maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

ईव्ही वित्तपुरवठ्यासाठी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाची कोटक महिंद्रा प्राइमसोबत भागीदारी

१३ जानेवारी २०२५: जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आज केएमपीएलसोबत भागीदारीची घोषणा केली असून त्यातून ईव्ही ग्राहकांना आपल्या नावीन्यपूर्ण बॅटरी-एज-ए- सर्व्हिस (बास) मालकी उपक्रमासाठी आर्थिक उपाययोजना दिली जाईल. या भागीदारीमार्फत बासच्या संकल्पनेला पाठिंबा देणारी केएमपीएल पहिली आघाडीची ऑटो फायनान्सर ठरली असून संभाव्य ग्राहकांपर्यंत तिची पोहोच वाढवण्यासाठी मदत होईल.

बास हा एक लविचक मालकी उपक्रम आहे, ज्यामुळे प्रारंभीचा खरेदी खर्च खूप कमी होतो आणि वाजवी दरातील विनाअडथळा मालकी अनुभव मिळतो. बासची स्थापना सप्टेंबर २०२४ मध्ये झाली आणि त्यांनी ग्राहकांमध्‍ये पुन्हा एकदा ईव्हीबाबत आवड निर्माण केली आहे. त्यामुळे ईव्हीच्या विक्रीत वाढ झाली आहे. या आगळ्यावेगळ्या मालकी मॉडेलमध्ये ग्राहकांचे स्वारस्य वाढत असल्यामुळे केएमपीएल बासच्या श्रेणीत पोहोचली आहे आणि तिला ईव्ही ग्राहकांसाठी आर्थिक उपाययोजना तयार करणे शक्य झाले आहे.

या निमित्ताने बोलताना जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे चीफ ग्रोथ ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले की, “आमचा नावीन्यपूर्णतेचा ध्यास कायम आहे आणि आम्ही ग्राहकांचा आनंद वाढवणारे अनुभव निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. बासमार्फत आम्ही बाजारात एक नवीन गोष्ट आणली आहे आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ईव्हीचा अंगीकार वाढवण्यासाठी ती विविध वित्तीय भागीदारांमार्फत जास्तीत-जास्त पोहोचवणे हे आमचे प्राधान्य आहे. मी केएमपीएल टीमचे स्वागत करतो आणि बास संकल्पना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागीदारी केल्याबद्दल आभार मानतो. केएमपीएलचे व्यापक नेटवर्क आणि डीलर भागीदारांसोबतचा संपर्क हा नक्कीच खास बास संकल्पना जास्तीत-जास्त पोहोचवण्यासाठी व ईव्ही विक्री वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.”

या भागीदारीबाबत बोलताना कोटक महिंद्र प्राइम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व्योमेश कपासी म्हणाले की, “केएमपीएलमध्ये आम्ही वाहन वित्तपुरवठ्यात नावीन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्हाला जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियासोबत त्यांच्या बास ईव्ही मालकी उपक्रमात भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. हा सहयोग भारतातील ईव्ही वित्तपुरवठा वाढवणे आणि विविध क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण आणि ग्राहकस्नेही वित्त उत्पादने देणे यासाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आमची आर्थिक मदत आणखी मजबूत करून इलेक्ट्रिक वाहनांच्या अंगीकारात मदत करू शकू.”

बासमुळे जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने वेगवान ईव्ही अंगीकारासाठी एक योग्य व्यासपीठ तयार केले आहे. त्यांनी ईव्हीच्या बॉडी शेलपासून बॅटरीचा खर्च वेगळा केला आहे. म्हणजेच आता ग्राहक बॉडी शेल आणि बॅटरीसाठी वेगवेगळे आर्थिक पर्याय निवडून ईव्ही भारतात अत्यंत वाजवी दरात खरेदी करू शकतात.

केएमपीएलने २०१९ मध्ये भारतात स्थापना झाल्यापासून जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियासोबत चॅनल फायनान्स आणि रिटेल फायनान्ससाठी व्यावसायिक संबंध स्थापित केले आहेत.

Related posts

भारतातील अव्‍वल ८ गृहनिर्माण बाजारपेठांमध्ये प्रबळ वाढ कायम

Shivani Shetty

रेवफिनची ब्‍ल्‍यूव्‍हील्‍झ आणि कल्‍याणी पॉवरट्रेनसोबत हातमिळवणी

Shivani Shetty

टाटा मोटर्स आणि टाटा इंटरनॅशनलकडून पुण्‍यामध्‍ये प्रगत रजिस्‍टर्ड वेईकल स्‍क्रॅपिंग फॅसिलिटी Re.Wi.Re लाँच

Shivani Shetty

Leave a Comment