maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सोनू सूद यांनी बेबी इनारासाठीच्या फंडरेझिंग मोहिमेचे समर्थन केले

मुंबई, १७ डिसेंबर २०२४:* बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी (एसएमए) ने ग्रस्त मुंबईतील बेबी इनारासाठी सुरु असलेल्या इम्पॅक्ट गुरु ऑनलाइन फंडरेझिंग मोहिमेचे समर्थन केले. सोनू सूद यांनी याआधीही १८ मार्च २०२४ रोजी तिच्या एसएमए उपचारांसाठी निधी गोळा करण्याचं आवाहन केले होते.

 

सोनू सूद यांनी आपल्या व्हिडिओमध्ये १७ जानेवारी २०२४ रोजी पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफीचे निदान झालेल्या बेबी इनारा या लहान मुलीच्या समर्थनासाठी आवाहन केले. इनाराला १६ कोटी रुपयांच्या जीवनरक्षक इंजेक्शनची गरज आहे ज्यापैकी २ कोटी रुपये आधीच जमा झाले आहेत. त्यांनी इनारा आणि तिच्या पालकांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या निराधार अफवांचे खंडन केले आणि इनाराची केस संपूर्णतः खरी असल्यावर भर दिला. सोनू सूद यांनी लोकांना विनंती केली की त्यांनी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पसरवू नये, कारण त्यामुळे इनाराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पूर्वीच्या यशस्वी एसएमए फंडरेझिंग मोहिमांचे उदाहरण देत त्यांनी इनाराला नवजीवन देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं सांगितले.

 

*इनाराचे पालक, नौफिल काझी आणि निखत खान* म्हणाले, “आम्ही सोनू सूद सरांचे खूप आभारी आहोत की त्यांनी बेबी इनाराच्या एसएमए उपचारांसाठी निधी गोळा करण्याच्या मोहिमेचं समर्थन केलं आणि निराधार चुकीच्या समजुतींचं खंडन केले. सत्यापित हॉस्पिटलच्या नोंदी स्पष्टपणे दाखवतात की इनाराला १६ ते १९ ऑक्टोबर २०२४ दरम्यान पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते जे या प्रकरणावर १८ ऑक्टोबर रोजी आलेल्या न्यायालयाच्या आदेशाशी जुळते. एफआयआरमधील आरोप फक्त खोटेच नाहीत, तर न्याय प्रक्रियेचा गैरवापर आहे जो आमच्या मुलीच्या जीवनरक्षक प्रयत्नांना दिशाभूल आणि अडथळा आणण्यासाठी करण्यात आला आहे.”

 

*इम्पॅक्ट गुरुचे सह-संस्थापक आणि सीईओ पियूष जैन* म्हणाले, “या कठीण काळात बेबी इनारा आणि तिच्या कुटुंबासाठी सोनू सूद यांच्या दृढ पाठिंब्याबद्दल आणि इम्पॅक्ट गुरुच्या इनारासारख्या एसएमए ग्रस्त मुलांसाठी जीवनरक्षक उपचार शक्य करण्याच्या मिशनवरील त्यांच्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो. अलीकडे इम्पॅक्ट गुरुवरील बेबी इनाराच्या फंडरेझिंग मोहिमेविरोधात लावलेल्या आरोपांमुळे अनावश्यक संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे आणि तिच्या वाचण्याच्या शक्यतेवर गंभीर परिणाम झाला आहे. आम्हाला कायद्याच्या प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे आणि या प्रकरणात योग्य तथ्य समोर येतील अशी अपेक्षा आहे. आम्ही जनतेला विनंती करतो की त्यांनी इनाराला तिच्या अत्यंत आवश्यक उपचारांपर्यंत पोहोचण्यास मदत करणे सुरु ठेवावे.”

 

Fundraising Link: https://www.impactguru.com/fundraiser/please-save-Inara

 

Video Link: https://www.youtube.com/watch?v=PHf9V5hddtA

Related posts

कोका-कोलाकडून ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपद्वारे धोरणात्‍मक गुंतवणूक केल्‍याची घोषणा

Shivani Shetty

केसांच्या समस्यांवर उपचारासाठी डॉ. बत्रा’जची उत्पादने

Shivani Shetty

कायनेटिक ग्रीनकडून इलेक्ट्रिक तीनचाकी सफर स्‍मार्टची नवीन लिमिटेड एडिशन आणि आकर्षक फेस्टिव्‍ह व फायनान्सिंग ऑफर्सची घोषणा

Shivani Shetty

Leave a Comment