maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

अत्‍यंत टिकाऊ कॉर्निंग® गोरिला® आर्मर २ असलेली सॅमसंग गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज प्री-ऑर्डर करा, किंमत ८०,९९९ रूपयांपासून

भारत, जानेवारी ३१, २०२५: सॅमसंग या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने बहुप्रतिक्षित गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज अधिकृतरित्‍या लाँच केली आहे, ज्‍यामध्‍ये नवीन गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा, गॅलॅक्‍सी एस२५+ आणि गॅलॅक्‍सी एस२५ स्‍मार्टफोन्‍स आहेत. युजर अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जात नवीन गॅलॅक्‍सी सिरीजमध्‍ये उद्योगातील पहिले अॅण्‍टी-रिफ्लेक्टिव्‍ह ग्‍लास सिरॅमिक कार्निंग® गोरिला® आर्मर २ सादर करण्‍यात आले आहे, जी अपवादात्‍मक स्‍क्रॅच रेसिस्‍टण्‍स आणि सुधारित डिस्‍प्‍ले सुस्‍पष्‍टता देते. ही सिरीज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्‍ध आहे, जेथे गॅलॅक्‍सी एस२५ साठी किंमत ८०,९९९ रूपयांपासून, गॅलॅक्‍सी एस२५+ साइी किंमत ९९,९९९ रूपयांपासून आणि गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रासाठी किंमत १,२९,९९९ रूपयांपासून सुरू होते.

 

गोरिला आर्मर २ ग्‍लास सिरॅमिक तंत्रज्ञानामधील महत्त्वपूर्ण यश आहे, ज्‍यामध्‍ये स्‍मार्टफोन डिस्‍प्‍लेवरील उच्‍च दर्जाची मजबूती आणि सर्वोत्तम सुस्‍पष्‍टतेचे संयोजन आहे. जवळपास २.२ मीटर उंचीवरून खाली पडल्‍यानंतर देखील उत्तम स्थिती राहण्‍याच्‍या क्षमतेसह ही ग्‍लास उच्‍च दर्जाचे संरक्षण देते आणि डिस्‍प्‍लेवर कमी रिफ्लेक्‍शन्‍सह प्रीमियम डिस्‍प्‍ले अनुभव देते. यामधून सर्व प्रकाशांमध्‍ये सुस्‍पष्‍टतेची खात्री मिळते. फर्स्‍ट-जनरेशन कार्निंग® गोरिला® आर्मरच्‍या तुलनेत गोरिला आर्मर २ अधिक टिकाऊपणा देते. गोरिला आर्मर २ असलेले डिवाईसेस रोजच्‍या खडतर व अनपेक्षित वापरामध्‍ये देखील टिकून राहण्‍याची खात्री देतात. विशेषत:, मजबूत, आव्‍हानात्‍मक पृष्‍ठभागांवर स्‍मार्टफोन पडल्‍यास गोरिला आर्मर २ ब्रेकेज सारख्‍या नुकसानापासून संरक्षण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जी पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम आहे.

 

उल्‍लेखनीय टिकाऊपणा व्‍यतिरिक्‍त गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजमध्‍ये नवीन स्‍नॅपड्रॅगन® ८ एलाइट मोबाइल प्‍लॅटफॉर्मच्‍या माध्‍यमातून सुधारित वन यूआय ७ द्वारे समर्थित एआय-संचालित वैशिष्‍ट्ये आहेत. या सुधारणा अधिक सर्वोत्तम, वैयक्तिकृत मोबाइल अनुभव, सुधारित कॅमेरा तंत्रज्ञानासह प्रोव्हिज्‍युअल इंजिन आणि विनासायास कार्यक्षमतेसाठी अपवादात्‍मक प्रोसेसिंग शक्‍ती देतात.

