maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

रिटेल लेण्डिंग क्षेत्रात रोजगार मागणीत वाढ: टीमलीज सर्विसेस

मुंबई, २२ मे २०२४: द्वितीय तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधीलबीएफएसआयमध्‍ये रिटेल लेण्डिंगप्रती रोजगार मागणीत उल्‍लेखनीय वाढझाली असल्याचे टीमलीज सर्विसेसने नुकतेच केलेल्‍या विश्‍लेषणामधूननिदर्शनास आले आहे. कंपनीच्‍या शीर्ष क्‍लायण्‍ट्सकडून डेटाच्‍या आधारावरकरण्‍यात आलेल्‍या या विश्‍लेषणामध्‍ये ४५,००० हून अधिक तात्‍पुरत्‍याकर्मचाऱ्यांचा समावेश होता. या विश्‍लेषणामधून उद्योगामधील मोठा ट्रेण्‍डनिदर्शनास येतो.  

गेल्‍या दोन आर्थिक वर्षांमध्‍ये वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, क्रेडिट कार्डस् आणिमायक्रो फायनान्सिंग यांचा समावेश असलेल्‍या रिटेल लेण्डिंग क्षेत्राने एकूणरोजगार आकडेवारींमध्‍ये २९ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह उल्‍लेखनीय वाढ दाखवलीआहे. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे द्वितीय तृतीय श्रेणीच्‍या शहरांनी आर्थिकवर्ष २३ आर्थिक वर्ष २४ दरम्‍यान अनुक्रमे वार्षिक २१ टक्‍के आणि २६टक्‍क्‍यांची वाढ दाखवली आहे. रोजगार मागणीतील या वाढीचे श्रेय नॉनमेट्रोआणि अर्धशहरी भागांमधील रिटेल लेण्डिंग संस्‍थांचे फूटप्रिंट वाढवण्‍याच्‍याप्रयत्‍नांना जाते.  

कर्मचारीवर्ग मागणीला चालना देणाया शीर्ष द्वितीय श्रेणी शहरांमध्येजयपूर, चंदिगड, कोईम्‍बतूर, सुरत, लुधियाना, इंदौर, अमृतसर, म्‍हैसूर, नागपूर, विझाग तर शीर्ष तृतीय श्रेणी शहरांमध्ये पटियाला, भटिंडा, मीरत, जामनगर, यमुनानगर, त्रिची, हसन, कोटा, औरंगाबाद, रोहतक आदींचासमावेश आहे.

टीमलीज सर्विसेसच्‍या बीएफएसआयचे उपाध्‍यक्ष व्‍यवसाय प्रमुखकृष्‍णेन्‍दू चॅटर्जी म्‍हणाले, “”हा डेटा विशेषत: द्वितीय तृतीय श्रेणीच्‍याशहरांमधील रिटेल लेण्डिंग उद्योगाच्‍या विकसित होत असलेल्‍यागतीशीलतेवर प्रकाश टाकतो. गेल्‍या दोन आर्थिक वर्षांमध्‍ये रोजगारमागणीत २९ टक्‍क्‍यांनी झालेल्‍या वाढीमधून रिटेल लेण्डिंग उद्योगाच्‍याविकासाला गती देण्‍यासाठी कुशल व्‍यावसायिकांची त्‍वरित गरज दिसून येते. हा ट्रेण्‍ड चालू असलेल्‍या आर्थिक वर्षामध्‍ये देखील कायम राहिल, जेथे रिटेललेण्डिंग संस्‍था उदयोन्‍मुख बाजारपेठांमध्‍ये प्रवेश आणि ग्राहक आऊटरिचधोरणांना प्राधान्‍य देणे सुरू ठेवेल अशी अपेक्षा आहे

Related posts

फेडएक्स इंटरनॅशनल कनेक्ट प्लसचा विस्तार

Shivani Shetty

परवडण्याजोगी आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी ‘ईझेरेक्स’चा पुढाकार

Shivani Shetty

सणासुदीच्‍या निमित्ताने पेटीएमद्वारे ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment