maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नेक्‍स्‍टवेव्‍हच्‍या संस्‍थापकांचा प्रतिष्ठित फोर्ब्‍स इंडिया ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मान

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२४: भारतातील आघाडीचा एडटेक व अपस्किलिंग प्लॅटफॉर्म नेक्‍स्‍टवेव्‍हने उत्तम कामगिरी केली आहे, जेथे व्‍यासपीठाचे सह-संस्‍थापक शशांक रेड्डी गुज्‍जुला आणि अनुपम पेडर्ला यांना फोर्ब्‍स ३० अंडर ३० पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले आहे. या प्रतिष्ठित सन्‍मानामधून द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्‍या इंजीनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्‍यांना सक्षम करत भारतातील टेक होरिझोन ४.० ला चालना देण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते. हा पुरस्‍कार ३० प्रमुखांना उद्योगांमधील त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय कामगिरीसाठी प्रशंसित करतो. गेल्‍या वर्षी प्लॅटफॉर्मने २७५ कोटी रूपयांचा उल्‍लेखनीय सिरीज ए निधी संपादित केल्‍यानंतर हे उल्‍लेखनीय यश मिळाले आहे.

हा सन्‍मान उच्‍च स्‍पर्धात्‍मक स्थितीमधून मिळाला असल्‍यामुळे विशेषत: उल्‍लेखनीय आहे, जेथे डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्‍ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी) ने देशभरातील ५५०० हून अधिक मान्‍यताकृत एडटेक स्‍टार्टअप्‍सची नोंदणी केली. शैक्षणिक श्रेणीमधील एकमेव प्रतिनिधी म्‍हणून नेक्‍स्‍टवेव्हच्‍या सह-संस्‍थापकांच्‍या निवडीमधून क्षेत्राप्रती त्‍यांचे व्‍यापक योगदान दिसून येते.

नेक्‍स्‍टवेव्‍हचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अनुपम पेडर्ला म्‍हणाले, ”तरूण आपल्‍या देशाची ताकद आहेत. त्‍यांना योग्‍य कौशल्‍यांसह सुसज्‍ज केल्‍यास ते भारताला जागतिक अग्रणी देश बनवू शकतात. आमचा देशाच्‍या कानाकोपऱ्यापर्यंत जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान शिक्षण देण्‍याचा मनसुबा आहे. आमचा दृढ विश्‍वास आहे की, प्रत्‍येक विद्यार्थ्‍यामध्‍ये व्‍यापक क्षमता आहे आणि योग्‍य मार्गदर्शनासह ते अविश्‍वसनीय यश संपादित करू शकतात. आमच्‍या नेक्‍स्‍टवेव्‍ह विद्यार्थ्‍यांनी वेळोवेळी ही बाब सिद्ध करून दाखवली आहे. फोर्ब्‍सकडून या सन्‍मानामधून नेक्‍स्‍टवेव्‍ह हजारो तरूणांच्‍या जीवनात घडवून आणत असलेला आमूलाग्र बदल सार्थ ठरतो.”

नेक्‍स्‍टवेव्‍हचे सह-संस्‍थापक आणि कस्‍टमर एक्‍स्‍पेरिअन्‍सचे प्रमुख शशांक रेड्डी गुज्‍जुला म्‍हणाले, ”हा सन्‍मान फक्‍त वैयक्तिक यश नसून त्‍यामधून नेक्‍स्‍टवेव्ह टीमची, तसेच उत्तम करिअर घडवण्‍यासाठी सतत मोठी स्‍वप्‍ने पाहण्‍यासोबत शिक्षण घेणाऱ्या आमच्‍या विद्यार्थ्‍यांची अथक मेहनत दिसून येते. असे सन्‍मान आम्‍हाला तरूणांना तंत्रज्ञान क्षेत्रातील व्‍यापक संधींसाठी सुसज्‍ज करण्‍याच्‍या आमच्‍या ध्‍येयाला पूर्ण करण्‍यास अधिक प्रेरित करतात.”

Related posts

झेल एज्‍युकेशनचा यूपीईएससोबत सहयोग

Shivani Shetty

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रोडक्शन्सच्या “नखरेवाली ” चे चित्रीकरण सुरू !

Shivani Shetty

फिजिक्सवालाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल ५१,००० विद्यार्थ्यांची फी माफ केली

Shivani Shetty

Leave a Comment