भारत । ऑक्टोबर १४, २०२४: मेटाने आज सुरक्षितता मोहिम ‘स्कॅम्स से बचो’ लाँच केली आणि व्यक्तींना ऑनलाइन घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्याच्या पद्धतींबाबत जागरूक करण्यासाठी, तसेच सुरक्षित डिजिटल पद्धतींना चालना देण्यासाठी बॉलिवुड स्टार आयुष्मान खुराणा यांच्यासोबत सहयोग केला आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (एमईआयटीवाय), इंडियन सायबरक्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आय४सी) आणि मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग (एमआयबी) सोबत सहयोगाने लाँच करण्यात आलेली मेटाची मोहिम व्यक्तींना ऑनलाइन घोटाळ्यांपासून सुरक्षित ठेवण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला प्रकाशझोतात आणते, तसेच देशभरात घोटाळे व सायबर फसवणूकांच्या वाढत्या केसेसचे निराकरण करण्याच्या शासनाच्या ध्येयाला पाठिंबा देते.
ही माहितीपूर्ण मोहिम व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामना कराव्या लागणाऱ्या काही सामान्य घोटाळ्यांना दाखवते, तसेच व्यक्तींना दक्ष राहण्यास आणि कोणतीही कृती करण्यापूर्वी खबरदारी घेण्यास प्रेरित करते. ही जाहिरात फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपवरील अनेक सुरक्षितता वैशिष्ट्यांना दाखवते, जे वापरकर्त्यांना त्यांच्या ऑनलाइन सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करतात. तुम्ही पूर्ण चित्रपट येथे पाहू शकता : https://www.facebook.com/MetaIndia/videos/1082499483221216/
या जाहिरातीमध्ये आयुष्मान खुराणा यांना जागरूक वेडिंग गेस्ट म्हणून दाखवण्यात आले आहे, जो व्यक्तींना घोटाळ्यांना बळी पडण्यापासून जागरूक करतो आणि त्याच्या द्रुत विचारसरणी व विनोदी स्वभावासह त्यांचे घोटाळ्यांपासून संरक्षण करतो. मेटाची सुरक्षितता वैशिष्ट्ये, जसे टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन, ब्लॉक अँड रिपोर्ट, व्हॉट्सअॅपच्या ग्रुप प्रायव्हसी सेटिंग्जना दाखवत ही मोहिम महत्त्वपूर्ण आठवण करून देते की, मेटाची इन-बिल्ट उत्पादन वैशिष्ट्ये व सुरक्षितता टूल्स लोकांना ऑनलाइन घोटाळे, फसवणूका आणि खात्यामध्ये छेडछाड होणाऱ्या जोखीमांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षिततांसह सुसज्ज करतात.
या मोहिमेच्या लाँचबाबत मत व्यक्त करत आयुष्मान खुराणा म्हणाले, “आजच्या डिजिटल लँडस्केपमध्ये कधी-कधी खात्रीशीर वाटू शकणारे ऑनलाइन घोटाळे आणि फसवणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ज्यामुळे आपण सावध राहण्यासोबत अशा घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्याप्रती जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मला मेटाच्या सुरक्षितता उपक्रमाचा भाग असण्याचा आनंद होत आहे. या उपक्रमाचा व्यक्ती स्वत:चे संभाव्य सायबर घोटाळ्यांपासून कशाप्रकारे संरक्षण करू शकतात याबाबत जागरूकतेचा प्रसार करण्याचा मनसुबा आहे. हा उपक्रम महत्त्वपूर्ण आठवण करून देतो की, कोणतीही कृती करण्यापूर्वी अधिक विचार करा आणि घोटाळ्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मेटाच्या सुरक्षितता टूल्सचा वापर करा, जे तुम्हाला ऑनलाइन सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम करतात.”
मेटा इंडियाच्या पब्लिक पॉलिसीचे उपाध्यक्ष व प्रमुख शिवनाथ ठुकराल म्हणाले, “आम्हाला ऑनलाइन घोटाळ्यांच्या वाढत्या प्रमाणाचे गांभीर्य माहित आहे. आमचा विश्वास आहे की, या समस्येचे निराकरण करण्यासाठी इकोसिस्टममध्ये एकीकृत व सहाय्यक उपाययोजनांची गरज आहे. मेटाने घोटाळे करणाऱ्यांच्या एक पाऊल पुढे राहण्यासाठी तंत्रज्ञान व संसाधनांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवले आहे. आमची सुरक्षितता मोहिम ‘स्कॅम्स से बचो’ आमच्या प्रयत्नांना अधिक दृढ करते, जी वापरकर्त्यांना ऑनलाइन घोटाळ्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्याकरिता सहजपणे उपलब्ध असलेले सुरक्षितता टूल्स आणि वैशिष्ट्यांबाबत जागरूक करते. आम्ही आशा करतो की, ही मोहिम वापरकर्त्यांशी संलग्न होण्यासोबत त्यांना स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीसह सुसज्ज करेल. तसेच ग्राहक सवयींमध्ये बदल घडवून आणेल, ज्यामुळे त्यांना स्वत:च्या सुरक्षिततेसोबत मित्र व कुटुंबाचे संरक्षण करण्यास देखील मदत होऊ शकेल.”
वैयक्तिक खाती व गोपनीय माहितीचा समावेश असलेले ओटीपी घोटाळे, घोटाळे करणारे लोकांना त्यांचे पैसे देण्यास भुरळ पाडू शकणारे तोतयागिरी घोटाळे, मोठे परताव्यांची खात्री देणारे ट्रेडिंग व गुंतवणूक घोटाळे आणि बनावटी कर्ज अॅप्स व ऑफर्स अशा अनेक घोटाळ्यांना दाखवत ही मोहिम निदर्शनास आणते की मेटाची साधी, पण प्रभावी सुरक्षितता वैशिष्ट्ये व्यक्तींचे ऑनलाइन घोटाळे आणि फसवणूकांपासून संरक्षण करू शकतात.
मेटाचे जागतिक स्तरावर ४०,००० हून अधिक कर्मचारी सुरक्षा व सुरक्षिततेवर काम करत आहेत, जेथे कंपनीने २०१६ पासून टीम्स व तंत्रज्ञानामध्ये २० बिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. यामध्ये १५,००० कन्टेन्ट रिव्ह्यूवर्सचा समावेश आहे, जे २० भारतीय भाषांसह ७० हून अधिक भाषांमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम व थ्रेड्समधील कन्टेन्टचे पुनरावलोकन करतात. गेल्या तीन वर्षांमध्ये मेटाने ऑनलाइन सुरक्षिततेला गती देण्यासाठी ५० हून अधिक सुरक्षितात टूल्स व वैशिष्ट्ये लाँच केली आहेत आणि आम्ही ग्राहकांना ऑनलाइन सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी, तसेच घोटाळेयुक्त कन्टेन्टविरोधात आमच्या सिस्टम्स प्रबळ करण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेत आहोत.