कोची, ३० ऑगस्ट २०२४: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (टीपीईएम) या भारतातील ईव्ही क्रांतीमधील अग्रणी कंपनी आणि टाटा मोटर्सच्या उपकंपनीने आज कोची, केरळ येथे TATA.ev ब्रँड आयडेण्टिटीअंतर्गत दोन ईव्ही-एक्सक्लुसिव्ह रिटेल स्टोअर्स लाँच केले. हे प्रीमियम रिटेल स्टोअर्स एडापल्ली व कलामास्सेरी येथे स्थित आहेत आणि सूक्ष्मदर्शी ईव्ही समुदायाला पारंपारिक कार विक्रीच्या तुलनेत अद्वितीय व अपमार्केट खरेदी आणि मालकीहक्क अनुभव देतील.
देशामध्ये इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब वाढत असताना ग्राहकांच्या खरेदी करण्याच्या पद्धतीमध्ये देखील मोठा बदल होत आहे. ईव्ही ग्राहक आता ब्रँडने उत्पादनापासून मालकीहक्कापर्यंत संपूर्ण खरेदीदरम्यान अद्वितीय अनुभव देण्याची अपेक्षा करतात. नवीन ग्राहक-केंद्रित ब्रँड आयडेण्टिटीसह ग्राहकांच्या या मागणीची पूर्तता करण्यात आली आहे, जी समुदाय, तंत्रज्ञान व शाश्वतता या मूल्यांचे पाठबळ असलेल्या भावी गतीशीलतेप्रती कटिबद्धतेला दृढ करते. या मूल्यांना प्रत्यक्ष सादर करत TATA.ev स्टोअर्स ईव्ही ग्राहकांच्या अत्यंत वेगळ्या अपेक्षांना ओळखते. मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये माहिती, सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी इन-स्टोअर अनुभव डिझाइन करण्यात आले आहे. नवीन रिटेल भूमिकांपासून ब्रँडच्या तत्त्वामध्ये खोलवर सामावलेल्या उत्कट व्यक्तींपर्यंत TATA.ev चे होम ऑफ इलेक्ट्रिक उत्साहपूर्ण, स्वागतार्ह, मैत्रीपूर्ण व धमाल असण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. आणि टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, ”देशातील ५.६ टक्के ईव्ही प्रमाणासह इलेक्ट्रिक गतीशीलतेसाठी अग्रगण्य बाजारपेठ असलेल्या केरळमधील लोक भावी तंत्रज्ञानांचा अवलंब करण्यामध्ये अग्रस्थानी आहेत, ज्यामुळे या राज्यामध्ये प्रीमियम TATA.ev स्टोअर्सचे उद्घाटन करणे आमच्यासाठी स्वाभाविक होते. आम्हाला सूक्ष्मदर्शी ईव्ही ग्राहक अधिक परिपक्व होताना आणि प्रीमियम मालकीहक्क अनुभवाची मागणी करताना दिसण्यात आले आहेत. या आर्कटाइपची पूर्तता करण्यासाठी टाटा मोटर्स मास मार्केटसाठी ईव्हींचे लोकशाहीकरण करणे सुरू ठेवण्याप्रती कटिबद्ध आहे, तसेच अत्याधुनिक व डिजिटाइज्ड मालकीहक्क अनुभव देत आहे. याव्यतिरिक्त, आम्ही लवकरच केरळमधील प्रमुख शहरांमध्ये ५ विशेष ईव्ही सर्विस सेंटर्स लाँच करणार आहोत. आमच्यासाठी TATA.ev स्टोअर्स व सर्विस सेंटर्सच्या माध्यमातून उच्चस्तरीय खरेदी व मालकीहक्क अनुभवाची निर्मिती करणे भारतातील इलेक्ट्रिक क्रांतीमधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पे आहेत, जेथे आम्ही देशामध्ये ईव्ही अवलंबतेला अधिक चालना देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.”