मुंबई, २९ सप्टेंबर २०२४: भारतात अग्रस्थानी असलेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या ओबेन इलेक्ट्रिक, मध्ये दसरा हंगामाची सुरुवात होत आहे; ज्यामध्ये सणासुदीच्या दिवसांत झगमगाटीचा साज चढवणा-या आणि अप्रतिम अशा डील्स मिळणार आहेत. २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत, ओबेन इलेक्ट्रिक ची फ्लॅगशिप परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल, ओबेन Rorr ग्राहकांना केवळ १,१९,९९९ रुपये इतक्या अजोड एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येणार आहे. त्यामुळे १,४९,९९९ रुपये या मूळ एक्स-शोरूम किमतीवर तब्बल ३०,००० रुपयांची बचत होणार आहे. इतकेच नाही तर, प्रत्येक खरेदीबरोबर ५ वर्षांची वाढीव वॉरंटी आणि आयफोन १५, आयपॅड मिनी आणि सोनी हेडफोन जिंकण्याची संधीसुद्धा मिळणार आहे.
सणासुदीचा उत्साह वाढवत ओबेन इलेक्ट्रिक सुद्धा बेंगळुरू, दिल्ली आणि पुणे येथील शोरूममध्ये खास दसरा धमाल दिवसाचे आयोजन करेल. या एक दिवसाच्या विशेष कार्यक्रमांमुळे ग्राहकांना ओबेन रोरवर एकूण ६०,००० रुपयांपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात बचत करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे या उत्पादनाची किंमत आश्चर्यकारकपणे ८९,९९९ रुपयांपर्यंत कमी होईल. बेंगळुरू शहरातील कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी (एचएसआर लेआउट शोरूम) होणार आहे, त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी दिल्ली (द्वारका शोरूम) आणि ६ ऑक्टोबर रोजी पुणे (वाकड शोरूम) येथे हा सोहळा होणार आहे. पुणे शहरात होणाऱ्या कार्यक्रमात, दसरा धमाल दिवसाच्या विजेत्यांना निवडण्यासाठी अभिनेता आणि बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकर याची खास उपस्थिती पहायला मिळणार आहे. ओबेन इलेक्ट्रिक च्या माध्यमातून इलेक्ट्रिक क्रांतीमध्ये सहभागी होण्यास आणि मोठ्या प्रमाणातील बचतीचा आनंद घेण्यासाठी या आकर्षक संधीचा लाभ घेता यावा म्हणून आम्ही ग्राहकांना आमंत्रित करत आहोत,
ओबेन इलेक्ट्रिकच्या संस्थापक आणि सीईओ मधुमिता अग्रवाल म्हणाल्या, “आम्ही नेहमी ओबेन इलेक्ट्रिक मध्ये आमच्या ग्राहकांना अधिक मूल्य मिळवून देऊ शकतील अशा पद्धतींचा शोध घेत असतो; आणि दसरा सणासाठी आम्ही देत असलेली ऑफर म्हणजे भारताचे इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जे संक्रमण होत आहे त्या लोकांबरोबर हा आनंदाचा हंगाम साजरा करण्याचा आमचा मार्ग आहे. कामगिरी, सुरक्षितता आणि टिकाऊपणा या सर्व बाबतीत आमची इलेक्ट्रिक मोटारसायकल एक उत्तम पर्याय ठरावी हे आमचे उद्दिष्ट आहे. सणासुदीच्या या काळात, अधिकाधिक ग्राहकांना ओबेन इलेक्ट्रिक च्या नाविन्यपूर्ण ईव्ही मोटरसायकलची विश्वासार्हता आणि गुणवत्ता अनुभवता यावी हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आकर्षक सवलती आणि ऑफर्स देण्यासाठी उत्सुक आहोत.”
सणानिमित्त केलेल्या या घोषणेबरोबरच ओबेन इलेक्ट्रिकच्या यशस्वी विस्तार योजनाही सादर होत आहेत, ज्यामध्ये येत्या काही महिन्यांत भारतातील प्रमुख शहरांमध्ये ६० नवीन शोरूम्सच्या शुभारंभाचा समावेश आहे. बेंगळुरू, पुणे, दिल्ली आणि केरळमध्ये भक्कमपणे पाय रोवून उभे राहिलेली, ओबेन इलेक्ट्रिक भारताच्या कानाकोपऱ्यात इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स उपलब्ध करून देत आपली उपस्थिती सातत्याने वाढवत आहे. ब्रँडकडे असलेल्या एलएफपी बॅटरी तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट कामगिरी ५०% जास्त उष्णतारोधक आणि वाढीव आयुर्मान देऊ करते आणि त्यामुळे हे स्पर्धक उत्पादनांपेक्षा हे वेगळे ठरते. याचा परिणाम म्हणून भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीमधील एक विश्वासू भागीदार म्हणून ओबेन चे स्थान आणखी मजबूत होते.