राष्ट्रीय, ऑगस्ट २०२४: थम्स अप या कोका-कोला कंपनीच्या भारतातील बिलियन-डॉलर, स्वदेशी बेव्हरेज ब्रँडला तूफानी बिर्याणी हंट सीझन २ ची घोषणा करताना आनंद होत आहे. पहिल्या यशस्वी सीझनचा सीक्वेल असलेला हा नवीन चॅप्टर परिपूर्ण बिर्याणी पेअरिंगच्या स्वादाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार यांच्या पाठिंब्यासह आगामी एडिशन अपवादात्मक कलनरी अॅडव्हेन्चरचा अनुभव देण्यास सज्ज आहे.
डिस्नी+ हॉटस्टार क्रिएटिव्हवर्क्सने संकल्पना व निर्मिती केलेल्या थम्स अप तूफानी बिर्याणी हंट सीझन २ मध्ये सामील होत प्रतिष्ठित शेफ रणवीर ब्रार हैदराबाद, बेंगळुरू, विशाखापटणम, लखनौ, दिल्ली, मुंबई व कोलकाता या सात विविध प्रांतांमध्ये एक्स्प्लोअर करतील आणि प्रत्येक बिर्याणीच्या तूफानी मूलतत्त्वाला समजून घेतील. अद्वितीय कथानकाच्या माध्यमातून हा हंट देशातील २१ गरमागरम बिर्याणी मेकर्सच्या न सांगण्यात आलेल्या कथांना प्रकाशझोतात आणतो, तसेच शेफ प्रत्येक हॉटस्पॉटमागील प्रेरणास्रोताचा उलगडा करतात. थम्स अप, बिर्याणी आणि शेफ ब्रार यांच्या अद्वितीय संयोजनाचा जुन्या काळापासूनचा प्रश्न ‘कोणती बिर्याणी आहे सर्वात तूफानी’चे उत्तर देण्याचा मनसुबा आहे.
तूफानी बिर्याणी हंटच्या सीझन २ बाबत मत व्यक्त करत कोका-कोला कंपनीचे भारत व नैऋत्य आशियामधील स्पार्कलिंग फ्लेवर्सच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या, ”आम्हाला पडद्यावर सिझलिंग फ्लेवर मोहिम राबवण्यासाठी डिस्नी+ हॉटस्टारसोबत सहयोगाने ‘थम्स अप तूफानी बिर्याणी हंट सीझन २’ सादर करण्याचा आनंद होत आहे. या सीझनमध्ये आम्ही थम्स अपच्या थंडगार स्वादासोबत गरमागरम स्वादिष्ट, स्मोकी बिर्याणीच्या आस्वादाला साजरे करत आहोत. शेफ रणवीर ब्रार स्वत:चे अपवादात्मक टॅलेंट सादर करण्यासोबत हा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आस्वादक करण्यास सज्ज आहे, जेथे आम्ही भारतातील सात विविध प्रांतांमधील सर्वोत्तम बिर्याणीचा उलगडा करत आहोत.”
ब्रँडसोबतच्या उत्साहवर्धक सहयोगाबाबत सेलिब्रिटी शेफ रणवीर ब्रार म्हणाले, ”बिर्याणी फक्त डिश नाही तर वेळ व स्वादाचा प्रवास, परंपरेसह इतिहास व सुवासिक आस्वादाचा अनुभव आहे. मला थम्स अप बिर्याणी हंटच्या आणखी एका सीझनसाठी पुनरागमन करण्याचा आनंद होत आहे, जेथे आम्ही भारतातील विविध प्रांतांमधील बिर्याणीचा इतिहास, वारसा आणि स्वादिष्ट फ्लेवर्सचा उलगडा करत आहोत. प्रत्येक एपिसोड साहसी आहे, ज्यामधून सर्वोत्तम बिर्याणी स्पॉट्स, त्यांच्या कथा जाणून घेण्याचा आणि या डिशला लोकप्रिय बनवणाऱ्या स्वादिष्ट फ्लेवर्सचा आस्वाद देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
या शोबाबत मत व्यक्त करत डिस्नी+ हॉटस्टार येथील जाहिरातींचे प्रमुख ध्रुव धवन म्हणाले, ”डिस्नी+ हॉटस्टारच्या क्रिएटिव्हवर्क्समध्ये आम्ही कथानकाच्या क्षमतेचा फायदा घेत आहोत आणि प्रेक्षकांसोबत अर्थपूर्ण संबंध निर्माण करू पाहणाऱ्या जाहिरातदारांच्या जटिल मार्केटिंग गरजांची पूर्तता करत आहोत. थम्स अप तूफानी बिर्याणी हंट सीझन १ प्रेक्षकांशी उत्तमरित्या संलग्न झाले आणि आम्हाला आणखी एक सीझन सादर करण्याचा आनंद होत आहे, ज्यामधून संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी सर्जनशीलता आणि सांस्कृतिक प्रासंगिकतेला एकत्र करण्याची आमची पद्धत दिसून येते. सीझन २च्या माध्यमातून आम्ही थम्स अपसह या प्रवासाला नव्या उंचीवर घेऊन जात आहोत, स्वादिष्ट फ्लेवर्स व परंपरांचा शोध घेत आहोत, जे बिर्याणीला प्रत्येक भारतीयांमध्ये लोकप्रिय डिश बनवतात.”
थम्स अप तूफानी बिर्याणी हंट सीझन२ हा २८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रायोगिक एपिसोडसह सुरू होण्यास सज्ज आहे. हा सीझन अद्वितीय स्वादाचा अनुभव देणारी मेजवानी, त्यांच्या सर्वोत्तम पाककलांसाठी स्थानिक अभिमानाला सादर करण्याची, तसेच बिर्याणी चाहत्यांना त्यांच्या बिर्याणी सर्वात तूफानी असल्याची खात्री देतो.