maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

भारतातील शीर्ष ८ निवासी बाजारपेठांमधील किंमतीत मोठी वाढ

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२४: प्रॉपटायगर डॉटकॉम या ऑनलाइन प्रॉपर्टी ब्रोकरेज कंपनीकडे उपलब्ध असलेल्या डेटा अनुसार, बांधकामाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे भारताच्या ८ महत्त्वाच्या निवासी बाजारपेठांमध्ये मालमत्तेच्या किंमती गेल्या वर्षभरात आणखी वाढल्या आहेत.

 

हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व असणारी आणि आरईए इंडियाची साहाय्यक कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या एका अलीकडच्या अहवालात असे आढळून आले की, विश्लेषणासाठी निवडलेल्या शहरांपैकी बहुतांशी शहरांत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील मालमत्तेच्या सरासरी किंमतीत झालेली वाढ दोन आकडी संख्येत होती. ‘रियल इनसाइट रेसिडेन्शियल: जुलै-सप्टेंबर २०२४’ नामक या अहवालात या भाववाढीसाठी हाय-एंड मालमत्तांसाठी असेलेली वाढती मागणी जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

 

अहवालात म्हटले आहे, “रिझर्व बँकेने गेल्या १० पॉलिसी मीटिंग्समध्ये रेपो रेट ६.५% कायम राखला आहे, ज्याचा दबाव किंमतींवर पडलेला दिसत आहे. हे दर कमी झालेले नसल्याने विकासक आणि खरेदीदार कर्जांवर तुलनेत जास्त व्याज भरत आहेत, ज्याच्यामुळे शेवटी घरांच्या किफायतशिरतेवर परिणाम होतो.”

 

दिल्ली-एनसीआरमध्ये दरात सर्वाधिक वार्षिक वाढ; हैदराबादेत सर्वात कमी

 

सर्वोच्च आठ शहरांत मालमत्तांचा नवीन पुरवठा आणि उपलब्ध असलेल्या मालमत्ता यांच्या किंमतीतील नियमित वार्षिक वाढ या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. अहवालात पुढे असे म्हटले आहे की, ही स्थिर वृद्धी बदलत्या मार्केट परिस्थितीत रियल इस्टेट क्षेत्राची लवचिकता आणि जुळवून घेण्याची वृत्ती दर्शविते.

 

या अहवालानुसार सर्वाधिक वार्षिक वृद्धी दिल्ली-एनसीआर मालमत्ता बाजारपेठेत दिसून आली. ही वाढ तब्बल ५७% आहे.

 

या अहवालात म्हटले आहे की बांधकामाच्या वाढत्या खर्चामुळे या बाजारपेठेत निवासी घरांच्या मूळ विक्री मूल्यात समायोजन करणे गरजेचे होऊन बसले आहे. एंड-यूझरची विलासी मालमत्तांसाठीची दमदार मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास यांच्या संयोजनाने घरांच्या किंमतीत येथे जोमाने वाढ झाली आहे.

 

मागील वर्षाच्या तुलनेत अहमदाबाद आणि मुंबई या पश्चिमेकडील शहरांत आणि दक्षिणेकडील टेक हब बंगळूर येथे १५ ते २१% या श्रेणीत चांगली भाव वाढ झालेली दिसते, तर दक्षिणेकडील चेन्नई आणि पूर्वेकडील कोलकाता येथे ही वाढ २२% इतकी दमदार आहे. यावरून या महानगरांमध्ये एक दमदार आर्थिक कारभार आणि घरांची मागणी स्पष्ट दिसून येते. हा कल आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा या केंद्रांमध्ये स्थिर मागणी सुचवणारा आहे.

 

किफायतशिरतेच्या बाबतीत मुंबईपेक्षा अधिक चांगला पर्याय म्हणून पुण्याकडे बघितले जाते. पुण्यातही सदर वाढ १८% दिसत आहे, याचा अर्थ, ही लक्षणीय वाढ होत असतानाही पुण्याने घर खरेदी करणाऱ्यांसाठी आपले आकर्षण टिकवून ठेवले आहे.

 

आपल्या आयटी सेक्टरबद्दल ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये सदर वृद्धी सगळ्यात कमी ७% इतकी दिसली. यावरून मार्केट अधिक स्थिर आणि परिपक्व असल्याचे दिसून येते. मागील तिमाहीच्या तुलनेत बहुतांशी शहरांत सामान्य वृद्धी किंवा किंचित स्थिरता दिसून आली. बाजार उन्माद मंद होत असल्याचा हा संकेत असू शकतो.

 

प्रॉपटायगर डॉटकॉमचे बिझनेस हेड आणि आरईए इंडियाचे सीएफओ श्री. विकास वधावन म्हणाले, “लक्षणीय वाढ आमच्या निदर्शनास आली आहे, खास करून मेट्रो आणि मिनी मेट्रो शहरांतील प्राइम लोकॅलिटीजमध्ये, पण या घडामोडींकडे भारताच्या आर्थिक वृद्धी आलेखाच्या आणि शहरीकरण पॅटर्नच्या व्यापक भिंगातून बघितले पाहिजे. वर्तमान बाजारातील परिस्थिती, जी सूक्ष्म मागणी-पुरवठा समिकरणानुरूप बदलते आहे, ती दीर्घकालीन वृद्धीसाठी अधिक स्थिर आणि शाश्वत वातावरण उभे करत आहे. एंड-यूझर्स आणि गंभीरपणे गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही स्थिरता विशेष लाभदायक आहे. या टप्प्यातून पसार होत असताना खरेदीदाराच्या अपेक्षा आणि नव्या किंमतींची वास्तविकता जुळून येतील अशी आम्हाला आशा आहे.”

 

हा अहवाल भारतातील गतिशील रियल इस्टेट क्षेत्राचा आढावा घेत वर्तमान मार्केट परिस्थितीचा एक व्यापक आलेख मांडतो आणि मालमत्तेचे संभाव्य खरेदीदार, विक्रेते आणि गुंतवणूकदार यांना मौल्यवान माहिती पुरवतो. मार्केट सतत बदलते आहे, त्यामुळे मालमत्ता क्षेत्रात माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी ही माहिती संबंधित हितधारकांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

Related posts

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून रोडसाइड असिस्टंस प्रोग्रामची घोषणा

Shivani Shetty

टोयोटा किर्लोस्कर मोटर ने अपनी डीलरशिप, राजेश टोयोटा को बेस्ट ससटेनेबल इको प्रैक्टिसेज के लिए सीआईआई ग्रीनको गोल्ड रेटिंग पुरस्कार मिलने पर खुशी मनाई

Shivani Shetty

लिंक्‍डइनकडून मराठी, बंगाली, पंजाबी आणि तेलुगूसह १० नवीन भाषा पर्यायांची भर

Shivani Shetty

Leave a Comment