maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सहीबंधूने १४,००० कोटी रुपयांचे गोल्ड लोन वितरित केले

मुंबई, २८ ऑगस्ट २०२४: सहीबंधू हे गोल्ड लोन सेवा ग्राहकांच्या दाराशी उपलब्ध करून देणारे एक आघाडीचे फिनटेक गोल्ड लोन अॅग्रीगेटर स्टार्टअप आहे, ज्यांनी लक्षणीय वृद्धी करत भारताच्या आर्थिक परिदृश्यावर प्रभाव टाकला आहे. मणिपाल समूहाने पोसलेल्या आणि राजेश शेट, अनुज अरोरा आणि विजय मल्होत्रा यांनी स्थापन केलेल्या सहीबंधूने भारतातील ६४०+ जिल्ह्यांमधील ३,६०,००० पेक्षा जास्त ग्राहकांना १४,००० कोटी रु. पेक्षा जास्त किंमतीची गोल्ड लोन वितरित केली आहेत.

सह-संस्थापक आणि सीईओ राजेश शेठ म्हणाले, “आम्ही सहीबंधूची स्थापना केली, त्यावेळी सोने तारण कर्ज आधिक सहज उपलब्ध, पारदर्शक आणि ग्राहक-केंद्री बनवून गोल्ड लोन क्षेत्राचा कायापालट करणे हे आमचे लक्ष्य होते. भारतीयांच्या घराघरात असलेल्या सुवर्ण संपत्तीची प्रचंड क्षमता आम्ही ओळखली आणि त्याचबरोबर सोयिस्कर, विश्वासार्ह आर्थिक सेवांची गरज देखील जाणली. आज ३,६०,०००+ ग्राहकांना सेवा प्रदान करून आणि १४,००० कोटी रु. पेक्षा जास्त रकमेची कर्जे वितरित करून त्या लक्ष्याच्या दिशेने आम्ही लक्षणीय पावले टाकली आहेत. यापुढे आम्हाला आमच्या सेवा आणखी डिजिटलाइझ करायच्या आहेत, आमची पोहोच सध्याच्या ११,०००+ पिन कोड्सच्या पलीकडे, आणखी दूरस्थ भागांपर्यंत वाढवायची आहे आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा भागवू शकतील अशी नावीन्यपूर्ण आर्थिक उत्पादने सादर करायची आहेत. आम्ही अशा भविष्याची कल्पना करत आहोत, जेथे प्रत्येक भारतीय, त्याचे स्थान (लोकेशन) आणि त्याचा बँकिंग इतिहास यांचा बाध न येता, आपल्या सुवर्ण संपत्तीचा उपयोग करून औपचारिक कर्ज सुलभतेने मिळवू शकेल आणि अनियोजित मार्केटमधील सावकारांनी पसरलेल्या कर्जाच्या दुष्ट चक्रात अडकून राहणार नाहीत.”

विना-त्रास मिळणारे सोने तारण कर्ज, कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत मिळणारी मदत आणि कर्ज वितरणानंतर मिळणारी ग्राहक सेवा यामध्ये सहीबंधूचे वेगळेपण दडलेले आहे. दाराशी सोने तारण कर्ज सेवेसाठी, एकदा ग्राहकाने गोल्ड लोनसाठी अर्ज केला की, २ मिनिटांच्या आत सहीबंधू त्याची अपॉईंटमेंट नक्की करते, त्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी एका मूल्य-निर्धारकासमवेत ग्राहकास सोयिस्कर असलेल्या ठिकाणी त्याला येऊन भेटतो, त्याच्याकडे असलेल्या सोन्याचे झटपट मूल्यांकन करतो आणि आवश्यक ती कागदपत्रे तयार करतो व हे सारे ग्राहकाला घरबसल्या करून मिळते. या प्रक्रियेदरम्यान ग्राहकाच्या सोन्याचा सुरक्षितपणे विमा काढला जातो आणि त्वरित कर्ज वितरण करण्यात येते.”

Related posts

फॉर्च्युनची सोया चंक्स साठी ‘बनाओ कुछ हटके’ मोहीम

Shivani Shetty

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड तर्फे सेबीकडे डीआरएचपी सादर

Shivani Shetty

येत्या वर्षात मोठ्या सदनिकांसह लक्‍झरी राहणीमानाला भारतीयांची पसंती: हाऊसिंग डॉटकॉम

Shivani Shetty

Leave a Comment