मुंबई, १९ एप्रिल २०२४ – कॅरटलेन या भारतातील आघाडीच्या बहुमाध्यमिक ब्रँडने उत्सव हे नवे कलेक्शन लाँच केले. उत्सव या नावाला साजेसे हे कलेक्शन असून भारतीय संस्कृतीतील सण आणि आनंद व्यक्त करणारे आहे. ब्रँडच्या #KhulKeKaroExpress या तत्वाशी सुसंगत डिझाइन्स त्यात समाविष्ट करण्यात आली असून ती प्रत्येक स्त्रीची स्टाइल, तिचं व्यक्तिमत्त्व आणि भावना साजऱ्या करण्यासाठी खास तयार करण्यात आलं आहे.
यातील प्रत्येक डिझाइन अतिशय काळजीपूर्वक बनवण्यात आलं असून त्यात १४ कॅरेट सोनं व हिऱ्याच्या नाजुक कलाकुसरीचा समावेश करण्यात आला आहे. या कलेक्शनच्या निमित्ताने दागिने क्षेत्रात पहिल्यांदाच सोन्याच्या शीट्सचे लेयर करण्यासाठी लेसर- कट तंत्र वापरून आकर्षक थ्रीडी डिझाइन्स बनवण्यात आली आहेत. ब्रँडने या कलेक्शनमध्ये फॅशन आणि नाविन्य यांचा मिलाफ साधत वैयक्तिक स्टाइल अनोख्या पद्धतीने व्यक्त करण्याची संधी दिली आहे. ही डिझाइन्स ट्रेंडी, अभिजात, डौलदार आणि आधुनिक असून शहरी स्त्रीला आपलीशी वाटते.
अतुल सिन्हा, प्रमुख ऑपरेटिंग अधिकारी, कॅरेटलेन म्हणाले,’‘कॅरेटलेनमध्ये आम्ही दागिन्यांकडे केवळ परिधान करण्याची वस्तू म्हणून पाहात नाही, तर ते स्वअभिव्यक्तीचं साधन आहे असं आम्हाला वाटतं. ब्रँडच्या स्थापनेपासूनचा आम्ही वैविध्यपूर्ण दागिने तयार करण्यावर भर दिला असून ते परिधान करणाऱ्याची स्टाइल, व्यक्तिमत्त्व आणि भावना चांगल्या प्रकारे व्यक्त करतील याची करतील याची काळजी घेतली आहे. उत्सव कलेक्शनच्या माध्यमातून आम्ही स्त्रियांना त्यांची स्वतःची स्टाइल उंचावण्यासाठी आणि मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देत आहोत.’’
कलेक्शनच्या माध्यमातून कॅरेटलेन स्त्रियांना स्टाइलचं नवं परिमाण आपलंसं करून सणांचा आनंद साजरा करण्यासाठी प्रेरणा देत आहे. उत्सव हे कलेक्शन भारतातील २७० पेक्षा जास्त दालनांमध्ये आणि www.caratlane.com वर उपलब्ध करण्यात आलं आहे.