maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

फेडएक्स इंटरनॅशनल कनेक्ट प्लसचा विस्तार

मुंबई, ८ जानेवारी २०२५: फेडरल एक्सप्रेस कार्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने फेडएक्स इंटरनॅशनल कनेक्ट प्लसची पोहोच भारतात आणखी वाढवून ग्राहकांना एशिया, अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक गंतव्यस्थानांशी जोडले आहे. क्रॉस-बॉर्डर ई-कॉमर्स शिपमेंट अवघ्या ३-४ व्यावसायिक दिवसांत डिलिव्हर करण्याच्या अनुरोधाने हे किफायतशीर आणि नेमक्या दिवशी आंतरराष्ट्रीय शिपिंग करणारे सोल्यूशन तयार करण्यात आले आहे.

 

२०३० पर्यंत ३२५ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याच्या दिशेने प्रगतीशील असलेल्या भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्राला सक्षम बनविण्याचा फेडएक्सचा हेतू आहे. तसेच थर्ड-पार्टी लॉजिस्टिक्स येत्या सात वर्षांमध्ये सुमारे १७ बिलियन शिपमेंट्सचे व्यवस्थापन करू शकेल हे अपेक्षित असताना विश्वासार्ह, लवचिक आणि परवडण्याजोग्या आंतरराष्ट्रीय शिपिंगची नितांत गरज आहे. क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिक्स सुलभ करून आणि लवचिक डिलिव्हरी पर्याय प्रदान करत ग्राहकांची संतुष्टी वाढवून फेडएक्स इंटरनॅशनल कनेक्ट प्लसने ही मागणी पूर्ण केली आहे.

 

एमईआयएसए, फेडएक्सचे मार्केटिंग आणि एअर नेटवर्कचे उपाध्यक्ष नितीन टाटीवाला म्हणाले, “ई-कॉमर्समुळे क्रॉस-बॉर्डर व्यापार वाढत आहे आणि व्यवसायांना अशा स्मार्ट आणि किफायतशीर उपायांची आवश्यकता आहे, जे गती आणि लवचिकता यांच्या बाबतीत तडजोड न करता पोहोच वाढवतील. आमचा फोकस भारताच्या वाढत्या ई-कॉमर्स क्षेत्रासाठी कार्यक्षम, गतिशील पुरवठा साखळी उपाय तयार करण्यावर आहे. आमच्या प्रगत भौतिक आणि डिजिटल नेटवर्कचे संयोजन करून आमच्या ग्राहकांना, विशेषतः आजच्या स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेत विकासाला गती देणाऱ्या लघु आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांना अधिक चांगली सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे.”

 

ई-कॉमर्ससाठी फेडएक्स इंटरनॅशनल कनेक्ट प्लसच्या इतर लाभांमध्ये ई-कॉमर्सचे निर्बाध एकीकरण, ग्राहकांचे वाढते नियंत्रण आणि दृश्यमानता, डिलिव्हरीचे लवचिक पर्याय, वीकएंडला आणि संध्याकाळी डिलिव्हरी, अतिरिक्त बचत आदींचा समावेश आहे.

Related posts

एचडीएफसी पेन्शन बनली १ लाख कोटी रुपयांचे एयूएम पार करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली फंड मॅनेजर कंपनी

Shivani Shetty

केरल आपदा के लिए 5 करोड़ रुपए देगा कल्याण ज्वेलर्स

Shivani Shetty

झिप इलेक्ट्रिकने तिप्‍पट महसूल वाढीची नोंद केली

Shivani Shetty

Leave a Comment