maharashtraprimenews
ठळक बातम्या
महाराष्ट्र

अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित “कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा तिसऱ्या आठवड्यात ही बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी करत आहे

मुंबई, शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ नेते, माजी आमदार, माजी मंत्री दिवंगत गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या जीवनावर आधारित कर्मयोगी आबासाहेब या मराठी चित्रपटाने लागोपाठ तिसऱ्या आठवड्यातील राज्यभर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला भरभरून दाद दिली असून दिवसेंदिवस चित्रपटाला गर्दी वाढत आहे.
जागतिक विक्रमी चित्रपट निर्माते अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित “कर्मयोगी आबासाहेब” हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात ही बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे. सिंघम अगेन, भुलभुलैया ३ यासारख्या चित्रपटांना टक्कर देत संपूर्ण भारतभरात गेल्या सोळा दिवसात चित्रपटाने १६.२३ कोटींचा व्यवसाय केला आहे. अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित आणि लिखित “कर्मयोगी आबासाहेब” या मराठी चित्रपटात आबासाहेबांच्या वारशाचा सन्मान, सशक्त संवाद आणि हृदयस्पर्शी कथन यांचा मिलाफ आहे. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अँम्सटरडॅम लिफ्ट-ऑफ आणि क्राऊनवूड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाने “गिनीज बुक आणि हाई रेंज ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” लंडन बुक ऑफ रेकॉर्ड अशा वेगवेगळ्या नऊ आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही प्राप्त केला आहे. या चित्रपटाची निर्मिती मायाक्का माऊली फिल्म प्रोडक्शन अँड मुंबई क्रिएशन इंटरनेट निर्माता बाळासाहेब महादेव एरंडे आणि मारुती तुळशीराम बनकर आहेत.
दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या भूमिकेत अनिकेत विश्वासराव यांच्यासह हिंदी आणि मराठीतले २८ कलाकारांनी काम केले आहे. अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट ने हा चित्रपट जगभर प्रदर्शित केला आहे आणि डिजिटल टेक्निकल सपोर्ट भाई आनंद पाटील – इर्लेकर यांनी केलं आहे. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांचा २०१८ साली वेडा बी एफ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याही सिनेमाला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. त्या चित्रपटाने ही वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला. वेडा BF, बेतुका, कम ऑन विष्णू, ब्रेक डाऊन धारावी कट्टा असे एकाहून एक सरस चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले आहे. आता कर्मयोगी आबासाहेब हा चित्रपट ही त्यांच्या दमदार लेखणीतून आणि दिग्दर्शनातून प्रेक्षकांच्या मनाला भावत आहे. प्रेक्षकांनी गेल्या सोळा दिवसापासून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे आतापर्यंत चित्रपटाने १६.२३ कोटींचा व्यवसाय केला असून. तिसऱ्या आठवड्याची
चित्रपटाची यशस्वी घोडदौड चालू आहे.

Related posts

महाराष्ट्राला १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात रत्न आणि दागिने उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल: आयआयजेएस सिग्नेचरचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Shivani Shetty

एआय परिवर्तनामुळे २०२८ पर्यंत २.७३ दशलक्ष टेक रोजगार निर्माण होण्‍यासह भारतातील कर्मचाऱ्यांची आकडेवारी ३३.९ दशलक्षपर्यंत पोहोचणार: सर्विसनाऊ एआय स्किल्‍स अँड जॉब्‍स रिपोर्ट

Shivani Shetty

YRF लाँच करणार पुढचा मोठा सिंगिग सुपरस्टार – भजन कुमार!

Shivani Shetty

Leave a Comment