या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत, अनुरागकश्यपने त्याच्या महाराजा आणि बॅड कॉप या दोन प्रकल्पांसह प्रभावी उंचीगाठली आहे. या यादीत अनुराग कश्यपने आठवे स्थान पटकावले आहे. त्यानेमहाराजा या चित्रपटात सेल्वम ही खलनायकाची व्यक्तिरेखा साकारलीआहे, तर महाराजाची भूमिका साकारणारा नायक विजय सेतुपतीने 28 व्यास्थानावर दावा केला आहे. दिग्दर्शक निथिलन समनाथन यांनी 39 वा क्रमांकपटकावला आहे. बॅड कॉप या क्राईम थ्रिलर सिरीझ मध्ये त्याने काजबे हीव्यक्तिरेखा साकारली आहे.
कल्की 2898 AD चे कलाकार या यादीत वर्चस्व गाजवत आहेत, दीपिकापदुकोण, दिशा पटानी, प्रभास आणि अमिताभ बच्चन अनुक्रमे 1, 6, 12 आणि 27 व्या क्रमांकावर आहेत. तर दिग्दर्शक नाग अश्विन 18 व्याक्रमांकावर आहे. सध्या चंदू चॅम्पियन या चित्रपटात काम केलेल्या कार्तिकआर्यनने या यादीत १३ वे स्थान पटकावले आहे.
लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी वैशिष्ट्य, केवळ Android आणि iOS साठीIMDb ॲपवर उपलब्ध, प्रत्येक आठवड्यात शीर्ष ट्रेंडिंग भारतीय मनोरंजनआणि चित्रपट निर्मात्यांना हायलाइट करते. हे जगभरातील IMDb ला 200 दशलक्षाहून अधिक मासिक भेटींवर आधारित आहे. मनोरंजन चाहते दरआठवड्याला कोण ट्रेंड करत आहे ते पाहू शकतात, त्यांच्या आवडत्यामनोरंजनकर्त्यांना फॉलो करू शकतात आणि नवीन ब्रेकआउट प्रतिभा शोधूशकतात.