maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

हिरो मोटोकॉर्पची सणासुदीच्‍या काळा दरम्‍यान आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह विक्रीसह प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल

३२-दिवसांच्‍या कालावधीदरम्‍यान १६ लाख युनिट्सच्‍या रिटेल विक्रीसह १३ टक्‍के वाढीची नोंद

हिरो मोटोकॉर्प या जगातील मोटरसायकल्‍स व स्‍कूटर्सच्‍या सर्वात मोठ्या उत्‍पादक कंपनीने नवरात्रीपासून सुरू झालेल्‍या ३२ दिवसांच्‍या फेस्टिव्‍ह कालावधीदरम्‍यान आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च रिटेल विक्रीची नोंद केली.

१५.९८ लाखांहून अधिक (१.६ दशलक्ष) युनिट्सच्‍या विक्रीसह कंपनीने २०२३ च्‍या सणासुदीच्‍या काळाच्‍या तुलनेत प्रभावी १३ टक्‍के वाढीची नोंद केली.

भारतातील शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये हिरो मोटोकॉर्पच्‍या उत्‍पादनांसाठी मोठी मागणी दिसून आली. १२५ सीसी मोटरसायकल श्रेणीमध्‍ये एक्‍स्‍ट्रीम १२५आर प्रमुख विकास स्रोत ठरली, तर १०० सीसी श्रेणीने देखील कंपनीच्‍या प्रबळ विक्री कामगिरीमध्‍ये सकारात्‍मक योगदान दिले.

हिरो मोटोकॉर्पचा इलेक्ट्रिक वेईकल ब्रँड व्हिडाने याच कालावधीदरम्‍यान ११,६०० रिटेल विक्री करत मोठा टप्‍पा गाठला. टॉप ३० नगरांवर अधिक भर देण्‍यासोबत हिरो प्रीमिया व हिरो २.० आऊटलेट्सचा फायदा घेत व्हिडा नेटवर्कच्‍या सुरू असलेल्‍या विस्‍तारीकरणामधून सकारात्‍मक निष्‍पत्ती दिसून येत आहे. आगामी पोर्टफोलिओ विस्‍तारीकरण ब्रँडला अधिक प्रेरित करण्‍यास सज्ज आहे.

हार्ले-डेव्हिडसन एक्‍स४४० ने २८०० हून अधिक युनिट्सच्‍या विक्रीचा टप्‍पा गाठला, ज्‍यामधून ब्रँडची लोकप्रिय दिसून येते. कंपनीचा या आर्थिक वर्षाखेरपर्यंत प्रीमिया नेटवर्क १०० हून अधिक ठिकाणांपर्यंत विस्‍तारित करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे या महत्त्वाकांक्षी ब्रँडची पोहोच व उपलब्‍धता वाढेल.

हिरो मोटोकॉर्पचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी निरंजन गुप्‍ता म्‍हणाले, “आम्‍ही सलग दुसऱ्या वर्षी आतापर्यंतची सर्वोच्‍च फेस्टिव्‍ह रिटेल विक्री संपादित केली आहे, ज्‍यामधून भारतातील पसंतीचा ब्रँड म्‍हणून हिरो मोटोकॉर्पचे स्‍थान दिसून येते. आम्‍ही आमच्‍या लाखो ग्राहकांचे त्‍यांनी दाखवलेल्‍या अविरत विश्‍वासासाठी आभार व्‍यक्‍त करतो. देशातील बहुतांश भागांमध्‍ये उत्तम गतीसोबत विकास होत आहे, जेथे ग्रामीण भागामधील विक्री सणासुदीच्‍या काळाच्‍या उत्तरार्धात शहरी भागातील विक्रीपर्यंत पोहोचली आहे. आम्‍हाला ही गती कायम राहण्‍याची अपेक्षा आहे, तसेच आम्‍ही वर्षातील उर्वरित काळाबाबत आशावादी आहोत.”

सणासुदीच्‍या काळादरम्‍यान हिरो मोटोकॉर्पच्‍या अपवादात्‍मक कामगिरीने कंपनीला आपले नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यास सक्षम केले आहे. कंपनीचा नाविन्‍यता, ग्राहक समाधान व प्रबळ विक्री नेटवर्कवरील स्थिर फोकसमधून उच्‍च दर्जाची उत्‍पादने देण्‍याप्रती, तसेच ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते.

Related posts

एचडीएफसी लाइफकडून ११.० टक्‍के मार्केट शेअरची नोंद

Shivani Shetty

डोझीचे एआय सुसज्ज रिमोट पेरेंट हेल्थ मॉनिटरिंग सेवा दाखल

Shivani Shetty

भारतीय विद्यार्थ्‍यांचा ऑनलाइन शिक्षणावरील विश्‍वास वाढत आहे: फिजिक्‍स वाला

Shivani Shetty

Leave a Comment