मुंबई, २० फेब्रुवारी २०२४: आंतरराष्ट्रीय शिक्षणातील विशेषज्ज्ञ असलेल्या व ५० हून अधिक विद्यापीठांशी सहयोग असणाऱ्या स्टडी ग्रुपने यूकेमध्ये उच्च शिक्षणाच्या पर्यायाचा विचार करणाऱ्या गुणवान भारतीय विद्यार्थ्यांसाठी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. भारतीय विद्यार्थ्यांच्या बदलत्या महत्त्वाकांक्षा आणि करिअरच्या लक्ष्यांना प्रतिसाद देत स्टडी ग्रुपने संबद्ध विषयांसाठी स्कॉटलंडमध्ये नव्या इंटरनॅशऩल इयर वन कार्यक्रमांची नवी श्रेणी दाखल केली आहे – जिचे नाव इंटरनॅशनल इयर टू असे आहे. नवीन इंटरनॅशनल इयर वन कार्यक्रम सुरू करण्याबरोबरच यावर्षी स्टडी ग्रुपच्या मदतीने यूकेमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये ४० टक्के वाढीची आपल्याला अपेक्षा असल्याचे स्टडी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी इयन क्रिचटन यांनी सांगितले.
हे कार्यक्रम एखाद्या अंडरग्रॅज्युएट पदवी कार्यक्रमासाठी थेट अर्ज करण्याच्या विचारात असलेल्या, मात्र यूकेच्या शैक्षणिक यंत्रणेची अजिबात ओळख नसलेल्या आंतरराष्ट्रीय विद्य़ार्थ्यांसाठी स्टडी ग्रुपच्या भागीदारी विद्यापीठांच्या सहयोगाने आखले गेले आहेत आणि म्हणूनच या विद्यार्थ्यांना तुलनेने कमी विद्यार्थीसंख्या असलेले वर्ग, भाषेविषयी विशेष सूचना आणि अभ्यासाच्या स्तराशी संबंधित शैक्षणिक कौशल्यांनुसार आखली गेलेली सहाय्यक यंत्रणा यांचा लाभ मिळत आहे.
“उद्योगक्षेत्रांशी घनिष्ठ संबंध असलेल्या आणि उच्च कुशलतेवर आधारित क्षेत्रांमध्ये इंटर्नशिपच्या संधी देऊ करणाऱ्या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे, जे करिअरच्या दिशेने जाण्यास मदत करणाऱ्या शिक्षणावर भर देण्याच्या यूकेच्या धोरणाशी सुसंगत आहे.” श्री. क्रिचटन म्हणाले, “आजच्या काळातील भारतीय विद्यार्थ्यांना विशेषत्वाने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांत रस आहे, तंत्रज्ञानाच्या सतत बदलत्या क्षेत्रामध्ये आजही खूप कालसुसंगत असलेल्या कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचाही या विषयांत समावेश आहे. पण त्याचबरोबर व्यापार, व्यवस्थापन, फायनॅन्स, कायदा आणि आरोग्य हेही लोकप्रिय विषय आहे, कारण या क्षेत्रांतील यूकेची कामगिरी सर्वोत्कृष्ट आहे व अद्ययावत शिक्षणाच्या आणि भविष्य सुरक्षित करू शकणाऱ्या कौशल्यांच्या शोधात असणाऱ्यांना ते आकर्षित करत आले आहे.”
आपण मिळविलेल्या शैक्षणिक क्षमता या यूकेच्या शैक्षणिक यंत्रणेमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या स्थानिक विद्यार्थ्यांच्या समतुल्य आहेत या आत्मविश्वासाचे बळ आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देणे हा या कार्यक्रमांचा हेतू आहे. अभ्यासासाठी प्रदीर्घ कालावधी आणि आपल्या गरजांनुसार बेतलेली सहाय्यक यंत्रणा यांच्या माध्यमातून प्रेरित विद्यार्थी या शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यास आवश्यक गुणवत्ता प्राप्त करू शकतात आणि यूकेमधील आपल्या समवयीन विद्यार्थ्यांच्या बरोबरीने समान संधी मिळवित आपण निवडलेल्या विद्यापीठामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पुढील टप्प्यापर्यंत प्रगती साधू शकतात.
आवश्यक शैक्षणिक इयत्ता पूर्ण करण्यात यशस्वी झालेले विद्यार्थी त्यानंतर दोन वर्षांच्या कालावधीत पदवी प्राप्त करू शकतात. गेल्या वर्षी स्टडी ग्रुपच्या विद्यार्थ्यांपैकी इंटरनॅशनल इयर वन किंवा इंटरनॅशनल इयर टू कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या ९४ टक्के विद्यार्थ्यांना स्टडी ग्रुपच्या सहयोगी विद्यापीठांनी त्यांनी निवडलेल्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यास पात्र म्हणून मान्यता दिली.