मुंबई, ७ मार्च २०२५: सीओपी३० आणि सीओपी३३ च्या दिशेने जाताना बहुपक्षवाद या विषयावरील चर्चासत्र एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी)ने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या डब्ल्यूएसडीएस २०२५ च्या दुसऱ्या दिवशी पार पडले. आघाडीचे हवामानतज्ञ, विचारवंत, धोरणकर्ते, विकासकर्ते आणि दूरदर्शी वक्त्यांनी प्रभावी जागतिक धोरणांना आकार देण्यासाठी नॅशनली डिटरमाइन्ड कॉन्ट्रिब्युशन्स (एनडीसी) अद्ययावत करण्याची तात्काळ गरज असल्याचे मत व्यक्त केले. या मान्यवर वक्त्यांनी महत्त्वाकांक्षी लक्ष्ये आणि अधिक उत्तरदायित्वांची गरज असून त्यातूनच ग्लोबल स्टॉकटेक (जीएसटी)कडून प्रेरित एनडीसी ३.० चे प्रभावी परिणाम दिसतील, असे सांगितले. जागतिक हवामान कृती व उत्तरदायीत्व आराखड्याया मजबूतीकरणासाठी यूएई-बेलेम वर्क प्रोग्रामची भूमिका अधोरेखित करण्यात आली.
विविध देश बेलेम, ब्राझीलमध्ये आयोजित होणाऱ्या सीओपी३० पूर्वी आपल्या एनडीसी ३.० वचनबद्धता सादर करण्यासाठी तयारी करत असताना भारताने सीओपी३३ च्या आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे. टेरीया डिस्टिंग्विश्ड फेलो श्री. आर. आर. रश्मी यांनी चालवलेल्या सत्रात शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सुस्पष्ट आणि प्रभावी धोरणे तसे सुयोग्य उपाययोजना आखणे, हवामानाशी संबंधित न्याय होईल याची काळजी घेणे आणि भारताला जागतिक हवामान संवादाचे दिशादर्शन करण्यासाठी ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून स्थापित करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचे (आयपीसीसी)चे अध्यक्ष प्रा. जिम स्की आपल्या ‘सायन्स लीडरशिप’ या भाषणात म्हणाले की, “२०१८ मध्ये ग्लोबल वॉर्मिंग १.५°C वर मर्यादित करण्यावरील आयपीसीसी स्पेशल रिपोर्ट प्रकाशित झाल्यानंतर मी असे म्हटले होते की, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या नियमांमध्ये तापमानवाढ १.५°C पर्यंत मर्यादित ठेवणे शक्य होते. परंतु, आता ही शक्यता अत्यंत धूसर झाली आहे. आपल्याला पॅरिस एग्रीमेंटच्या तीन ध्येयांवर प्रगती केल्याशिवाय शाश्वत विकास करणे किंवा दारिद्र्य नष्ट करणे शक्य होणार नाही. आपण या तिन्ही ध्येयांवर प्रगती केल्याशिवाय यातील एकाही ध्येयावर प्रगती करता येणार नाही.”
ब्राझीलचे पर्यावरण आणि हवामानबदल मंत्री महामहिम श्रीमती मरिना सिल्व्हा यांनी ब्राझीलच्या अंगीकाराप्रति असलेल्या वचनबद्धता स्पष्ट केल्या. त्या म्हणाल्या, “कमी कार्बन आणि हवामानात तग धरणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने बदल वेगवान आणि न्याय्य असला पाहिजे. ब्राझील अशा मॉडेलचा पुरस्कार करते, जिथे कोणीही मागे राहणार नाही आणि त्यातून शाश्वत, आर्थिक पर्यायांची हमी तसेच सर्वाधिक धोक्यात असलेली लोकसंख्या व पर्यावरणाला आधार देणाऱ्या अंमलबजावणी यंत्रणा तयार होतील. सीओपी३०चे आयोजक म्हणून ब्राझील हवामानाची जबाबदारी हे एकत्रित कर्तव्य असून फक्त बहुपक्षवाद, आपले देशांतर्गत प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय सहयोगाद्वारेच आपल्या वचनबद्धतांना संपूर्ण कृतीत उतरवता येत असल्याच्या बाबीला अधोरेखित करते.”
