maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

७४% कंपन्या नवोदितांना नोकरी देण्यास तयार: टीमलीज एडटेक

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२५:* भारतातील आघाडीची लर्निंग आणि एम्प्लॉयबिलिटी सोल्यूशन्स कंपनी टीमलीज एडटेक ने आपल्या व्यापक करिअर आऊटलुक रिपोर्ट एचवाय१ (जानेवारी – जून २०२५) ची घोषणा केली आहे. या अहवालात नव्या पदवीधरांसाठी भारतात उदयास येणाऱ्या करिअर संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. एचवाय१ २०२५ मध्ये फ्रेशर्ससाठी हायरिंग इंटेंट ७४% पर्यंत वाढला आहे, जो उद्योग क्षेत्रातील वाढत्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.

 

२०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत विविध उद्योगांमध्ये भरतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. ई-कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप्समध्ये हायरिंग इंटेंट ६१% वरून ७०% (+९%) पर्यंत वाढला आहे, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात ५२% वरून ६६% (+१४%) झाला आहे, आणि इंजिनीयरिंग व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात ५९% वरून ६२% (+३%) पर्यंत वाढ झाली आहे. आयटी क्षेत्राने मोठी सुधारणा दर्शवली आहे, जिथे एचवाय२ २०२४ मधील ४५% हायरिंग इंटेंट एचवाय१ २०२५ मध्ये ५९% पर्यंत पोहोचले आहे.

 

हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातही सकारात्मक वाढ दिसून आली आहे, ज्यामध्ये हायरिंग इंटेंट ४७% वरून ५२% (+५%) पर्यंत वाढला आहे. छोटे क्षेत्र जसे की पॉवर आणि एनर्जी तसेच मार्केटिंग आणि एडवरटाइजिंग मध्येही वाढ झाली असून अनुक्रमे ४% आणि २% वाढीसह हायरिंग इंटेंट २२% आणि ११% वर पोहोचला आहे.

 

स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी पाहिल्यास, बंगळुरू (७८%), मुंबई (६५%), दिल्ली-एनसीआर (६१%) आणि चेन्नई (५७%) हे पदवीधरांसाठी प्रमुख रोजगार केंद्रे ठरत आहेत.

 

रिपोर्टनुसार, डीप-टेक स्किल्स असलेल्या नोकऱ्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. प्रमुख जॉब रोल्समध्ये क्लिनिकल बायोइनफॉर्मेटिक्स असोसिएट, रोबोटिक्स सिस्टीम इंजिनीयर, सस्टेनेबिलिटी एनालिस्ट, प्रॉम्प्ट इंजिनीयर, एआय आणि मशीन लर्निंग इंजिनीयर, क्लाउड इंजिनीयर आणि सायबर सिक्योरिटी एनालिस्ट यांचा समावेश आहे. कंपन्या रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन, परफॉर्मन्स मार्केटिंग, नेटवर्क सिक्युरिटी आणि फायनान्शियल रिस्क एनालिसिस यासारख्या कौशल्यांमध्ये प्रवीण उमेदवार शोधत आहेत.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ऑटोमेशनमुळे कार्यस्थळी मोठे बदल होत असून, त्यामुळे भरती प्रक्रियाही प्रभावित होत आहे. कंपन्या आता प्रोडक्टिविटी आणि कोलॅबोरेशन टूल्स (८३%), प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि टास्क ट्रॅकिंग सॉफ्टवेअर (७३%) आणि डेटा व्हिज्युअलायझेशन टूल्स (६४%) वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. दुसरीकडे, नवीन पदवीधर डेटा व्हिज्युअलायझेशन आणि डेटा एनालिसिस (९२%), कोडिंग असिस्टन्स टूल्स (६६%) आणि प्रॉम्प्ट इंजिनीयरिंग (५७%) वर लक्ष केंद्रित करत आहेत, जेणेकरून त्यांची कौशल्ये उद्योगाच्या मागणीशी सुसंगत राहतील.

 

रिपोर्टमध्ये आणखी एक महत्त्वाचा ट्रेंड स्पष्ट झाला आहे – डिग्री अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम्सच्या वाढत्या संधी. कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग (३०%), इंजिनीयरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर (२३%) आणि माहिती तंत्रज्ञान (१२%) क्षेत्रांमध्ये डिग्री अप्रेंटिसशिप प्रोग्रॅम्स स्वीकारत आहेत, ज्यामुळे उद्योगांना कुशल कर्मचारी तयार करण्यास मदत होत आहे.

 

*टीमलीज एडटेकचे संस्थापक आणि सीईओ शांतनु रूज* म्हणाले “७४% हायरिंग इंटेंट हा फ्रेशर्ससाठी वाढत्या संधींचे स्पष्ट संकेत देतो. एआय आधारित कौशल्ये, डिजिटल सक्षमता आणि अडॅप्टेबिलिटी विकसित करणे गरजेचे आहे, जेणेकरून भारताच्या गतिमान जॉब मार्केटमध्ये त्यांना योग्य संधी मिळू शकतील.”

 

*टीमलीज एडटेकचे एम्प्लॉयबिलिटी बिझनेस हेड आणि सीओओ जयदीप केवलरमानी* म्हणाले, “आज तंत्रज्ञान केवळ रूटीन कामांपुरते मर्यादित नाही, तर ते संपूर्ण कार्यपद्धतीत परिवर्तन घडवत आहे. नियोक्ते प्रत्यक्ष कौशल्यांवर आधारित भरतीला प्राधान्य देत आहेत आणि ८५% हायरिंग इंटेंट हे यावर अवलंबून आहे. डीप-टेक कौशल्ये आणि तंत्रज्ञान-संबंधित भूमिका जॉब मार्केटमध्ये आघाडीवर आहेत.”

 

हा रिपोर्ट भारतभरातील ६४९ नियोक्त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित असून, यात फ्रेशर्स आणि डिग्री अप्रेंटिससाठी हायरिंग ट्रेंड्स आणि नवीन कौशल्यांच्या मागण्या याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

Related posts

सणासुदीच्‍या काळात सॅमसंग इंडियाचा एआय-पॉवर्ड ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ सादर

Shivani Shetty

इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने बीएलडीईए के वाइस प्रेसिडेंट डॉ. पीजी हलकट्टी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, विजयपुरा के साथ करार किया

Shivani Shetty

Leave a Comment