गुरूग्राम, ऑगस्ट २०२४ – कोका-कोला कंपनीने आपला स्वदेशी ब्रँड लिम्काअंतर्गत किफायतशीर ग्लुकोज व इलेक्ट्रोलाइट ड्रिंकसाठी नवीन ब्रँड ओळख – नवीन लिम्का ग्लुकोचार्ज लाँच केले आहे. ग्लुकोज व इलेक्ट्रोलाइट्सचे अद्वितीय मिश्रण असलेले लिम्का ग्लुकोचार्ज त्वरित रिहायड्रेशन व ऊर्जेसाठी पसंतीचे पेय आहे, तसेच सक्रिय जीवनशैली जगणाऱ्यांना ऊर्जा देण्याकरिता ऑन-ग्राऊंड व दैनंदिन गोड क्षण आणि आव्हानांसाठी परिपूर्ण आहे. लिम्का ग्लुकोचार्ज ऑलिम्पिक्सदरम्यान चॅम्पियन्सचे पथक – नीरज चोप्रा, मेन्स इंडिया हॉकी टीम, तसेच सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यासह लाँच करण्यात आले. ब्रँड जाहिरातींच्या सिरीजच्या माध्यमातून ब्रँडने ‘सिल्व्हर’ लायनिंगसह गोल्डन बॉयला पाठिंबा देण्याप्रती (Link), डायनॅमिक जोडीला सक्षम करण्याप्रती (Link) आणि प्रबळ हॉकी टीम व टीममधील हिरोजचे मनोबल वाढवण्याप्रती कटिबद्धता दाखवली (Link).
ऑलिम्पिक गेम्स पॅरिस २०२४ चा ऑफिशियल हायड्रेशन पार्टनर म्हणून रिफ्रेशिंग व एनर्जी-बूस्टिंग ड्रिंकने चॅम्पियन्सना त्यांच्या सर्वोत्तमता गाठण्याच्या प्रयत्नांमध्ये पाठिंबा दिला. सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय मल्टी-स्पोर्ट इव्हेण्टचे समापन होत असताना ब्रँड अॅथलीट्सना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सलाम करतो.
पाणी-आधारित, नो-फिज ड्रिंक क्रीडा, प्रवास, व्यायाम व मेहनतीची कामे अशा शारीरिक क्रियाकलापांदरम्यान त्वरित रिहायड्रेशनसाठी डिझाइन करण्यात आले आहे. रिफ्रेशिंग रिअल लेमन ज्यूसने युक्त लिम्का ग्लुकोचार्ज कार्यक्षम फायद्यांसह उत्तम स्वाद देते, जे त्वरित उत्साहित करते.
कोका-कोलाच्या भारत व नैऋत्य आशियामधील हायड्रेशन, स्पोर्ट्स अँड टी कॅटेगरीच्या मार्केटिंगच्या वरिष्ठ संचालक रूचिरा भट्टाचार्य म्हणाल्या, “लिम्का ग्लुकोचार्जसह आम्ही चॅम्पियन्सचे मैदानावर व मैदानाबाहेर मनोबल वाढवत आहोत, त्यांच्या अतूट उत्साहाच्या ऊर्जेशी संलग्न होत आहोत. आम्हाला ऑलिम्पिक गेम्स पॅरिस २०२४ साठी आपल्या हिरोंना पाठिंबा देण्याचा अभिमान वाटतो, यामधून सर्वोत्तमतेला चालना देण्याप्रती, तसेच आपल्या अॅथलीट्सच्या स्थिरतेला सन्मानित करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”
“लिम्का ग्लुकोचार्जच्या लाँचसह आमच्या ऑलिम्पिक कॅम्पेनचा सन्मान आणि सर्वोत्तमतेचे बॅज देखील सादर करण्यात आले आहेत. बॅडमिंटनमध्ये चिरा व सात्विक, भालाफेकमध्ये नीरज चोप्रा आणि द हॉकी फेडरेशन ऑफ इंडिया हे ब्रँडसाठी प्रमुख विजय आहेत. यासारख्या संघटनांमधून कॉर्पोरेट भारताला क्रीडा इकोसिस्टमला पाठिंबा देण्यासाठी असलेल्या गरजा दिसून येतात आणि एलए २०२८ च्या दिशेने प्रवास आमच्यासाठी अधिक प्रबळ असेल,” असे मेराकी स्पोर्ट्स अँड एंटरटेन्मेंटच्या संचालक व सह-संस्थापक नम्रता पारेख म्हणाल्या.
लिम्का ग्लुकोचार्ज पेय निवडी #BeveragesForLife चे व्यापक स्पेक्ट्रम प्रदान करण्याप्रती कंपनीच्या विद्यमान कटिबद्धतेचा भाग आहे, जे स्वाद व कार्यक्षम फायदे देतात. या नाविन्यतेमधून ग्राहकांना उत्तम स्वाद असण्यासोबत त्यांच्या हायड्रेशन व रिप्लेनिशमेंट गरजांची पूर्तता देखील करणारी पेये देण्याप्रती कंपनीचे प्रयत्न दिसून येतात.