maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सॅमसंगकडून भारतात गॅलेक्‍सी टॅब ए११ लाँच: दैनंदिन वापरासाठी आकर्षक व सुधारित टॅब्‍लेट

गुरूग्राम, भारत – डिसेंबर ३, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलेक्‍सी टॅब ए११ लाँच केला. या टॅब्‍लेटमध्‍ये सर्व वयोगटातील वापरकर्त्‍यांसाठी सर्वोत्तम मनोरंजन, सुलभ कार्यक्षमता आणि वैविध्‍यता आहे.

गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये ८.७ इंच डिस्‍प्‍लेसह ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, ज्‍यामधून वेब ब्राऊज करायचे असो, सोशल मीडिया पाहायचे असो किंवा तुमचे आवडे शोज पाहायचे असो कोणत्‍याही प्रकाशामध्‍ये अद्वितीय व्‍युइंग आणि सुलभ स्‍क्रॉलिंग अनुभव मिळतो. गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये डॉल्‍बी-इंजीनिअर्ड ड्युअल स्‍पीकर्स आहेत, जे चित्रपट, संगीत किंवा व्हिडिओ कॉल्‍ससाठी परिपूर्ण, मोठा व बहुआयामी ऑडिओ देतात.
६एनएम-आधारित ऑक्‍टा-कोअर प्रोसेसरची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी टॅब ए११ जलद व ऊर्जा-कार्यक्षम आहे, जो सुलभ मल्‍टीटास्किंगसाठी अनुकूल आहे. तसेच या टॅबमध्‍ये ५१०० एमएएच बॅटरी आहे, ज्‍यामुळे दीर्घकाळापर्यंत ब्राऊजिंग, गेमिंग व मनमुराद मनोरंजनाचा आनंद घेता येतो.
गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये सुस्‍पष्‍ट व्हिडिओ कॉल्‍ससाठी ५ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आहे. कुटुंबासोबत गप्‍पागोष्‍टी करायच्या असोत किंवा टीमसोबत कामासंदर्भात चर्चा करायची असो अधिक सुस्‍पष्‍टतेमधून वास्‍तविकत: समोरासमोर चर्चा केली जात असल्‍याचा अनुभव मिळतो.
क्‍लासिक ग्रे व सिल्‍व्‍हर रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या गॅलेक्‍सी टॅब ए११ मध्‍ये जवळपास ८ जीबी मेमरी क्षमता आहे, ज्‍यामुळे जलदपणे व सुलभपणे मल्‍टीटास्‍क करता येतात. या टॅबमध्‍ये १२८ जीबी स्‍टोरेज देखील आहे, ज्‍यासह मोठ्या आकाराच्‍या फाइल्‍स सेव्‍ह करता येतात. तसेच, वापरकर्ते मायक्रोएसडी कार्डच्‍या माध्‍यमातून स्‍टोरेज क्षमता जवळपास २ टीबीपर्यंत वाढवू शकतात.
किंमत व उपलब्‍धता:
गॅलेक्‍सी टॅब ए११ Samsung.com, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असेल.
Product Connectivity RAM Storage Price Bank Cashback
Galaxy Tab A11 WiFi 4GB 64GB INR 12999 INR 1000
Galaxy Tab A11 LTE 4GB 64GB INR 15999 INR 1000
Galaxy Tab A11 WiFi 8GB 128GB INR 17999 INR 1000
Galaxy Tab A11 LTE 8GB 128GB INR 20999 INR 1000

Related posts

टाटा मोटर्सने सानंद प्‍लांटमधून १ दशलक्षव्‍या कार सादरीकरणाला साजरे केले*

Shivani Shetty

पीव्‍हीआर आयनॉक्‍सचा किफायतशीर पासपोर्ट आता संपूर्ण भारतात अद्वितीय वैशिष्‍ट्यांसह उपलब्ध

Shivani Shetty

बीम्स फिनटेक फंडाची क्रेडजेनिक्समध्ये गुंतवणूक

Shivani Shetty

Leave a Comment