maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सिक्‍युराइट एक्‍सडीआरला मिळाले एव्‍ही-टेस्‍ट सर्टिफिकेशन

मुंबई, ३० ऑगस्ट २०२४: सिक्‍युराइट या जागतिक सायबरसुरक्षा सोल्‍यूशन्‍स प्रदाता क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या उद्योग विभागाने आज घोषणा केली की, त्‍यांचे प्रमुख उत्‍पादन सिक्‍युराइट एक्‍सडीआरला प्रतिष्ठित एव्‍ही-टेस्‍ट मान्यताकृत अॅडवान्‍स्‍ड एण्‍डपॉइंट डिटेक्‍शन अँड रिस्‍पॉन्‍स सर्टिफिकेशनसह गौरविण्‍यात आले आहे. आघाडीची स्‍वतंत्र आयटी सुरक्षा संस्‍था एव्‍ही-टेस्‍टने डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत केलेल्‍या सर्वसमावेशक मूल्‍यांकनानंतर हे प्रमाणन देण्‍यात आले आहे. या प्रखर टेस्टिंगने विशेषत: सिक्‍युराइट एक्‍स्‍डीआरच्‍या एण्‍डपॉइंट डिटेक्‍शन अँड रिस्‍पॉन्‍स (ईडीआर) क्षमतांवर लक्ष केंद्रित केले, जेथे उत्‍पादनाच्‍या वास्‍तविक विश्‍वातील परिस्थितींवरील परिणामकारकतेचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी अत्‍याधुनिक सायबर धोक्‍यांचे परीक्षण करण्‍यात आले.

क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी म्‍हणाले, ”एव्‍ही-टेस्‍ट सर्टिफिकेशनमधून आजच्‍या जटिल जोखीम लँडस्‍केपमधील सिक्‍युराइट एक्‍सडीआरच्‍या प्रगत क्षमता दिसून येतात. आमच्‍या सोल्‍यूशनला वरचढ ठरवणारी बाब म्‍हणजे जोखीमांना ओळखण्‍यासोबत विविध धोका स्थितींमध्‍ये उच्‍च दर्जाची, कृतीशील माहिती प्रदान करण्‍याप्रती सोल्‍यूशनची क्षमता. दोन्‍ही चाचणी केसेसमध्‍ये सिक्‍युराइट एक्‍सडीआरने एपीटी ग्रुप्‍स वापरणाऱ्या अत्‍याधुनिक टेक्निक्‍सना ओळखण्‍यामध्‍ये १०० टक्‍के कव्‍हरेज दाखवले. या स्‍तराची कार्यक्षमता अत्‍याधुनिक सायबर धोक्‍यांचा अधिक प्रमाणात सामना करत असलेल्‍या कंपन्‍यांसाठी महत्त्वाची आहे. मिळालेल्‍या या सर्टिफिकेशनमधून अत्‍याधुनिक सायबरसुरक्षा सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ होते, जे धोका करणाऱ्यांच्‍या विकसित होत असलेल्‍या कृत्‍यांशी संलग्‍न राहतात.”

मूल्‍यांकनामध्‍ये दोन विशिष्‍ट धोका पद्धतींचा समावेश होता, प्रत्‍येक पद्धतीमधून अॅडवान्‍स्‍ड पर्सिस्‍टण्‍ट थ्रेट्स (एपीटी)कडून अवलंबण्‍यात येणारे विविध डावपेच व तंत्रे निदर्शनास येतात. पहिल्‍या स्थितीमध्‍ये एपीटी१८-स्‍टाइल सायबर एस्पिआनेज धोक्‍याचे परीक्षण करण्‍यात आले, तर दुसऱ्या स्थितीमध्‍ये टीए५७७, टुर्ला व एफआयएन६ जोखीम ग्रुप्‍सच्‍या मिश्रित डावपेचांचा समावेश होता. या स्थिती आजच्‍या जोखीम लँडस्‍केपमध्‍ये वाढत असलेल्‍या जटिल, बहु-स्‍तरीय धोक्‍यांचे निदान करत प्रतिसाद देण्‍याप्रती सिक्‍युराइट एक्‍सडीआरच्‍या क्षमतांना आव्‍हान देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या.

सिक्‍युराइट एक्‍सडीआरमध्‍ये एआय-सक्षम सखोल प्रेडिक्टिव्‍ह मालवेर-हंटिंग तंत्रज्ञानासह रिअल-टाइम थ्रेट इंटेलिजन्‍सचे संयोजन आहे, जे परिपूर्ण व्हिजिबिलिटी आणि कार्यक्षम सुरक्षा व्‍यवस्‍थापनासाठी युनिफाईड डॅशबोर्ड देते. हे सोल्‍यूशन विविध ऑपरेटिंग सिस्‍टम्‍समधील प्रत्‍यक्ष व व्‍हर्च्‍युअल एण्‍डपॉइंट्सना पाठिंबा देते, ज्‍यामुळे विविध उद्योग स्थितींमध्‍ये अनुकूल आहे. मूळ कारणाचे विश्‍लेषण आणि महत्त्वपूर्ण घटनांमध्‍ये रिअल-टाइम प्रतिसादाकरिता ऑटोमेटेड प्‍लेबुक्‍सचा वापरासाठी या सोल्‍यूशनचे MITRE ATT&CK® फ्रेमवर्कसह एकीकरण अत्‍याधुनिक सायबर जोखीमांचे निराकरण करण्‍यामधील त्‍याच्‍या परिणामकारकतेमध्ये अधिक वाढ करते.

Related posts

२०४७ पर्यंत पूर्णत: सक्रिय भारतीयांमुळे जीडीपीमध्‍ये वार्षिक १५ ट्रिलियन रूपयांपेक्षा जास्‍त वाढ होऊ शकते: स्‍पोर्टस् अँड फिजिकल अॅक्टिव्‍हीटी (एसएपीए) बाबत डालबर्ग अहवाल

Shivani Shetty

कोका-इंडिया आणि अंजू बॉबी स्‍पोर्ट्स फाऊंडेशन यांच्‍यामधील दीर्घकालीन सहयोग महिला अॅथलीट्सना सक्षम करत आहे ~ कोका-कोला इंडिया सरावासाठी मोठे मैदान आणि दर्जात्‍म‍क

Shivani Shetty

डॉ.वेणू मूर्ती अपराजिताचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्त

Shivani Shetty

Leave a Comment