मुंबई, २६ डिसेंबर २०२३: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक व्यासपीठाचे सह-संस्थापक व प्रख्यात उद्योजक रिकांत पिट्टी यांना प्रतिष्ठित नॅशनल स्टार्टअप अडवायजरी कौन्सिल (एनएसएसी)चे नॉन-ऑफिशियल सदस्य म्हणून नामांकित करण्यात आले आहे. या मोठ्या विकासासह श्री. पिट्टी आपल्या कौशल्यासह भारतात नाविन्यतेला गती देण्याचा आणि स्टार्टअप्सना पाठिंब देण्याचा मनसुबा असलेल्या धोरणांना आकार देण्यामध्ये योगदान देतील.
श्री. रिकांत पिट्टी म्हणाले, “मला नॅशनल स्टार्टअप अडवायजरी कौन्सिलचे नॉन-ऑफिशियल सदस्य म्हणून नामांकन झाल्याला आनंद होत आहे. यामधून धोरणांची आखणी करण्याची सर्वोत्तम संधी मिळाली आहे, जेथे आपल्या देशातील नाविन्यतेला गती मिळेल आणि स्टार्टअप्सच्या विकासाप्रती योगदान देता येईल. मी स्टार्टअप इकोसिस्टममध्ये सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी सहकारी कौन्सिल सदस्यांसोबत सहयोग करण्यास उत्सुक आहे.”
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी), मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने स्थापना केलेली एनएसएसी सरकारला नाविन्यतेला चालना देण्यासाठी, स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सल्ला देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
श्री. रिकांत पिट्टी कौन्सिलमध्ये आपल्या संपन्न अनुभवाची व कौशल्याची भर करतात. अनुभवी उद्योजक आणि इझमायट्रिप डॉटकॉमचे सह-संस्थापक श्री. रिकांत पिट्टी यांनी कंपनीचे यश व विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एनएसएसीमध्ये त्यांच्या नामांकनामधून त्यांची वैयक्तिक उपलब्धी, तसेच इझमायट्रिपच्या स्टार्टअप इकोसिस्टमप्रती मोठ्या येागदानांचा सन्मान देखील दिसून येतो.