maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

कोस्‍टा कॉफीचे भारतीय बॅरिस्‍टा ऑलिम्पिक गेम्‍स पॅरिस २०२४ मध्‍ये ऑफिशियल कॉफी पार्टनर म्‍हणून चमकणार

राष्‍ट्रीय, जुलै: कोस्‍टा कॉफीला ऑलिम्पिक गेम्‍स पॅरिस २०२४ मध्‍ये ऑफिशियल कॉफी पार्टनर असण्‍याचा आनंद होत आहे, जो कॉफी संस्‍कृतीला चालना देण्‍यासोबत भारतीय बॅरिस्‍टाला जागतिक स्‍तरावर प्रमुख मंच प्रदान करण्‍यामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. सहा किओस्‍क्‍स आणि ११० हून अधिक सेल्‍फ-सर्व्‍ह पॅक्‍टो मशिन्‍ससह सहा देशांमधील १३० कोस्‍टा कॉफी टीम सदस्‍य पॅरिसमधील सात ठिकाणी चाहत्‍यांना आणि अॅ‍थलीट्सना अद्वितीय गरमागरम व थंडगार पेयांचा अनुभव देतील.
या सहयोगाचा भाग म्‍हणून, कोस्‍टा कॉफीने तीन अपवादात्‍मक भारतीय बॅरिस्‍टा सादर केले आहेत: अमीर फेयिझ, मलिका त्रिपुरा आणि अभिषेक कुमार. या प्रतिभावान व्‍यक्‍तींनी त्‍यांची कौशल्‍ये निपुण करण्‍यासाठी आणि कोस्‍टा कॉफीची मूल्‍ये टीमवर्क व सर्वोत्तमता आत्‍मसात करण्‍यासाठी शिस्‍तबद्ध प्रशिक्षण घेतले आहे. टीम सदस्‍य या साइट्सच्‍या विनासायास कार्यसंचालनाची खात्री घेतील आणि फक्‍त अॅथलीट्स व प्रेक्षकांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या कॉफी मास्‍टरक्‍लासेसचे आयोजन करतील. ऑलिम्पिक्‍समध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍यासाठी निवडक कोस्‍टा कॉफीच्‍या टीम सदस्‍यांना ऑलिम्पिक्‍स गेम्‍समध्‍ये ध्‍वजवाहक असण्‍याची अविश्‍वसनीय संधी मिळेल.
कोका-कोला कंपनी येथील कोस्‍टा कॉफीचे भारत व इमर्जिंग इंटरनॅशनलमधील महा-व्‍यवस्‍थापक विनय नायर म्‍हणाले, ”आम्‍हाला ऑलिम्पिक गेम्‍स पॅरिस २०२४ साठी ऑफिशियल कॉफी पार्टनर असण्‍याचा अभिमान वाटतो. ही संधी आम्‍हाला आमच्‍या भारतीय बॅरिस्‍टांचे कौशल्‍य व कलाकृती प्रख्‍यात आंतरराष्‍ट्रीय मंचावर दाखवण्‍याची सुविधा देते, तसेच यामधून आमच्‍या प्रतिभावान टीम सदस्‍यांप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते. त्‍यांना ही असाधारण संधी देत आम्‍ही त्‍यांच्‍या विकासामध्‍ये गुंतवणूक करत आहोत, तसेच सर्वसमावेशक संस्‍कृतीचा अवलंब करत आहोत आणि सर्वोत्तमतेप्रती त्‍यांच्‍या समर्पिततेला साजरे करत आहोत.”
भारतातील आमच्‍या बॅरिस्‍टांचा ऑलिम्पिक गेम्‍स पॅरिस २०२४ मधील सहभाग परिवर्तनात्‍मक प्रवास आहे, जो बहुमूल्‍य अनुभव देईल आणि अर्थपूर्ण संबंधांना चालना देईल.

Related posts

टाटा मुंबई मॅरेथॉन, काळा घोडा कला महोत्सव व इतरांची मुंबई फेस्टिव्हल 2024 सह भागीदारी

Shivani Shetty

ज्‍युलिओची २.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

Shivani Shetty

टाटा मोटर्सकडून चंदिगडमध्‍ये अत्‍याधुनिक रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटीचे उद्घाटन

Shivani Shetty

Leave a Comment