maharashtraprimenews
ठळक बातम्या
Breaking newsgeneralPublic Interest

सोनारी लाँजरीचे नवीनतम कलेक्शन

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३: सोनारी या १९७०च्या दशकापासून आराम व चैनीची व्याख्या नव्याने करणाऱ्या प्रतिष्ठित लाँजरी ब्रॅण्डने आपल्या पोर्टफोलिओत ‘बूस्ट अप ब्रा’ या नवीन कलेक्शनची भर घातली आहे. सोनारी कलेक्शनमधील या नवीन श्रेणीचा उद्देश प्रामुख्याने आधुनिक स्त्रीला स्वत:बद्दल काय वाटते याची व्याख्या नव्याने करणे हा आहे. त्याचबरोबर शैली व आराम यांचा मेळ घालणे आणि पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास व अभिजातता यांचा समतोल साधणे ही उद्दिष्टे देखील या कलेक्शनपुढे आहेत.

अत्यंत मऊ, हवा आत शिरू शकेल अशा वस्त्रापासून तयार करण्यात आलेली ही पॅडेड ब्रा दीर्घकाळ आरामदायी ठरणारी तसेच घालणारीची शैली विनासायास अधिक उंचीवर नेणारी आहे. या ब्रा चपखल बसतात, उत्तम असा आधार देतात, त्यामुळे स्तन उठून दिसतात आणि त्यांचा नैसर्गिक आकारही कायम राहतो. ब्राचे कप्स गुबगुबीत व मुलायम असल्याने अजिबात अवघडल्यासारखे होत नाही. त्याचप्रमाणे ब्राचे मुलायम वस्त्र सहजतेने शरीराचा आकार घेते.

सोनारी लाँजरीचे संचालक दीपेश कुबाडिया म्हणाले, “सोनारीचा १९७०च्या दशकापासूनचा प्रवास म्हणजे स्त्रियांच्या आरामाचा गाभा नव्याने शोधण्याचा अविश्रांत प्रयत्न आहे. आधुनिक स्त्रीच्या सातत्याने बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षेप्रती आम्ही कायम दाखवत असलेले समर्पण ‘बूस्ट अप ब्रा’ या आमच्या नवीनतम कलेक्शनमधून स्पष्ट होते. प्रत्येक स्त्रीने तिच्यातील खास वैशिष्ट्ये जपावीत व त्याचा आनंद लुटावा यावरील विश्वासाचे ते प्रतीक आहे. त्याचप्रमाणे ती तिच्या प्रत्येक लहरीला साजेसे अंतर्वस्त्राचे डिझाइन निवडू शकेल याची काळजी कलेक्शनच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.”

आपल्या आरामदायी व ट्रेण्ड निश्चित करणाऱ्या डिझाइन्सच्या माध्यमातून भारतभरातील स्त्रियांची मने जिंकून घेणाऱ्या सोनारी या आघाडीच्या लाँजरी ब्रॅण्डकडे ५० वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यामुळेच स्त्रियांना त्यांच्या अंतर्वस्त्रांकडून नेमके काय हवे असते हे या ब्रॅण्डने पुरेपूर ओळखले आहे. मिलेनिअल व जेन झेड तरुणींना त्यांची भाषा बोलणारा लाँजरी ब्रॅण्ड हवा असतो आणि त्यांच्या सातत्याने उत्क्रांत होणाऱ्या गरजांची पूर्तता करणारा सोनारी ब्रॅण्ड त्यांची सर्वोत्तम पसंती ठरली आहे. शरीराच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये बसणाऱ्या लाँजरीच्या विस्तृत श्रेणीच्या माध्यमातून, प्रत्येक स्त्रीला चपखल बसणारी ब्रा

मिळेल आणि तिच्यात सुपरस्टार असल्याची भावना निर्माण होईल याची काळजी सोनारीने घेतली आहे. सोनारीची क्रांतिकारी डिझाइन्स आरामाची व्याख्या नव्याने करतात आणि कालबाह्य झालेल्या अवघडल्याची भावना देणाऱ्या ब्रांना कायमस्वरूपी निरोप देतात.

 

Related posts

मामि फेस्टिवल मध्ये जिओ स्टुडिओजच्या एक नाही दोन नाही तर चक्क तीन मराठी चित्रपटांचा बोलबाला!

Shivani Shetty

मेटाकडून GenAI च्‍या माध्‍यमातून भारतातील ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेमध्‍ये डिजिटल परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी एनएलएसआययू – आयआयटी बॉम्‍बे रिसर्च प्रोजेक्‍टला मदतीचा हात

Shivani Shetty

आयसीसी मेन्‍स क्रिकेट वर्ल्‍ड कपची ऑफिशियल बेव्‍हरेज सहयोगी थम्‍स अपकडून मोहिम ‘थम्‍स अप उठा, इंडिया इंडिया मचा’ लाँच

Shivani Shetty

Leave a Comment