maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

मिनोषा इंडिया लिमिटेडने लेझर प्रिंटर्सची स्‍मार्ट श्रेणी लाँच केली

 


मुंबई, २६ सप्टेंबर २०२३:
भारतातील ऑफिस प्रिंटींग तंत्रज्ञानाच्‍या क्षेत्राला नव्‍या उंचीवर नेण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत मिनोषा इंडिया लिमिटेड या भारतातील रिको उत्‍पादनांच्‍या प्रतिष्ठित सहयोगी कंपनीने नेक्‍स्‍ट-जनरेशन लेझर प्रिंटर्सची अपवादात्‍मक श्रेणी लाँच केली आहे. या उल्‍लेखनीय उत्‍पादन लाइनअपमध्‍ये दोन विशिष्‍ट विभागांचा समावेश आहे: मोनो व कलर. हे दोन्‍ही विभाग ऑफिस प्रिंटींगमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यासाठी, उत्‍पादकता वाढवण्‍यासाठी आणि उल्‍लेखनीय दर्जा वितरित करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहेत.

हे नाविन्‍यपूर्ण प्रिंटर्स तंत्रज्ञानामधील मोठी झेप सादर करतात, तसेच या प्रिंटर्समध्‍ये सर्वोत्तमता व प्रगत वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यासाठी मिनोषा व रिको ओळखले जातात. नाविन्‍यता, वैविध्‍यता व सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत मिनोषा इंडिया लि. ऑफिस प्रिंटींग सोल्‍यूशन्‍सच्‍या नवीन युगाला आकार देत आहे, जे भारतभरातील व्‍यवसायांच्‍या डायनॅमिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. सर्व प्रिंटर्स वाय-फाय सक्षम आहेत आणि उद्योगातील दर्जात्‍मक ऑनसाइट सेवा देतात, ज्‍यामध्‍ये बहुमूल्‍य ग्राहकांसाठी स्‍मार्ट डिवाईस कनेक्‍टर, रिमोट डिवाईस मॅनेजर आणि राष्‍ट्रीय सेवा सहयोगींचे प्रबळ नेटवर्क यांचा समावेश आहे. लेझर प्रिंटर श्रेणीची किंमत भारतात ३०,००० रूपयांपासून आहे.

मिनोषा इंडिया लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. अतुल ठक्‍कर म्‍हणाले, “रिकोसोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून आमच्‍या बहुमूल्‍य ग्राहकांना सर्वोत्तमता देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. हा प्रतीकात्‍मक सहयोग आहे, जो आमच्‍या क्षमतांशी संलग्‍न आहे आणि उच्‍चस्‍तरीय सोल्‍यूशन्‍स प्रदान करण्‍यासाठी आमच्‍या क्षमतांना दृढ करतो. रिकोसोबत सहयोगाने आम्‍ही गेम-चेंजिंग उत्‍पादने सादर करण्‍याच्‍या टप्‍प्‍यावर आहोत, जी भारतीय बाजारपेठेच्‍या अपेक्षांची पूर्तता करतील.”

मोनो विभाग: रिको पी ३११ (सिंगल फंक्‍शन प्रिंटर): या प्रिंटरमध्‍ये ४-लाइन ऑपरेशन एलसीडी डिस्‍प्‍ले पॅनेल आणि जवळपास ३२ पीपीएमची प्रिंट गती आहे. तसेच या प्रिंटरमध्‍ये सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह लॉक्‍ड प्रिंट फंक्‍शन, सुरक्षितपणे डेटा ट्रान्‍समिशनसाठी नेटवर्क एन्क्रिप्‍शन, सुरूवातीच्‍या कार्टिजमध्‍ये ७००० पेपर्स प्रिंट होण्‍याची खात्री आणि १२०० x१२०० डीपीआयचे प्रिंट रिझॉल्‍यूशन आहे.

रिको एम ३२०एफ (मल्‍टीपल फंक्‍शन प्रिंटर): ४.३ इंच कलर टच पॅनेल असलेला हा मल्‍टी-फंक्‍शन प्रिंटर वैविध्‍यता व सुलभ वापरासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या प्रिंटरमधील ऑटोमॅटिक रिव्‍हर्सिंग डॉक्‍यूमेंट फीडर (एआरडीएफ) आणि विविध स्‍कॅन-टू क्षमता कार्यक्षम डॉक्‍यूमेंट शेअरिंगची खात्री देतात. या एमएफपीमधून सुरूवातीच्‍या कार्टिजमध्‍ये ७००० पेपर्स प्रिंट होण्‍याची खात्री मिळते आणि १२०० x१२०० डीपीआयचे प्रिंट रिझॉल्‍यूशन आहे.

कलर विभाग: रिको पी सी३११डब्‍ल्‍यू (सिंगल फंक्‍शन): हा प्रिंटर जवळपास २५ पीपीएम गतीमध्‍ये वैविध्‍यपूर्ण रंगांमधील प्रिंट देतो. या प्रिंटरमध्‍ये सिंगल-फंक्‍शन व्‍हर्जनसाठी पर्यायासह सुधारित क्षमतेसाठी पर्यायी सेकंड पेपर ट्रे भर करण्‍याची क्षमता आहे.

रिको एम सी२५१एफडब्‍ल्‍यू (मल्‍टी-फंक्‍शन): या ४-इन-१ मल्‍टी-फंक्‍शन प्रिंटरमध्‍ये मोठे कलर टचस्क्रिन पॅनेल, सिंगल पास डॉक्‍यूमेंट फीडर (एसपीडीएफ) व प्रबळ सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत. हा प्रिंटर उत्तमरित्‍या व्‍यावसायिक कलर प्रिंट्स देतो, तसेच सुधारित क्षमतेसाठी पर्यायी सेकंड पेपर ट्रे भर करण्‍याच्‍या क्षमतेसह कार्यसंचालन सुलभ करतो.

Related posts

क्‍लीअरट्रिपकडून स्थिर हॉटेल बुकिंग्‍ज व ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करत ‘कॅन्‍सल फॉर नो रिजन’ लाँच

Shivani Shetty

SMFG इंडिया क्रेडिट तर्फे ६ व्या पशु विकास दिनानिमित्त १ लाखांहून अधिक गुरांवर उपचार; दुग्धव्यवसायातील महिलांचा सन्मान

Shivani Shetty

कॅडीसच्या महसूलात वार्षिक २५ टक्‍क्‍यांची वाढ

Shivani Shetty

Leave a Comment