नेपाळचे वने आणि पर्यावरण मंत्री महामहिम श्री. आईन बहादूर शशी ठाकुरी म्हणाले की, “भारताने नूतनक्षम ऊर्जेत, वनीकरणात, हवामान कृती, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत शेतीत मोठी प्रगती केली आहे. भारताचा अनुभव नेपाळला हवामान बदलाच्या परिस्थितीत नागरिकांसाठी चांगल्या भविष्याची खात्री करतानाच पर्यावरण आणि शाश्वत विकासाचे संतुलन राखण्यासाठी मार्गदर्शन करू शकतो.”
नॉर्वे सरकारचे हवामान आणि पर्यावरण मंत्री महामहिम श्री. अँड्रेआस जेलांड एरिक्सन म्हणाले की, “सध्या जगासमोर अनेक गोष्टींची आव्हाने आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला एकत्र काम करण्याची गरज नाही. आपल्याला या जास्त आव्हानात्मक जगात अधिक आंतरराष्ट्रीय सहकार्याची गरज आहे. आपण हवामान, निसर्ग आणि प्रदूषणाबाबतच्या पृथ्वीवरील समस्यांवर उपाय काढण्यासाठी एकत्र काम केलेच पाहिजे.”
मालदीवचे पर्यटन आणि पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री महामहिम डॉ. मुवियाथ मोहम्मद यांनी अधिक चांगल्या आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे सांगितले. “सरकारे आणि बिगरशासकीय संस्थांमधील प्रभावी भागीदारीसारख्या महत्त्वाच्या घटकांनी वित्तपुरवठा आणि तांत्रिक दरी सांधली आहे, नावीन्यपूर्णतेला चालना देऊन सर्वसमावेशक तसे बदलात्मक कृतीला प्रोत्साहन दिले आहे, जे एडीसी ३.० च्या वेगवान अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय हवामान कृतीसाठीच्या राज्य सचिव आणि विशेष प्रतिनिधी श्रीमती जेनिफर ली मॉर्गन म्हणाल्या की, “आपण उत्सर्जन किती वेगाने कमी करू शकतो, सर्वाधिक धोक्यात असलेल्यांचे सक्षमीकरण कसे करू शकतो आणि कृती न करण्याच्या परिणामांबाबत कसे गंभीर होऊ तसेच सर्वोत्तम व अद्ययावत विज्ञानाचा वापर यांच्यावर पॅरिस एग्रीमेंटचे यश आधारित असेल. एनडीसी ३.० आणि एनएपी या बदलांना आणि तग धरण्याच्या क्षमतेला चालना देण्यासाठी महत्त्वाचे आहेत.”
क्लायमेट ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती हेलन क्लार्क्सन यांनी व्यावसायिक दृष्टीकोन स्पष्ट केला. त्या म्हणाल्या की, “विद्यमान एनडीसी चक्र हे प्रयत्न अधिक वेगाने करण्यासाठी एक संधी आहे, परंतु हे घडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर समभागधारकांनी एनडीसी लक्ष्ये स्थापित करण्यासाठी अधिक अर्थपूर्ण पद्धतीने सहभागी होणे गरजेचे आहे. एनडीसीमधून महत्त्वाकांक्षांना चालना देण्यासाठी आपल्याला अंतरिम लक्ष्याशी सुसंगत अधिक तपशीलवार, क्षेत्राशी संबंधित बदलाच्या योजना आवश्यक आहेत आणि त्यांना मॉडेल गुंतवणूक आराखड्यांनी जोडणे गरजेचे आहे. व्यवसायासाठी महत्त्वाकांक्षेबाबत सुस्पष्ट सिग्नल देणे आणि खासगी क्षेत्राला चालना देण्यासाठी पाया रचणे खूप गरजेचे आहे.”