maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

टाटा मोटर्सकडून व्‍यावसायिक वाहन ग्राहकांसाठी देशव्‍यापी सहभाग उपक्रम ‘कस्‍टमर केअर महोत्‍सव’ लाँच

मुंबई, २३ ऑक्‍टोबर २०२४: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने व्‍यावसायिक वाहन ग्राहकांसाठी सर्वसमावेशक ग्राहक सहभाग उपक्रम ‘कस्‍टमर केअर महोत्‍सव २०२४’च्‍या लाँचची घोषणा केली. हा उपक्रम २४ डिसेंबर २०२४ पर्यंत राबवण्‍यात येईल. हा अद्वितीय व मूल्‍यवर्धित उपक्रम देशभरातील २५०० हून अधिक अधिकृत सर्विस आऊटलेट्समध्‍ये आयोजित करण्‍यात येईल, जेथे ताफा मालक व ड्रायव्‍हर्स माहितीपूर्ण चर्चांसाठी एकत्र येतील. या महोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून ग्राहक अनेक फायद्यांचा आनंद घेऊ शकतात, जसे प्रशिक्षित टेक्निशियन्‍सकडून करण्‍यात येणारे बारकाईने वेईकल चेक-अप्‍स आणि मूल्‍यवर्धित सेवा. तसेच, ड्रायव्‍हर्सना सुरक्षित व इंधन-कार्यक्षम ड्रायव्हिंग पद्धतींबाबत व्‍यापक प्रशिक्षण आणि कंपनीच्‍या संपूर्ण सेवा २.० उपक्रमांतर्गत सर्वोत्तम ऑफरिंग्‍ज मिळतील.

 

कस्‍टमर केअर महोत्‍सव २०२४ एडिशन लाँच करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, ”आम्‍हाला यंदा २३ ऑक्‍टोबरपासून कस्‍टमर केअर महोत्‍सव सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. या दिवसाचे आमच्‍यासाठी खास महत्त्व आहे, जेथे आम्‍ही १९५४ मध्‍ये आमच्‍या पहिल्‍या व्‍यावसायिक वाहनाची विक्री केली होती आणि आम्‍ही आता हा दिवस कस्‍टमर केअर डे म्‍हणून साजरा करतो. या महोत्‍सवामधून सखोल वेईकल चेक-अप्‍स आणि अनेक फायदे देत दर्जात्‍मक सेवा देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. महोत्‍सव देशभरातील प्रत्‍येक टचपॉइण्‍ट्सवर ग्राहकांना आनंदित करण्‍याची खात्री घेत आमचा आमच्‍या सर्व भागधारकांसोबत‍चे नाते दृढ करण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही सर्व ग्राहकांना जवळच्‍या टाटा अधिकृत सर्विस सेंटर्समध्‍ये येण्‍याचे आमंत्रण देतो आणि मला विश्‍वास आहे की, हा उपक्रम त्‍यांच्‍या व्‍यवसायांमध्‍ये अधिक मूल्‍याची भर करेल.”

 

टाटा मोटर्सच्‍या व्‍यापक व्‍यावसायिक वाहन पोर्टफोलिओला पूरक अनेक मूल्‍यवर्धित सेवा आहेत, ज्‍या कंपनीच्‍या संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सर्वसमावेशक वेईकल जीवनचक्र व्‍यवस्‍थापनासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत. हे सर्वसमावेशक सोल्‍यूशन वेईकल खरेदीसह सुरू होते आणि वेईकलच्‍या जीवनचक्रादरम्‍यान प्रत्‍येक कार्यरत पैलूला साह्य करते, ज्‍यामध्‍ये ब्रेकडाऊन असिस्‍टण्‍स, हमीपूर्ण टर्नअराऊंड टाइम्‍स, अॅन्‍युअल मेन्‍टेनन्‍स कॉन्‍ट्रॅक्‍ट्स (एएमसी) आणि जेन्‍यूएन स्‍पेअर पार्ट्सची सोईस्‍करपणे उपलब्‍धता यांचा समावेश आहे. तसेच, टाटा मोटर्स सानुकूल ताफा व्‍यवस्‍थापनासाठी आपले कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजचा फायदा घेते, ज्‍यामुळे ऑपरेटर्स वेईकल अपटाइम वाढवण्‍यास आणि एकूण मालकीहक्‍क खर्च कमी करण्‍यास सक्षम होतात.

Related posts

कोका-कोला इंडिया आणि एसएलएमजी बेव्‍हरेजेसने महाकुंभ २०२५ मध्‍ये सर्वात मोठ्या थंडगार पेय प्रदर्शनासाठी गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डसह इतिहास रचला

Shivani Shetty

सॅमसंग आरअँडडी इन्स्टिट्यूट, नोएडा आणि आयआयटी बॉम्‍बेने डिजिटल हेल्‍थ, एआय व इतर उदयोन्‍मुख तंत्रज्ञानांमधील संशोधनाला चालना देण्‍यासाठी सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली

Shivani Shetty

कनी कुस्रुतीला मिळणार IMDb स्टारमीटर पुरस्कार

Shivani Shetty

Leave a Comment