रोमहर्षक क्रिकेट क्षणांदरम्यान स्प्राइट रिफ्रेशिंग सोबती असण्याच्या बाबीला परिपूर्णपणे दाखवते
कोका-कोला कंपनीचे लेमन व लाइम-फ्लेवर्ड पेय स्प्राइट ‘थंड रख’वरील ब्रॅण्ड जाहिरातींच्या सिरीजच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना सामन्यांच्या रोमहर्षक क्षणांदरम्यान शांत राहण्यास आवाहन करत आहे. सुरू असलेल्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खेळवल्या जाणाऱ्या प्रत्येक सामन्यादरम्यान प्रखर क्षण येणे स्वाभाविक आहे. पण, स्प्राइट क्रिकेटप्रेमींना सामन्यादरम्यान दबाव अधिक असताना शांत व संयमी राहण्यास मदत करण्यासाठी अल्टिमेट रिफ्रेशमेंट म्हणून मदतीस धावून आले आहे.
लक्षवेधक टीव्ही जाहिरातींच्या सिरीजमध्ये मित्रांचा समूह आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप पाहताना दाखवण्यात आले आहे. त्यांच्यापैकी एकजण घराचा परिसर स्वच्छ करत आहे, तर इतरजण सामन्यातील एकही क्षण न चुकवण्यासाठी टेलिव्हिजनवर सामना पाहत आहेत. सामन्यामधील रोमांच वाढत जातो तसे घरामध्ये गोंधळ निर्माण होतो. या महत्त्वाच्या क्षणी त्यांच्यापैकी एक मित्र इतरांना स्प्राइट ऑफर करतो.
आणखी एका उत्साहवर्धक व भविष्यकालीन पुढाकारासह स्प्राइट १४ ऑक्टोबर रोजी बहुप्रतिक्षित भारत वि. पाकिस्तान सामन्यादरम्यान शॉपेबल आऊट-ऑफ-होम (ओओएच) जाहिरात मोहिम लाँच करत नाविन्यतेचा अवलंब करत आहे आणि ‘थंड रख’ला प्रेरित करत आहे. सामन्यातील रोमांच वाढत जातो तसे अहमदाबाद शहर व नरेंद्र मोदी स्टेडियमला सादर करणाऱ्या डिजिटल बिलबोर्डवर तापमानामध्ये वाढ झाल्याचे दिसण्यात येते. ओओएचवरील तापमान सामन्याच्या रोमांच पातळ्यांनुसार रिअल-टाइममध्ये बदलेल. या अद्वितीय इनोव्हेशनमध्ये स्टेडियममधील उत्साहाचा स्तर प्रत्यक्ष डेसिबल लेव्हल्सशी जोडण्यात आला आहे, ज्यामधून बोर्डवर रोमांचमध्ये होणारा बदल दाखवण्यात आला आहे.
कोका-कोला इंडियाच्या स्पार्कलिंग फ्लेवर्स (इंडिया व साऊथवेस्ट एशिया)च्या सीनियर कॅटेगरी डायरेक्टर टिश कोन्डेनो मोहिमेप्रती आपला उत्साह व्यक्त करत म्हणाल्या, ”नवीन ‘थंड रख’ मोहिम खेळाला परिभाषित करणाऱ्या संस्मरणीय रोमांचकतेला अंगिकारण्याच्या अवतीभोवती फिरते. या रोमांचपूर्ण क्षणांना आत्मसात करणारे स्प्राइट आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान रिफ्रेशिंग सोल्यूशन प्रदान करत आहे. आम्हाला स्पर्धेच्या साराला सादर करणाऱ्या या रोमांचपूर्ण, उच्च दबावाच्या क्षणांसाठी थंड दिलासा देण्याचा आनंद होत आहे.
ओगील्व्ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, ”जीवनामध्ये गरमागरमीचे वातावरण निर्माण करणाऱ्या स्थिती निर्माण होतात तेव्हा त्यामध्ये शांत व संयमी राहण्यास मदत करण्यासाठी स्प्राइटने पसंतीचा ब्रॅण्ड म्हणून स्वत:चे नाव प्रस्थापित केले आहे. ही मोहिम जीवनातील विविध दृष्टीकोनामधून क्रिकेटला रोमांचक पद्धतीने दाखवते, ज्यांचा शेवट विनोद व हास्यपूर्ण आनंदासह होतो. हे जलद, स्नॅकेबल कन्टेन्ट घरामध्ये गरमागरमीचे वातावरण निर्माण झाल्यास स्प्राइट मदतीस धावून येते याची खात्री देते.”
ओगील्व्ही इंडियाच्या (उत्तर) चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर रितू शारदा म्हणाल्या, ”क्रिकेट वर्ल्ड कप हा जगभरातील सर्वोत्तम संघांमध्ये खेळवला जाणारा मोठा क्रिकेट धमाका आहे. वर्ल्ड कपमध्ये निश्चितच प्रखर क्षण पाहायला मिळतील आणि वातावरण अधिक गरम होऊन जाईल. जाहिराती सामन्यामधील उत्तेजक क्षणांचा वास्तविक जीवनावर कसा परिणाम होतो हे दाखवतात. आम्ही क्रिकेट जगतातून अभिप्राय जाणून घेतले आणि त्यांना वास्तविक जीवनातील स्थितींसह नवीन रूप दिले, ज्याचा अर्थ पूर्णत: वेगळा आहे. गरमागरमीचे वातावरण असताना स्प्राइट ऑफिशियल कूलर म्हणून मदतीस धावून येते आणि प्रेक्षकांना गरमागरमीला दूर ठेवत वर्ल्ड कप पाहण्याचा आनंद घेण्याचे आवाहन करते.”
टीव्हीसी सामन्यांदरम्यान हॉटस्टार व स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित होतील.