मुंबई, २५ जुलै २०२४ – रेमंड रियल्टीने मुंबई बाजारपेठेत आपली उत्तम कामगिरी सुरू ठेवली आहे. इंडेक्स टॅपच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत त्यांच्या प्रीमियम निवासी प्रकल्प ‘द ॲड्रेस बाय जीएस’ ने बांद्रा पूर्व मधील घरांच्या विक्रीत अव्वल स्थान पटकावले आहे.‘द ॲड्रेस बाय जीएस’ ने सर्वाधिक २९१ कोटी रु. युनिट्सची विक्री केली असून, मध्य उपनगरात सर्वाधिक ९६ युनिट्सची विक्री झाली आहे. विकल्या गेलेल्या युनिट्सच्या बाबतीत ‘द ॲड्रेस बाय जीएस’ हे यादीतील पुढच्या रिअल इस्टेट प्रकल्प पेक्षा दुप्पटीहून जास्त पुढे आहे. यावरून प्रकल्पाच्या आरामदायी, लक्झरी योजनांना बाजारपेठेतून असलेली मजबूत मागणी दिसून येते.
हरमोहन साहनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, रेमंड रियल्टी म्हणाले,“आम्ही व्यवसायाला सुरुवात केल्यापासून केवळ पाच वर्षांत पहिल्यापासूनच देशातील आघाडीच्या १० रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये आहोत आणि उलाढालीच्या बाबतीत, एमएमआर मध्ये पाचव्या क्रमांकावर आहोत. आमचा पहिला प्रकल्प महारेरा डेडलाइनच्या दोन वर्षे आधी पूर्ण झाला. रेराकडून त्याचे कौतुक झाले. जेव्हा आम्ही बांद्रा येथे प्रकल्प सुरू केला, तेव्हा आम्ही त्या मायक्रो मार्केटमध्ये एका वर्षात विकले जातील, एवढ्या युनिट्सची विक्री करणे जमविले आणि आज वांद्रे प्रकल्प वेळापत्रकाच्या पुढे सुरू आहे. अगदी आताच्या काळात मिळालेल्या या यशावरून अतुलनीय निवासी प्रकल्पाचा अनुभव देण्याची आणि मुंबई महानगर विभागातील महत्त्वपूर्ण ठिकाणी धोरणात्मक लक्ष केंद्रित करण्याबाबत असलेली रेमंड रियल्टीची बांधिलकी ठळकपणे दिसून येते.”
बांद्रा, माहीम आणि सायन यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या धोरणात्मक संयुक्त विकास कराराद्वारे (JDAs) मुंबई बाजार पेठेतील कंपनीच्या अलीकडील विस्तारामुळे ही वचनबद्धता दिसून येते. ७,००० कोटी रु.हून अधिक उत्पन्नाची एकत्रित क्षमता असलेले हे प्रकल्प रेमंड रियल्टीचे विकासाचे दृष्टिकोन आणि मुंबईतील वैविध्यपूर्ण गृहखरेदीदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे समर्पण दर्शवितात.बांद्रा पूर्वला असलेला हा प्रकल्प अतुलनीय सुविधा आणि विलक्षण व्ह्यूसह आलिशान अपार्टमेंट्सची श्रेणी सादर करतो. ‘द ॲड्रेस बाय जीएस’ हा रेमंड रियल्टीच्या मुंबई बाजारपेठेमधील विकासाचा प्रमुख घटक असून, या प्रकल्पाने कंपनीच्या मजबूत आर्थिक कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.