 

गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा ५० मेगापिक्‍सल अल्‍ट्रावाइड कॅमेरा सेन्‍सरसह अग्रस्‍थानी आहे, जी सर्व स्थितींमध्‍ये, तसेच अंधुक प्रकाशत देखील अपवादात्‍मक सुस्पष्‍टता देते. १०-बीट एचडीआर रेकॉर्डिंग, नको असलेला आवाज काढून टाकण्‍यासाठी ऑडिओ एरेजर आणि प्रो-लेव्‍हल व्हिडिओ एडिटिंगसाठी गॅलॅक्‍सी लॉग असलेली गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज कॅज्‍युअल व प्रोफेशनल कन्‍टेन्‍ट क्रिएटर्ससाठी परिपूर्ण टूल आहे.

टिकऊपणा व शाश्‍वततेसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रामध्‍ये प्रीमियम टायटॅनिअम फ्रेम आहे, तर एस२५ व एस२५+ मॉडेल्‍समध्‍ये रिसायकल केलेले आर्मर अॅल्‍युमिनिअम आहे. गॅलॅक्‍सी एस२५ सिरीज ओएस अपग्रेड्सचे सात जनरेशन्‍स आणि सात वर्ष सिक्‍युरिटी अपडेट्स देखील देते, ज्‍यामधून दीर्घकाळापर्यंत टिकाऊपणा आणि सानुकूल कायक्षमेची खात्री मिळते.

 

गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना २१००० रूपयांचे प्री-ऑर्डर फायदे मिळतील. यामध्‍ये १२००० रूपयांच्‍या स्‍टोरेज अपग्रेडचा समावेश आहे, जेथे ग्राहकांना १२ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये १२ जीबी ५१२ जीबी व्‍हेरिएण्‍ट, तसेच ९००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. याव्‍यतिरिक्‍त, ग्राहक ९ महिन्‍यांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआय प्‍लॅनसह गॅलॅक्‍सी एस२५ अल्‍ट्रा खरेदी केल्‍यास ७००० रूपयांच्‍या कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात.

 

गॅलॅक्‍सी एस२५+ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १२००० रूपयांचे फायदे मिळतील, जेथे ग्राहकांना १२ जीबी २५६ जीबी व्‍हेरिएण्‍टच्‍या किमतीमध्‍ये १२ जीबी ५१२ जीबी व्‍हेरिएण्‍ट मिळेल. दरम्‍यान, गॅलॅक्‍सी एस२५ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना अपग्रेड बोनस म्‍हणून ११००० रूपयांचे फायदे मिळतील. याव्‍यतिरिक्‍त, ग्राहक ९ महिन्‍यांच्‍या नो कॉस्‍ट ईएमआय प्‍लॅनसह गॅलॅक्‍सी एस२५ खरेदी केल्‍यास ७००० रूपयांच्‍या कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. सॅमसंग ग्राहकांना गॅलॅक्‍सी एस२५ आणि गॅलॅक्‍सी एस२५+ साठी सर्व आघाडीच्‍या एनबीएफसींच्‍या माध्‍यमातून २४ महिन्‍याच्‍या नो कॉस्‍ट ईएमआयचा लाभ घेण्‍याचा पर्याय देखील देत आहे.

 

गॅलॅक्‍सी एस२५ सिरीजसाठी प्री-ऑर्डर २३ जानेवारीपासून सर्व आघाडीच्‍या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्‍टोअर्समध्‍ये, तसेच https://www.samsung.com/in/live-offers/ येथे सॅमसंग लाइव्‍हवर सुरू झाली आहे.

Related posts

माझाच्‍या नवीन कॅम्‍पेनसह जीवनातील दैनंदिन विजयाचा जल्‍लोष

Shivani Shetty

‘मामला लीगल है’ आणि ‘लापता लेडीज’ मधील कलाकार या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत

Shivani Shetty

अपोलो तर्फे संस्थापक दिनाच्या निमित्ताने सामुदायिक उपक्रमाचे आयोजन

Shivani Shetty

Leave a Comment