदर स्वास्थ्य व मन:शांती जपण्यात मदत होणार आहे.

Related posts

वजीरएक्सने क्रिप्टो कर भरण्याची प्रक्रिया सोपी केली

Shivani Shetty

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने इब्‍लू श्रेणीसाठी बॅटरी वॉरंटीमध्‍ये वाढ केली

Shivani Shetty

टाटा मोटर्स आणि महेश कार्गो मूव्‍हर्स प्रत्‍येक मैलामध्‍ये देत आहेत सर्वोत्तम सेवा

Shivani Shetty

Leave a Comment