maharashtraprimenews
ठळक बातम्या
सार्वजनिक स्वारस्य

ट्रान्सफॉर्मिंग हेल्थ केअर विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ १० वी आंतरराष्ट्रीय परिषद

मुंबई, १९ डिसेंबर २०२२: नवी दिल्ली मधील ताज पॅलेस येथे ‘ट्रान्सफॉर्मिंग हेल्थ केअर विथ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी’ (THIT) ही १० वी आंतरराष्ट्रीय परिषद आणि त्यासोबत ९ वी ‘इंटरनॅशनल पेशंट सेफ्टी कॉन्फरन्स’ (IPSC – आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा परिषद) अपोलो टेलिमेडिसीन आयोजित करीत आहेत. आयपीएससी हे एक नॉन प्रॉफिट उपक्रम असून रुग्णांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणारी ही आशियातील सर्वात मोठी परिषद आहे, जी रुग्णांच्या सुरक्षेतील गंभीर समस्यांना संबोधित करते आणि विचारांच्या व ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी, संशोधन सहयोग व नेटवर्किंग स्थापित करण्यासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करते.

याला पूरक ठरणारी टिएचआयटी (THIT) परिषद ही अपोलो टेलिमेडिसीन नेटवर्किंग फाऊंडेशन ने आयोजित केलेली भारतातील सर्वात मोठी आरोग्यसेवा व माहिती तंत्रज्ञानावर आधारित परिषद आणि आरोग्य व्यावसायिकांचा मेळावा आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात डिजिटलायझेशन ला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे पारंपरिक दृष्टिकोनात बदल व सुधार होईल. नवीन अर्थव्यवस्था, मूल्य साखळी, व्यावसायिक मॉडेलस् नेहमीच उदयास येत असतात मात्र यात डिजिटल ही मुख्य प्रेरक शक्ति आहे. संवादात्मक सत्रे, शैक्षणिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांव्यतिरिक्त टिएचआयटी (THIT) मध्ये नवीन उत्पादने, तंत्रज्ञान, सेवा आणि उद्योग यांच्याविषयी माहिती देणारे व्यापारी प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे.

डॉ. प्रताप सी रेड्डी, अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटलस् समूह म्हणाले, “कोविडनंतरच्या जगात असे आंतरराष्ट्रीय आरोग्य संवाद आरोग्य सेवांशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत आणि सर्व संबंधितांमध्ये आणि भागीदारांमध्ये होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून समस्यांना प्रभावीपणे मांडण्याची ही एक उत्तम संधी आहे. या अनुषंगाने, रुग्णांची सुरक्षा आणि आरोग्य सेवा व माहिती तंत्रज्ञान या महत्त्वाच्या विषयांवर आंतरराष्ट्रीय आरोग्य संवादाद्वारे संस्थात्मक शिक्षणाला निरंतर चालना देण्यासाठी, एक चौकट प्रदान करण्यासाठी आणि धोरण विकासामध्ये सहभाग सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याचा आम्हाला अभिमान आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील एक आघाडीची संस्था म्हणून या क्षेत्रात जास्तीतजास्त सुधारणा करून त्यात उत्कृष्टता आणणे ही आमची जबाबदारी आहे. डब्ल्यू एच ओ च्या रुग्ण सुरक्षा दशक २०२१-२०३० च्या दरम्यान जगभरात आरोग्य सेवा अधिक सुरक्षित व्हावी यासाठी असे परिसंवाद आयोजित करण्यासाठी पुढाकार घेण्यात आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, अशा परिषदांमध्ये मिळालेली माहिती आणि ज्ञान आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील प्रतिनिधींसाठी अमूल्य ठरेल.”

‘ड्रिम, डिजायर अँड डेअर’ या विषयावर आधारित सत्रांसह ९ व्या आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा परिषदेत (IPSC) जागतिक विचारवंत, उद्योग तज्ज्ञ, आरोग्य सेवा दाते आणि डॉक्टरस् त्यांचे अनमोल अनुभव, सर्वोत्तम पद्धती आणि रुग्णाच्या सुरक्षेसाठी आधुनिक, नवीन व अभिनव पद्धतींवर चर्चा करून आपले विचार सर्वांसमोर मांडतील. हे प्रभावी व्यासपीठ चर्चासत्रे, परिसंवाद, व्याख्यान, शोधनिबंध प्रस्तुतिकरण, पोस्टर यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून रुग्णाच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी व उत्कृष्ट पद्धती आणि नवकल्पना समोर आणेल.

सुमारे १७० वक्ते आणि ३० देशांतील १२०० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ही परिषद नवनवीन कल्पना, माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता आणि उत्कृष्ट माहितीमधून शिकण्याची अनोखी संधी देणारे व्यासपीठ बनेल. या आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा परिषदेमध्ये (IPSC) उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून २५ ब्रेक आउट सत्र, १२ परिषद-पूर्व वेबिनार (प्री कॉन्फरन्स वेबिनारस्), ५ परिषद-पूर्व कार्यशाळा (प्री कॉन्फरन्स वर्कशॉपस्); आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा पुरस्कार आणि पेपर-पोस्टर प्रस्तुतीकरण हे समाविष्ट आहे.

२०२३ च्या या परिषदेमध्ये डिजिटल इनोव्हेशन, पेशंट अँड-फॅमिली कोलॅबरेशन, कल्चर ऑफ सेफ्टी डिझाईन, क्वालिटी मानकांच्याही पुढे जाऊन रुग्णांची सुरक्षितता आणि औषधांची सुरक्षितता अशा विविध श्रेणींमध्ये आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा पुरस्कार दिले जातील. सुविधा व्यवस्थापन आणि सुरक्षा, क्लिनिकल ऑडिट, क्लिनिकल पाथवेज्, इलेक्टीव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स, हॉस्पिटलमधील जोखीम व्यवस्थापन, औषधोपचारातील सुरक्षितता या विषयांवर या ९ व्या आयपीएससी परिषदेमध्ये परिषदपूर्व कार्यशाळांची मालिका देखील आयोजित केली गेली आहे. या परिषदपूर्व कार्यशाळा नवी दिल्ली येथिल इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स येथे ११ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे.

ही परिषद जॉइंट कमिशन इंटरनॅशनल (JCI), पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (PHFI), अकॅडेमी ऑफ हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन (AHA), नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर प्रोवायडरस् (NABH), कॉन्झोऱटिअम ऑफ अॅक्रिडिटेड हेल्थकेअर ऑर्गनाइज़ेशन (CAHO), क्वालिटी अॅक्रिडिटेशन इंस्टीट्यूट (QAI), असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोवायडरस् इंडिया (AHPI),असट्रॉन हेल्थकेअर कनसल्टंटस् इत्यादी अग्रगण्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे.

Related posts

गो फर्स्टचा इझमायट्रिपसह भागीदारी करार

Shivani Shetty

प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम

Shivani Shetty

पूजा सावंतचे ३३व्या वाढदिवशी पहा आकर्षक लूक्स

Shivani Shetty

Leave a Comment