maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

नेस्ले इंडियाने आणले किटकॅट®️ प्रोफेशनल स्प्रेड

पाककृतींच्या निर्मितीला मिळाली एका अभिनव चवीची जोड
यापूर्वी बाजारात आणलेल्या आपल्या आऊट-ऑफ-होम प्रकारातील अभिनव उत्पादनांची मालिका पुढे नेत नेस्ले प्रोफेशनलने आता किटकॅट®️ प्रोफेशनल स्प्रेड बाजारात दाखल करत कोको-बेस्ड स्प्रेड श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. या स्प्रेडमुळे HoRaCa (हॉटेल्स, रेस्ट्रराँज आणि केटरिंग) क्षेत्राला किटकॅट®️चा अधिकच विस्तारित अनुभव मिळणार आहे.
सदा बदलत्या ग्राहकवर्गाच्या आजच्या जगामध्ये शेफ मंडळींनी इतरांहून वेगळी आणि जिभेचे लाड पुरविणारी डिझर्ट्स पेश करण्यासाठी सातत्याने नवनव्या कल्पना आजमावत रहावे लागते. आपल्या दाट चॉकलेटी चवीने व कुरकुरीतपणाने किटकॅट®️ प्रोफेशनल स्प्रेड असा एक वेगवेगळ्या प्रकारे वापरता येण्याजोगा आणि रेडी-ट-यूज उपाय पुरविते, जो अनेक प्रकारच्या गरम आणि थंड पदार्थांच्या पाककृतींत अगदी सहज समाविष्ट करता येऊ शकतो. कुशलतेने बनविलेल्या पेस्ट्रीजपासून ते कलात्मकरित्या सजवलेल्या कन्टेम्पररी प्लेटेड डिझर्ट्सपर्यंत सर्वत्र या स्प्रेडचा वापर टॉपिंग म्हणून, फिलिंग म्हणून किंवा सजावटीसाठी करता येऊ शकतो, ज्यातून किटकॅट®️ वेफरचा अनुभव केक्स, कुकीज, पेस्ट्रीज आणि पेयांसह विविध प्रकारच्या पाककृतींच्या निर्मितीमध्ये करता येऊ शकतो.
किटकॅट®️ प्रोफेशनल स्प्रेडच्या बाजारातील पदार्पणाविषयी बोलताना नेस्ले इंडियाच्या नेस्ले प्रोफेशनल विभागाचे डिरेक्टर सौरभ माखिजा म्हणाले, “किटकॅट®️ आजही भारताच्या काही सर्वात पसंतीच्या ब्रॅण्ड्सपैकी एक आहे. किटकॅट प्रोफेशनल स्प्रेड बाजारात आल्याने आता शेफ्सना किटकॅटची खास ओळखीची चव व पोत आपल्या निर्मितीमध्ये वापरण्याची एक नवी पद्धत उपलब्ध झाली आहे. पाककलेतील सर्जनशीलतेची जपणूक करण्याशी व HoReCa आणि संस्थात्मक क्षेत्रांना हा बहुगुणी पर्याय उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्राहक अऩुभव अधिक समृद्ध बनविण्याशी कंपनीची बांधिलकी या नव्या संकल्पनेत प्रतिबिंबित झाली आहे.”
या कार्यक्रमाची एक छोटी झलक ४ ते ८ मार्च दरम्यान नवी दिल्लीत भरलेल्या AAHAR, इंटरनॅशनल फूड अँड हॉस्पिटॅलिटी मेळाव्यात सादर करण्यात आली. उत्पादनाच्या बाजारातील पदार्पणासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून नेस्लेने या मेळाव्यात संवादात्मक दालन उभारले होते, जिथे विविध डिझर्ट्सच्या पाककृतींमध्ये अभिनव पद्धतीने वापरता येण्याची या उत्पादनाची उपयुक्तता प्रदर्शित करण्यासाठी लाइव्ह टेस्टिंग सेशन्स व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. अनेक प्रकारच्या छान छान पाककृतींच्या स्वाद व पोतामध्ये या स्प्रेडमुळे कशी भर पडते हे प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी शेफ्स आणि उद्योगक्षेत्रातील व्यावसायिकांना या निमित्ताने मिळाली.
किटकॅट प्रोफेशनल स्प्रेड सोयीस्कर अशा १ किग्रॅच्या पॅकमध्ये उपलब्ध होणार आहे, जो खास आउट-ऑफ-होमसाठी तयार करण्यात आला आहे.

Related posts

सॅमसंग गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६, झेड फ्लिप६, वॉच अल्‍ट्रा, वॉच७ आणि बड्स३ च्‍या आकर्षक ऑफर्ससह विक्रीला सुरूवात

Shivani Shetty

थम्‍स अपकडून तूफान लॉन्च: क्रिकेटप्रेमींसाठी आणली विशेष चार्टर्ड विमानसेवा आणि आयसीसी टी२० मेन्‍स वर्ल्‍ड कपच्‍या तूफानी टूरचा आनंद मिळणार

Shivani Shetty

एरिओवेदासह लाइफसेलचा स्किनकेअर क्षेत्रात प्रवेश

Shivani Shetty

Leave a Comment